एक्स्प्लोर

शेतमालाचे दर वाढले की सरकारच्या पोटात गोळा येतो, कांद्याच्या आयातीवरुन जयंत पाटलांचा हल्लाबोल

शेतकऱ्याचे (Farmers) कुठेही उत्पन्न वाढू नये अशी सरकारची नीती असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी व्यक्त केले.

Jayant Patil on Onion : भारतातील कांद्याचे वाढते (Onion Price) दर  नियंत्रणात आणण्यासाठी सरकारनं अफगाणिस्तानातून (Afghanistan) कांद्याची आयात केली आहे. याच मुद्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. शेतकऱ्याचे (Farmers) कुठेही उत्पन्न वाढू नये अशी सरकारची नीती असल्याचे पाटील म्हणाले. तेलबियांच्या आयातीबद्दल, तेल आयात करण्याच्या बाबतीत हेच धोरण आहे. शेतीमालाचा दर वाढायला लागला की यांच्या पोटात गोळा येतो आणि महागाई वाढली असे समजतात असं पाटील म्हणाले. शेतीमालाचा कसा दर पडेल यासाठी जगातून कांदा, सोयाबीनचे तेल हुडकून काढतात आणि शेतकऱ्याचं कंबरडं मोडतात अशी टीका जयंत पाटील यांनी केली. 

अफगाणिस्तानचा लाल कांदा भारतात दाखल

सध्या कांद्याचे दर वाढत आहेत. यामुळं शेतकऱ्यांच्या खिशात चार पैसे येत आहेत. अशा स्थितीतच सरकारने अफगाणिस्तानचा लाल कांदा आयात केला आहे. भारतात कांद्याचे वाढत असलेले दर अन् अफगानिस्तानमध्ये घसरलेले दर याचा फायदा घेत खासगी व्यापारी कांदा भारतात आणून मालामाल बनू पाहत आहेत.

लोकसभेप्रमाणेच विधानसभेत देखील सरकारला कांदा रडवणार

दरम्यान, लोकसभेप्रमाणेच विधानसभेत देखील सरकारला कांदा रडवणार का? असा सवाल जयंत पाटील यांना प्रसारमाध्यमांनी केला. यावेळी पाटील म्हणाले की, कांदा रडवणार, सोयाबीन रडवणार, कपाशी रडवणार, तसेच सर्व पिक विमांचे प्रश्न सरकारला रडवणार असल्याचे जयंत पाटील म्हणाले. सरकारने कितीही घोषणा केल्या तरी महाराष्ट्रातील ग्रामीण भागात फिरलं की तुमच्या लक्षात येईल या सरकारला लोक मत देणार नसल्याचे जयंत पाटील म्हणाले.

आम्ही विरोधी पक्षात, मराठा आरक्षणासंदर्भात सत्तारुढ पक्षाने निर्णय घ्यावा

आम्ही सध्या विरोधी पक्षात आहोत. जे सत्तेत आहेत त्यांच्याकडूनच मराठा आरक्षणासंदर्भात मोठ्या अपेक्षा असल्याचे जयंत पाटील म्हणाले. सत्तारुढ पक्षाने निर्णय घ्यावा आम्ही त्याला पाठिंबा द्यायला तयार असल्याचे पाटील म्हणाले. 

महाविकास आघाडीत येवल्याची जागा आम्हाला मिळणार

येवल्याच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार होते. त्यामुळे ही जागा बहुतेक आम्हाला मिळणार असल्याचे जयंत पाटील म्हणाले. महाविकास आघाडीचा अंतिम निर्णय होईल त्यावेळी तसे घोषीत केले जाईल असंही पाटील म्हणाले. त्यामुळं याठिकाणी राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी लढ अशीच लढत होईल असं जयंत पाटील म्हणाले.

महत्वाच्या बातम्या:

मोदी सरकारने कांद्यावरचे निर्यात मूल्य घटवले, पण सिस्टीमच अपडेट केली नाही, ते जहाज निघून गेल्यास 300 कंटेनर्समधील कांदा सडणार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कृषीमंत्री धनंजय मुंडेंसमोर नवं आव्हान? परळी मतदारसंघातून या आमदाराच्या जावयाचं नाव उमेदवारीसाठी पुढं
कृषीमंत्री धनंजय मुंडेंसमोर नवं आव्हान? परळी मतदारसंघातून या आमदाराच्या जावयाचं नाव उमेदवारीसाठी पुढं
Pune Water Cut : पुणेकरांनो पाणी जपून वापरा; उद्या 'या' भागातील पाणीपुरवठा राहणार बंद, शुक्रवारीही कमी दाबाने येणार पाणी
पुणेकरांनो पाणी जपून वापरा; उद्या 'या' भागातील पाणीपुरवठा राहणार बंद, शुक्रवारीही कमी दाबाने येणार पाणी
Bank Holidays : दसरा दिवाळी ते गांधी जयंती, ऑक्टोबरमध्ये 1, 2, 3 नाहीतर तब्बल एवढ्या दिवस बॅंका राहणार बंद, यादी तपासा मगच घराबाहेर पडा
दसरा दिवाळी ते गांधी जयंती, ऑक्टोबरमध्ये 1, 2, 3 नाहीतर तब्बल एवढ्या दिवस बॅंका राहणार बंद, यादी तपासा मगच घराबाहेर पडा
Amit Shah: मराठवाडा-विदर्भासाठी अमित शाहांचं मायक्रो प्लॅनिंग; भाजपच्या कार्यकर्त्यांना म्हणाले, आपल्याला शरद पवारांना रोखायचंय
अमित शाहांनी बैठकीत भाजपच्या नेत्यांना टार्गेट स्पष्टच सांगितलं, म्हणाले, आपल्याला शरद पवारांना रोखायचंय!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nandurbar : आदिवासी नेत्यांनी भाजप, शिवसेनेची उमेदवारी घेऊ नये : वळवीABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 11 AM : 25 Sept 2024 : ABP MajhaAmit Shah BJP : पदाधिकारी, नेत्यांसह अमित शाहांच्या आजही बैठका, शाहांचा कार्यकर्त्यांना कानमंत्रAkshay Shinde Encounter : मूळ आरोपींना वाचवण्यासाठी अक्षयची हत्या, वडिलांचा आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कृषीमंत्री धनंजय मुंडेंसमोर नवं आव्हान? परळी मतदारसंघातून या आमदाराच्या जावयाचं नाव उमेदवारीसाठी पुढं
कृषीमंत्री धनंजय मुंडेंसमोर नवं आव्हान? परळी मतदारसंघातून या आमदाराच्या जावयाचं नाव उमेदवारीसाठी पुढं
Pune Water Cut : पुणेकरांनो पाणी जपून वापरा; उद्या 'या' भागातील पाणीपुरवठा राहणार बंद, शुक्रवारीही कमी दाबाने येणार पाणी
पुणेकरांनो पाणी जपून वापरा; उद्या 'या' भागातील पाणीपुरवठा राहणार बंद, शुक्रवारीही कमी दाबाने येणार पाणी
Bank Holidays : दसरा दिवाळी ते गांधी जयंती, ऑक्टोबरमध्ये 1, 2, 3 नाहीतर तब्बल एवढ्या दिवस बॅंका राहणार बंद, यादी तपासा मगच घराबाहेर पडा
दसरा दिवाळी ते गांधी जयंती, ऑक्टोबरमध्ये 1, 2, 3 नाहीतर तब्बल एवढ्या दिवस बॅंका राहणार बंद, यादी तपासा मगच घराबाहेर पडा
Amit Shah: मराठवाडा-विदर्भासाठी अमित शाहांचं मायक्रो प्लॅनिंग; भाजपच्या कार्यकर्त्यांना म्हणाले, आपल्याला शरद पवारांना रोखायचंय
अमित शाहांनी बैठकीत भाजपच्या नेत्यांना टार्गेट स्पष्टच सांगितलं, म्हणाले, आपल्याला शरद पवारांना रोखायचंय!
Beed: ज्ञानराधा मल्टीस्टेटवर ईडीची मोठी कारवाई, राज्यातील 4 शाखांमधील तब्बल 95 कोटींची संपत्ती जप्त 
ज्ञानराधा मल्टीस्टेटवर ईडीची मोठी कारवाई, राज्यातील 4 शाखांमधील तब्बल 95 कोटींची संपत्ती जप्त 
Padmakar Valvi: 'आदिवासी क्षेत्रातून शिवसेना, राष्ट्रवादी, भाजपाला हद्दपार करा', काँग्रेसमधून नुकतेच भाजपात आलेल्या नेत्याचं वक्तव्य, नेमकं काय म्हणाले?
'आदिवासी क्षेत्रातून शिवसेना, राष्ट्रवादी, भाजपाला हद्दपार करा', काँग्रेसमधून नुकतेच भाजपात आलेल्या नेत्याचं वक्तव्य, नेमकं काय म्हणाले?
Onion Import : कांद्याची आयात थांबवा अन्यथा, मंत्र्यांच्या गाडीवर कांदे फेकू, स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक 
कांद्याची आयात थांबवा अन्यथा, मंत्र्यांच्या गाडीवर कांदे फेकू, स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक 
Chandrashekhar Bawankule: भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या संस्थेला 5 कोटींचा भूखंड फुटकळ दरात बहाल
अजितदादांच्या अर्थखात्याचा विरोध डावलून चंद्रशेखर बावनकुळेंच्या संस्थेला 5 कोटींचा भूखंड फुटकळ दरात बहाल
Embed widget