एक्स्प्लोर

Rules Change from Today : आजपासून 'हे' 5 नियम बदलणार, बँक शुल्कात वाढीचा खिशावर परिणाम होणार

Financial Changes From 1st June 2022 : आज जून महिना सुरू होत आहे. आजपासून नवे आर्थिक बदल लागू होणार आहेत. 01 जूनपासून तुमच्या खिशावर मोठा परिणाम होणार आहे.

Rule Change from Today 1st June 2022 : आजपासून जून महिना सुरू झाला आहे. या वर्षी जून महिन्यात अनेक आर्थिक बदल (Financial Rule Change) लागू होणार आहेत. या बदलांच्या अंमलबजावणीमुळे तुमच्या अनेक आर्थिक व्यवहारांवर परिणाम होऊन याचा फटका तुमच्या खिशाला होणार आहे. आजपासून होणाऱ्या 5 आर्थिक बदलांबद्दल सविस्तर जाणून घ्या.

1. इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचं शुल्क वाढणार आहे (India Post Payment Bank Charges Hike)
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (IPPB) ने म्हटले आहे की, आता आधार सक्षम पेमेंट सिस्टमसाठी Issuer Charge भरावे लागेल. नियमांनुसार, दर महिन्याला पहिले तीन AEPS व्यवहार विनामूल्य असतील. ज्यात AEPS रोख पैसे काढणे, AEPS रोख ठेव आणि AEPS मिनी स्टेटमेंट समाविष्ट आहे. विनामूल्य व्यवहारांनंतर, प्रत्येक रोख पैसे काढणे किंवा रोख ठेवीवर 20 रुपये अधिक GST स्वतंत्रपणे लागू होईल, तर मिनी स्टेटमेंट व्यवहारावर 5 रुपये अधिक GST लागू होईल.

2. स्टेट बँक ऑफ इंडिया गृहकर्ज महाग (SBI Home Loan EMI To Be Costly) 
तुम्ही नवीन घर घेण्यासाठी SBI कडून गृहकर्ज घेण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला पूर्वीपेक्षा अधिक महाग व्याजावर गृहकर्ज मिळेल. ज्यामुळे EMI महाग होईल. SBI ने त्याचा होम लोन-लिंक्ड एक्सटर्नल बेंचमार्क लेंडिंग रेट (EBLR) 40 बेस पॉईंट्सने 7.05 टक्क्यांनी वाढवला आहे. तर रेपो-लिंक्ड लेंडिंग रेट (RLLR) 6.65 टक्के + CRP असेल. SBI च्या वेबसाईटनुसार वाढलेले व्याजदर 1 जून 2022 पासून लागू होतील. यापूर्वी एक्सटर्नल बेंचमार्क कर्ज दर (EBLR) 6.65 टक्के होता, तर रेपो-लिंक्ड लेंडिंग रेट (RLLR) 6.25 टक्के होता.

3. थर्ड पार्टी मोटर इन्शुरन्स प्रीमियममध्ये वाढ (Third Party Motor Insurance Premium Hike)
जर तुमच्याकडे वाहन असेल तर तुमचा खर्च वाढणार आहे. कारण 1 जूनपासून थर्ड पार्टी मोटर इन्शुरन्सचा प्रीमियम वाढणार आहे. यासंदर्भात सरकारने अधिसूचना जारी केली आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने वाहनांच्या विविध श्रेणींसाठी थर्ड पार्टी मोटर वाहन विम्याच्या प्रीमियममध्ये वाढ केली आहे, जी 1 जूनपासून लागू होईल. त्यामुळे कार आणि दुचाकीचा विमा महागणार आहे. अधिसूचनेत सुधारित दरानुसार, 1000 सीसी इंजिन क्षमतेच्या खाजगी कारसाठी प्रीमियम आता 2072 रुपयांच्या तुलनेत 2094 रुपये असेल. 1000 ते 1500 सीसी इंजिन असलेल्या खाजगी गाड्यांसाठी आता प्रीमियम 3221 रुपयांऐवजी 3416 रुपये असेल. तथापि, 1500 सीसी वरील खाजगी कारसाठी थर्ड पार्टी इन्शुरन्स प्रीमियममध्ये किरकोळ कपात करण्यात आली आहे आणि ती 7897 रुपयांवरून 7890 रुपयांपर्यंत खाली येईल. त्याचप्रमाणे, 150 ते 350 सीसी पर्यंतच्या दुचाकींसाठी 1366 रुपये प्रीमियम असेल. तर 350 सीसीपेक्षा जास्त क्षमतेच्या दुचाकींसाठी हा दर 2804 रुपये असेल.

4. गोल्ड हॉलमार्किंग (Gold Hallmarking)
1 जून 2022 पासून दुसऱ्या टप्प्यात आणखी काही जिल्ह्यांमध्ये गोल्ड हॉलमार्किंग लागू करण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यात देशातील 32 नवीन जिल्ह्यांमध्ये सोन्याच्या दागिन्यांचे हॉलमार्किंग सुरू होणार आहे. 1 जूननंतर देशातील एकूण 288 जिल्ह्यांमध्ये 14, 18, 20, 22, 23, 24 कॅरेट सोन्याचे दागिने हॉलमार्किंगसह विकले जातील. पहिला टप्पा भारतीय मानक ब्युरो (BIS) ने 23 जून 2021 पासून देशातील 256 जिल्ह्यांमध्ये अनिवार्य सोन्याचे हॉलमार्किंगसह सुरू केले होते.

5. ॲक्सिस बँके बचत खात्याच्या शुल्कात बदल (Changes in Axis Bank Savings Account Charges)
अॅक्सिस बँकेच्या बचत खात्याच्या शुल्कात बदल : अॅक्सिस बँकेने निम-शहरी आणि ग्रामीण भागातील बचत खात्यांसाठी आणि सॅलरी प्रोग्रॅम अंतर्गत उघडलेल्या बँक खात्यांसाठी किमान खाते शिल्लक मर्यादा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. जो 1 जूनपासून लागू होईल. सुलभ बचत आणि वेतन कार्यक्रम असलेल्या खात्यांसाठी किमान खाते शिल्लक मर्यादा 15,000 रुपयांवरून 25,000 रुपये करण्यात आली आहे. तसेच 1 लाख रुपयांची मुदत ठेव ठेवणे आवश्यक असेल. याशिवाय लिबर्टी बचत खात्यातील किमान खाते शिल्लक मर्यादा 15,000 रुपयांवरून 25,000 रुपये करण्यात आली आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Election : भाजपसोबत युतीसाठी राष्ट्रवादी आग्रही, अजितदादा- तटकरेंनी पक्षाचा आढावा मुख्यमंत्र्यांसमोर मांडला
भाजपसोबत युतीसाठी राष्ट्रवादी आग्रही, अजितदादा- तटकरेंनी पक्षाचा आढावा मुख्यमंत्र्यांसमोर मांडला
Pension Scheme : प्रायव्हेट नोकरी करताय तर निवृत्तीनंतर पेन्शनचा जुगाड करा, 'या' योजनेतून मिळतील दरमहा 5000 रुपये
प्रायव्हेट नोकरी करताय तर निवृत्तीनंतर पेन्शनचा जुगाड करा, 'या' योजनेतून मिळतील दरमहा 5000 रुपये
Disqualification of MLA : माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणामुळं आमदार अपात्रता चर्चेत , आमदार, खासदार कोणत्या कारणांमुळं अपात्र ठरतात?
माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणामुळं आमदार अपात्रता चर्चेत , आमदार, खासदार कोणत्या कारणांमुळं अपात्र ठरतात?
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे दोषी आहेत की नाही, आमदारकी राहणार की जाणार, कोर्टाचा निर्णय नेमका काय?
माणिकराव कोकाटे दोषी आहेत की नाही, आमदारकी राहणार की जाणार, कोर्टाचा निर्णय नेमका काय?

व्हिडीओ

Zero Hour Full नगराध्यक्षांच्या निकालाचा मनपा मतदानावर परिणाम होईल? मुंबईत महायुतीला कोणाचं आव्हान!
Special Report Manikrao Kokate माणिकराव कोकाटे संकटाच्या चक्रव्यूहात, कोकाटेंचं राजकीय भवितव्य काय?
Manikrao Kokate बायपास सर्जरी करावी लागणार, कोकाटेंचं मेडिकल बुलेटीन, डॉक्टरांनी सगळं सांगितलं
Adv Ashutosh Rathod : कोकाटेंची आमदारकी गेली की राहिली? याचिकाकर्ते राठोड यांनी स्पष्ट सांगितलं
माणिकराव कोकाटेंच्या अटकेला स्थगिती, उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election : भाजपसोबत युतीसाठी राष्ट्रवादी आग्रही, अजितदादा- तटकरेंनी पक्षाचा आढावा मुख्यमंत्र्यांसमोर मांडला
भाजपसोबत युतीसाठी राष्ट्रवादी आग्रही, अजितदादा- तटकरेंनी पक्षाचा आढावा मुख्यमंत्र्यांसमोर मांडला
Pension Scheme : प्रायव्हेट नोकरी करताय तर निवृत्तीनंतर पेन्शनचा जुगाड करा, 'या' योजनेतून मिळतील दरमहा 5000 रुपये
प्रायव्हेट नोकरी करताय तर निवृत्तीनंतर पेन्शनचा जुगाड करा, 'या' योजनेतून मिळतील दरमहा 5000 रुपये
Disqualification of MLA : माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणामुळं आमदार अपात्रता चर्चेत , आमदार, खासदार कोणत्या कारणांमुळं अपात्र ठरतात?
माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणामुळं आमदार अपात्रता चर्चेत , आमदार, खासदार कोणत्या कारणांमुळं अपात्र ठरतात?
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे दोषी आहेत की नाही, आमदारकी राहणार की जाणार, कोर्टाचा निर्णय नेमका काय?
माणिकराव कोकाटे दोषी आहेत की नाही, आमदारकी राहणार की जाणार, कोर्टाचा निर्णय नेमका काय?
Success Story : तीन सख्खे भाऊ MPSC उत्तीर्ण, एकाच गावातील 15 पोरं अधिकारी, उखलगावच्या चंदन बंधूंचे प्रेरणादायी यश
तीन सख्खे भाऊ MPSC उत्तीर्ण, एकाच गावातील 15 पोरं अधिकारी, उखलगावच्या चंदन बंधूंचे प्रेरणादायी यश
Epstein files India: अमेरिकेत दिवस उजाडला, एपस्टीन फाईल्ससाठी राहिले अवघे काही तास! काय काय बाहेर येणार? यादी समोर
अमेरिकेत दिवस उजाडला, एपस्टीन फाईल्ससाठी राहिले अवघे काही तास! काय काय बाहेर येणार? यादी समोर
Gold Rate : भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण, जाणून घ्या नवे दर
भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण, जाणून घ्या नवे दर
Nagpur Butibori MIDC : टँक टॉवर कोसळून नागपूरच्या बुटीबोरी MIDCमध्ये मोठी दुर्घटना; तीन मजुरांचा मृत्यू, तर 11 जण जखमी, बचावकार्य सुरू
टँक टॉवर कोसळून नागपूरच्या बुटीबोरी MIDCमध्ये मोठी दुर्घटना; तीन मजुरांचा मृत्यू, तर 11 जण जखमी, बचावकार्य सुरू
Embed widget