Share Market: शेअर मार्केटवर युद्धाचं सावट कायम; Sensex 778 अंकानी तर Nifty 187 अंकांनी घसरला
Share Market: बँक, रिअॅलिटी आणि ऑटो इंडेक्समध्ये 1 ते 2 टक्क्यांची घसरण झाली आहे.

मुंबई: रशिया-युक्रेन युद्धाचे परिणाम अजूनही शेअर बाजारावर होत असून आजही बाजारात मोठी पडझड झाल्याचं दिसून आलं आहे. आज शेअर बाजार बंद होताना सेन्सेक्स 778 अंकांनी घसरला आहे तर निफ्टीही 187 अंकानी घसरला आहे. सेन्सेक्समध्ये 1.38 टक्क्यांची घसरण होऊन तो 55,468 वर पोहोचला आहे तर निफ्टीमध्ये 1.12 टक्क्यांची घसरण होऊन तो 16,605 वर पोहोचला आहे.
आज 1642 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे तर 1537 शेअर्समध्ये घसरण झाली आहे. 101 कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमतीत कोणताही बदल झाला नाही.
आज बाजार बंद होताना ऑटो आणि बँक सेक्टरच्या शेअर्समध्ये विक्री झाल्याचं दिसून आलं आहे. या शेअर्समध्ये दोन टक्क्यांपर्यंतची घसरण झाली आहे. तर मेटल आणि उर्जा क्षेत्रातील शेअर्समध्ये काहीशी वाढ झाली आहे.
या कंपन्यांचे शेअर्स वधारले
- Coal India- 8.99 टक्के
- HDFC Life- 7.19 टक्के
- SBI Life Insurance- 5.75 टक्के
- Tata Steel- 5.62 टक्के
- Hindalco- 4.59 टक्के
या कंपन्यांचे शेअर्स घसरले
- Maruti Suzuki- 6.01 टक्के
- Dr Reddys Labs- 5.17 टक्के
- Asian Paints- 4.59 टक्के
- Bajaj Auto- 4.48 टक्के
- Hero Motocorp- 4.30 टक्के
सत्राची सुरुवात घसरणीने
सकाळी शेअर बाजार सुरू झाल्यानंतर सेन्सेक्स 618 अंकांच्या घसरणीसह उघडला. निफ्टी 200 अंकांनी घसरला होता. सेन्सेक्स 55,629 वर सुरू झाला तर, निफ्टी 16593 अंकांवर सुरू झाला. सकाळी 10.12 वाजता सेन्सेक्स 801 अंकांनी तर, निफ्टी 196 अंकांनी घसरला होता. शेअर बाजारात विक्रीचा दबाव कायम आहे.
संबंधित बातम्या :























