Education Budget 2024 : 3000 ITI, 1.4 कोटी युवकांना प्रशिक्षण; शिक्षण क्षेत्रासाठी अर्थसंकल्पात काय तरतूद? जाणून घ्या महत्वाचे मुद्दे
वेगाने वाढणारी लोकसंख्या आणि विकास यातून निर्माण होणाऱ्या आव्हानांचा सामना कसा करावा, यासंदर्भात शिफारशी करण्यासाठी एक उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्यात येईल, अशी माहिती निर्मला सीतारमण यांनी दिली आहे.
Budget 2024: संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी आज (गुरूवार) देशाचा अंतरीम अर्थसंकल्प सादर केला. यावेळी अर्थसंकल्पात शिक्षण क्षेत्राशी संबंधित अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. लोकसभेत देशाचा अर्थसंकल्प सादर करताना निर्मला सीतारमण यांनी सांगितलं की, शिक्षण क्षेत्रात मोठे बदल करण्यात आले आहे. 3000 नव्या आयटीआयची स्थापन करण्यात येणार आहे, स्किल इंडिया अंतर्गत 1.8 कोटी युवकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच 54 लाख उमेदवारांना को री- स्किल आण अप स्किल करण्यात आले आहे. देशात 157 नवीन नर्सिंग कॉलेज सुरू करण्याची घोषणा करण्यात आली आहे.
शाळेपासून ते हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटची केली स्थापना
शिक्षण क्षेत्रात मोठे बदल झाले आहे. पीएम श्री स्कूल मुलांना चांगल्या दर्जाचे शिक्षण देक आहे. जर उच्च शिक्षणाबद्दल बोलायचे झाले तर 7 आयआयआयटी, सात आययआयएम, 16 एम्स आणि 390 विद्यापिठांची स्थापना करण्यात येणार आहे.
रोजगाराच्या संधी वाढल्या
युवकांना जास्तीत जास्त रोजगाराच्या संधी मिळण्यासाठी अनेक योजना आणण्यात आल्या आहे. स्टार्टअप गॅरंटी स्की, फंड ऑफ फंड्स आणि स्टार्टअप इंडियाद्वारे युवकांना रोजगार मिळण्यास मदत झाली आहे. याची मदत तरुणांना होणार आहे.
नवे मेडिकल कॉलेज सुरू करणार
अर्थसंकल्प सादर करताना नवे मेडिकल कॉलेज सुरू करण्याची सरकारची योजन असल्याचे अर्थमंत्री सीतारमण यांनी सांगितले. तसेच या संदर्भात एका कमिटीची स्थापना करण्यात आली आहे. तसेच रुग्णालयाच्या इन्फ्रास्ट्रक्चरवर देखील भर देण्यात येणार आहे
गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी शिक्षण क्षेत्रासाठी अधिकची तरतूद
शिक्षण क्षेत्राला या वर्षी जास्त तरतूद करण्यात आली आहे. या वर्षी शिक्षण क्षेत्रासाठी 1,12,898.97 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
स्किल इंडियामध्ये 1.47 कोटी तरूणांना प्रशिक्षण
प्रत्येकाला कायमस्वरूपी घरे दिली जातील. स्किल इंडियामध्ये 1.47 कोटी तरुणांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. पंतप्रधान मत्स्य संपदा योजनेचा विस्तार केला जाईल. मत्स्य उत्पादनात दुपटीने वाढ झाली आहे. पीएम मोदींनी 'जय जवान, जय किसान, जय विज्ञान, जय अनुसंधान'चा नारा दिला आहे. हे लक्षात घेऊन पावले उचलली जातील. गेल्या 4 वर्षात आर्थिक विकासाला वेग आला आहे. युवाशक्ती तंत्रज्ञानयुक्त योजना बनवेल.
हे ही वाचा :
Union Budget 2024 : एक कोटी महिलांना लखपती दीदी बनवलं, दरमहा 300 युनिट वीज मोफत; निर्मला सीतारमण यांच्या बजेटच्या भाषणातील दहा मोठे मुद्दे
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI