Budget 2024 Jobs: देशातील नोकऱ्या वाढवण्यासाठी मोदी सरकारच्या तीन गेमचेंजर योजना, पहिल्यांदा नोकरीला लागणाऱ्या तरुणांना 15 हजारांचा Incentive
Union Budget Updates: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्प मांडताना महत्त्वाच्या घोषणा केल्या. संघटित क्षेत्रात पहिल्यांदा नोकरीला लागणाऱ्या तरुण-तरुणींना 15 हजार रुपये मिळणार.
नवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी एनडीए सरकारचा पहिला अर्थसंकल्प संसदेत मांडला. काहीवेळापूर्वीच निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पाच्या वाचनाला सुरुवात केली. या अर्थसंकल्पात (Budget 2024) देशातील रोजगार वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण योजनांची घोषणा करण्यात आली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन (nirmala Sitharaman) यांनी रोजगार आणि कौशल्य विकासासाठी तीन नव्या योजनांबाबत संसदेत माहिती दिली. या योजनांच्या माध्यमातून पहिल्यांदा नोकरीला लागणाऱ्या तरुणांना केंद्र सरकारकडून प्रोत्साहनपर भत्ता दिला जाणार आहे.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधीसाठी होणाऱ्या नोंदणीच्याआधारे हा प्रोत्साहनपर भत्ता दिला जाईल. पहिल्यांदा नोकरीला लागणाऱ्या तरुणांना आणि त्यांच्या कंपन्यांना या योजनांमुळे फायदा होणार आहे. या तीन योजनांपैकी पहिल्या म्हणजे स्कीम ए मध्ये संघटित क्षेत्रात पहिल्यांदा कामाला लागणाऱ्या तरुणांना प्रोत्साहनपर भत्ता दिला जाईल. या नोकरदारांच्या बँक खात्यात तीन टप्प्यांत थेट पैसे जमा केले जातील. या योजनेनुसार नव नोकरदारांना 15 हजारापर्यंतचा प्रोत्साहनपर भत्ता अर्थात Incentive दिला जाईल. महिन्याला 1 लाख रुपयापर्यंत वेतन असणारे नोकरदार या योजनेसाठी पात्र असतील. हे पैसे EPFO खात्यात जमा होतील. या योजनेमुळे 2 कोटी 10 लाख तरुणांना फायदा होईल, असे निर्मला सीतारामन यांनी सांगितले.
रोजगार आणि कौशल्य विकास स्कीम बी योजना
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी घोषणा केलेल्या स्कीम बी योजनेचे प्रमुख उद्दिष्ट उत्पादन क्षेत्रातील रोजगार वाढवणे हे आहे. त्यासाठी पहिल्यांदा नोकरीला लागणारे तरुण आणि त्यांची कंपनी या दोघांनाही भविष्य निर्वाह निधीत जमा करणाऱ्या रक्कमेच्या हिशेबाने इन्सेन्टिव्ह देण्यात येईल. पहिले चार वर्ष संबंधित नोकरदार आणि संबंधित कंपनीला हा प्रोत्साहनपर भत्ता दिला जाईल.
स्कीम सी रोजगार आणि कौशल्य विकास
नव्याने नोकरीला लागणाऱ्या नोकरदारांना पाठिंबा देण्यासाठी केंद्र सरकारच्या रोजगार आणि कौशल्य विकास स्कीम सी अंतर्गत सर्व क्षेत्रातील नोकरदारांना प्रोत्साहनपर भत्ता दिला जाईल. एखादा तरुण पहिल्यांदा नोकरीला लागल्यानंतर त्याची कंपनी भविष्य निर्वाह निधीसाठी किती पैसे जमा करते, याआधारे संबंधित नोकरदाराला दोन वर्षे महिन्याला 3000 रुपयांपर्यंतची रक्कम परत केली जाईल. यामुळे 50 लाख अतिरिक्त रोजगार निर्माण होण्यास मदत होईल, असा दावा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला.
बजेटमध्ये तरुणांसाठी काय?
* खाजगी क्षेत्राच्या सहकार्याने ई-कॉमर्स निर्यात केंद्र तयार केले जाईल आणि तरुणांच्या इंटर्नशिपसाठी सर्वसमावेशक योजना आणली जाईल.
* 5 वर्षात टॉप 500 कंपन्यांमध्ये 1 कोटी तरुणांना इंटर्नशिप, 100 शहरांमध्ये औद्योगिक पार्क विकसित केले जातील.
* MSME हमी योजनेअंतर्गत 100 कोटी रुपयांपर्यंतची कर्जे उपलब्ध होतील, PSU बँकांनी अंतर्गत मूल्यांकनानंतर MSME ला कर्ज द्यावे. MUDRA कर्ज मर्यादा 10 लाख रुपयांवरून 20 लाख रुपयांपर्यंत वाढवली आहे. MSME ला मदत करण्यासाठी SIDBI शाखा वाढवल्या जाणार आहेत.
#WATCH | #Budget2024 | Finance Minister Nirmala Sitharaman says, "I am happy to announce the Prime Minister's package of 5 schemes and initiatives to facilitate employment, skilling and other opportunities for 4.1 crore youth over 5 years with a central outlay of Rs 2 lakh… pic.twitter.com/E0ooxhs4fy
— ANI (@ANI) July 23, 2024
आणखी वाचा