मोठी बातमी! अॅमेझॉन कंपनी 18 हजाराहून अधिक कर्मचाऱ्यांना देणार नारळ
Amazon : ॲमेझॉन (Amazon) कंपनीत मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांची कपात होणार आहे. अॅमेझॉन आपल्या 18,000 हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार आहे.
Amazon : ई-कॉमर्स क्षेत्रातील दिग्गज कंपनी ॲमेझॉन (Amazon) कंपनीत मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांची कपात होणार आहे. अॅमेझॉन आपल्या 18,000 हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार आहे. याबाबतची माहिती खुद्द ॲमेझॉन कंपनीचे मुख्य कार्यकारी अँडी जॅसी यांनी दिली आहे. तंत्रज्ञान क्षेत्रातील मंदीचा फटका ॲमेझॉन कंपनीला देखील बसला आहे.
कोविड 19 काळात अॅमेझॉनने मोठ्या संख्येने लोकांची भरती करुन त्यांना कामावर ठेवले होते. परंतू, कंपनीला आता आपला हाच निर्णय जड जात आहे. त्यामुळेच कंपनी नोकरकपात करण्याचा मोठा निर्णय घेणार आहे. 18 हजार कर्मचार्यांची कपातीचा अर्थ असा आहे की कंपनी 70 टक्के नोकऱ्या कमी करण्याचा विचार करत आहे. अॅमेझॉनने ही नोकरकपात केली तर कोणत्याही ई-कॉमर्स कंपनीमध्ये आतापर्यंतची ही सर्वात मोठी कॉस्ट कटिंग असेल.
जागतिक मंदीचा फटका देशातील अनेक कंपन्यांना
कंपनीच्या व्यवसायावर होणारा परिणाम पाहता कर्मचाऱ्यांची कपात करणं गरजेचं असल्याचं मत ॲमेझॉन कंपनीचे मुख्य कार्यकारी अँडी जॅसी यांनी व्यक्त केलं आहे. ज्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आलं आहे, त्यांना याबाबतची माहिती 18 जानेवारीपासून मिळणार आहे. ही नोकरकपात कंपनीत काम करणाऱ्या एकूण कर्मचाऱ्यांच्या सुमारे सहा टक्के आहे. जागतिक मंदीचा फटका देशातील अनेक कंपन्यांना बसला आहे. कंपन्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळं अनेक बड्या कंपन्यांनी नोकरकपात करत कंपनीचा खर्च कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. अशातच आता अॅमेझॉन कंपनीनं देखील नोकरकपात करण्याचा निर्णय घेतला आहे.
काही दिवसापूर्वीच ॲमेझॉन केली होती 10 हजार कर्मचाऱ्यांची कपात
दरम्यान, मागील काही दिवसापूर्वीच ॲमेझॉन कंपनीने आपल्या 10 हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करण्याचा निर्णय घेतला होता. ही ॲमेझॉनमधील सर्वात मोठी नोकरकपात असल्याचं बोललं जात होते. मात्र, त्यानंतर आता ॲमेझॉन कंपनीने 18 हजार कर्मचाऱ्यांना नारळ देण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी मायक्रोसॉफ्ट ( Microsoft ), नंतर ट्विटर ( Twitter ) आणि त्यानंतर फेसबुकची (Facebook ) मालकी असलेली मेटा ( Meta ) या कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना कामावरून हटवलं आहे. या कंपन्यांकडून अचानक झालेल्या नोकरकपातीमुळे सर्वांनाच धक्का बसला. त्यानंतर आता ॲमेझॉनही कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
Amazon Layoff : ॲमेझॉन कंपनीमधील सर्वात मोठी नोकरकपात, 10,000 कर्मचाऱ्यांना हटवणार