BLOG | प्रतीक्षा 'संसर्गाच्या चाचपणी' अहवालाची
आठवड्याभरापूर्वी आपल्याच देशातील काही वैद्यकीय तज्ज्ञांनी आणि संघटनांनी कोरोनाच्या सामाजिक प्रसाराच्या टप्प्यास सुरुवात झाली असल्याचे वृत्त माध्यमांमध्ये छापून आले आहे. मात्र यावर फारस कुणी भाष्य केले नव्हते.
सध्या देशभरात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झपाट्याने होताना दिसत आहे. आरोग्य यंत्रणा रुग्ण बरे व्हावे म्हणून शक्यतो सर्व प्रयत्न करीत आहे. प्लाझ्मा थेरपीच्या वापराबरोबर रुग्ण बरा होण्याचा कालावधी कमी होण्याकरिता इतर देशातून रेमेडिसिवीर औषध विकत घेत आहे. या सर्व गोष्टी घडत असल्या तरी आता खरी प्रतीक्षा आहे ती काही दिवसापूर्वी देशात कोरोनाच्या संसर्गाचा फैलाव देशात किती प्रमाणात झाला आहे तसेच विषाणूचा प्रसार कशा पद्धतीने होत आहे. याकरिता भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र आणि राष्ट्रीय क्षयरोग संशोधन केंद्राने 21 राज्यातील 69 जिल्ह्यात स्वैर (रँडम) चाचणी घेतली होती, त्या संसर्गच्या चाचपणी अहवालाची. या अहवालामुळे देशात या आजराचा किती प्रादुर्भाव झाला आहे हे कळणार असून त्यामुळे वैद्यकीय तज्ज्ञांना कोरोनासंदर्भांतील पुढील दिशा ठरविण्यासाठी मदत होऊ शकणार आहे. काही दिवसात हा अहवाल तयार होणार असून अजून 8 जिल्ह्यातील निकाल येणे अपेक्षित त्यानंतर त्याचं विश्लेषण केले जाणार आहे.
वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, साथीच्या रोगात असा 'समाजात संसर्गाचा फैलाव झाला आहे की नाही याच्या चाचपणीचा अहवाल' अत्यंत महत्वपूर्ण ठरतो. या अहवालाचा पूर्ण निकाल येण्यास काही दिवस आहेत. त्यानंतरच या आजाराचं समाजातील वर्तन कसं आहे हे आरोग्य विभागास कळणार आहे. तसेच देशातील कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या शहरात या विषाणूचा वावर कसा आहे. काही वेळा अनेकांना याची बाधा होऊन गेली असेल मात्र त्यांना याची माहितीही होत नसल्याची शक्यता नाकारता येत नाही, ज्या पद्धतीने लक्षणविरहित रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे या अहवालाची प्रतीक्षा सगळ्यानांच आहे. त्यावर कोरोनसंदर्भातील नवीन धोरण ठरविण्यास केंद्र सरकारला फायदा होणार आहे. त्याचप्रमाणे नागरिकांनी आणखी कोणती काळजी घ्यायची का ? हे सुद्धा निश्चित होण्यास मदत होईल.
आठवड्याभरापूर्वी आपल्याच देशातील काही वैद्यकीय तज्ज्ञांनी आणि संघटनांनी कोरोनाच्या सामाजिक प्रसाराच्या टप्प्यास सुरुवात झाली असल्याचे वृत्त माध्यमांमध्ये छापून आले आहे. मात्र यावर फारस कुणी भाष्य केले नव्हते. वैद्यकीय तज्ज्ञांनी केलेल्या मांडणीनुसार साथीच्या प्रसाराचे चार टप्पे असतात. त्यात पहिल्या टप्प्यात बाधित देशातून आलेल्या प्रवाशांना साथीच्या आजाराचा संसर्ग झालेला असतो तर या प्रवाशाच्या संपर्कात आलेल्या लोकांना या आजाराची लागण होत असते, आणि तिसरा टप्पा म्हणजे म्हणजे कुठलाही प्रवास न केलेले आणि या बाधित लोकांच्या संपर्कात न आलेल्या व्यक्तींना या आजाराची लागण मोठ्या प्रमाणात व्यक्तींना होते. या टप्प्यात संसर्गाची लागण समाजामध्ये पसरत असते. या तिसऱ्या टप्प्यात संसर्गाचा प्रसार कसा होतो, याबाबत छडा लावणे मुश्किल होत जाते. कारण एक विशिष्ट भागात शहरात किंवा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रुग्ण दिसायला लागतात, त्यावेळी समूह संसर्गाला सुरुवात होते असे म्हटले जाते.
या सर्वेक्षणात प्रत्येक जिल्ह्यातील 400 नागरिकांचे रक्ताचे नमुने घेऊन आयजीजी (इम्युनोग्लोबीन) एलिसा चाचणी करण्यात आली आहे. यामुळे या चाचणी करण्यात येणाऱ्या नागरिकांच्या शरीरात प्रतिकारक शक्ती बहाल करणाऱ्या पेशी (अँटीबॉडीज) निर्माण झाल्या आहे का? त्याचे प्रमाण किती आहे?, तसेच त्यांना यापूर्वीच कोणत्या विषाणूचा प्रादुर्भाव झाला आहे का? हे कळण्यात मदत होणार आहे. ही चाचणी काही दिवसापूर्वीच, पुणे येथील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने (एनआयव्ही) कोविड-19 साठी अँटीबॉडीज शोधण्यासाठी स्वदेशी आयजीजी एलिसा चाचणी विकसित आणि प्रमाणित केली आहे त्यांच्या साहाय्याने करण्यात आली आहे. संसर्गाच्या संपर्कात असलेल्या लोकसंख्येचे प्रमाण समजून घेण्यासाठी, देखरेखीसाठी तसेच विषाणूचा संक्रमण किती प्रमाणात होत आहे याकरिता अँटीबॉडीज चाचणी महत्त्वपूर्ण आहे.
कोणत्याही विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर शरीरातील प्रतिकारशक्ती अधिक क्रियाशील होते. या विषाणूचा सामना करण्यासाठी प्रतिकारक शक्ती बहाल करणाऱ्या पेशी (अँटीबॉडीज) तयार होतात. त्यामुळे ज्या रुग्णांची प्रतिकारक शक्ती बहाल करणाऱ्या पेशी (अँटीबॉडीज) चाचणी पॉजिटीव्ह येते, त्यामुळे त्या व्यक्तीला संसर्ग झाला असल्याची शक्यता नाकारता येत नाही.
भारतातील कोरोनाबाधितांची संख्या 2 लाख 66 हजारांच्या वर गेली असून 7,466 व्यक्ती आजारामुळे मृत झाले आहेत. महाराष्ट्रात रुग्णांची संख्या 88,528 असून, गुजरात मधील रुग्णांची संख्या 20,545 असून तामिळनाडूमध्ये हीच संख्या 33, 229 तर दिल्लीमध्ये 29,943 आणि राजस्थानमध्ये 10,763 इतकी रुग्ण संख्या आहे.
कोविड-19 हा साथीचा आजार 213 देशांमध्ये पसरला असून एकूण 72,14,495 लोकांना याची लागण झाली असून 4,09, 033 जण मृत्यूमुखी पडले आहेत. ज्या चीन देशातून या कोरोना विषाणूची सुरुवात झाली त्या देशाची रुग्णसंख्या सध्याच्या घडीला 83 हजार 43 इतकी आहे, आणि 4,634 जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांना रुग्णसंख्येचं आकडा रोखण्यात यश प्राप्त झाले आहे.
त्यामुळे लवकरच हा अहवाल केंद्र सरकार प्रसिद्ध करेल आणि नागरिकांनी या संदर्भात काही काळजी घ्यायची आहे का? हे लक्षात येईल.
संतोष आंधळे यांचे अन्य ब्लॉग
- BLOG | डायलिसिसच्या रुग्णांना वाट दिसू देगं देवा .....
- BLOG | दाताचा ठणका आणि कोरोना
- BLOG | कोई भी लेलो .... लाल, काला, पिला मास्क
- BLOG | होम कॉरंटाईन वर निष्ठा वाढवेल आपली प्रतिष्ठा
- BLOG | मला कोरोना झाल्यासारखं वाटतंय...
- सोशल डिस्टन्ससिंग म्हणजे काय असतं रे भाऊ?
- BLOG | कोरोनाशी भिडण्याची हीच ती वेळ!
- BLOG | आम्ही बिनधास्त काम करू
- दुःखावर अंकुश ठेवणारा कोरोना
- BLOG | देवभूमीचा कोरोनाशी यशस्वी लढा
- BLOG | 'चाचपणी' संसर्गाच्या फैलावाची
- BLOG | कोरोना, टोळधाड अन् चक्रीवादळ कसं जगायचं!
- BLOG | खासगी रुग्णालयाचं 'हे' वागणं बरं नव्हं
- BLOG | आता तरी 'बेड' मिळतील का?