एक्स्प्लोर

'पॉवरफूल' पवार  

तर असे हे पन्नास वर्षे राजकारणातला अनुभव असलेले, विविध सरकार घडताना, बिघडताना ज्यांनी पाहिलं,त्यात महत्वाची भूमिका निभावली ते शरद पवार 2019 च्या निवडणुकीत बाह्या सरसावून तयार झालेत.. कुस्तीच्या मैदानातील ते तेल लावलेले, कोणाच्या पण हाताला न लागणारे खेळाडू आहेत.. शरद पवार संपले म्हणणाऱ्यांना 23 मे ला कदाचित धक्का बसू शकेल.

वय वर्ष 78... सभा 80 हून अधिक 2019 लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांचं वय 78 च्या आसपास आणि त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत घेतलेल्या सभांची संख्या 80 हून अधिक आहे. असं नेमकं काय झालं की शरद पवार यावेळी इतक्या आक्रमक पद्धतीने मैदानात उतरले? 2014 ला झालेल्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेत पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या चार जागा निवडून आल्या. काँग्रेस 2 जागांवर उरली. असं असलं तरी राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात पवार गेली चार वर्षे चर्चेत होते. विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमुळे फडणवीस सरकार तरले. ही चर्चा तर पहिल्या दिवसापासून सुरू झाली. त्यानंतर पवार आणि पंतप्रधान मोदी यांची जवळीक. बारामतीमध्ये येणारे विविध भाजपचे केंद्रीय नेते, त्यांचे पवारांबाबत कौतुक सोहळे. महाराष्ट्राला कळेना नेमकी काय सुरु आहे. अगदी 2014 निवडणुकीत बारामतीमध्ये कमळच्या चिन्हावर भाजपने निवडणूक लढवली नाही. पण वर्ष 2019 येईपर्यंत मात्र पवार काका दिल्लीत भाजप विरोधातील सर्व विरोधी पक्षांचे केंद्रबिंदू ठरले. दिल्लीत 6 जनपथवर विविध प्रादेशिक पक्षांच्या बैठका व्हायला लागल्या. 2019 मध्ये संपूर्ण देशात एक आघाडी ऐवजी त्या त्या राज्यात भाजप विरुद्ध आघाडी होण्याचे संकेत सगळ्यात आधी शरद पवार यांनी दिले. राज्यात देखील काँग्रेस राष्ट्रवादीने आघाडीसाठी प्रयत्न सुरू केले. जागावाटपापासून अनेक ठिकाणी राष्ट्रवादीने भूमिका flexibal ठेवली. 50-50 टक्के जागावाटप ,पुणे किंवा इतर जागांचा आग्रह कुठे ही पवारांनी ताणून धरलं नाही. दक्षिण नगरची सुजय विखे पाटील यांना हवी असणारी एक जागा ही एक घटना सोडली तर पवारांनी कुठेही मित्र पक्षाला अडचणीत आणलं नाही. राष्ट्रवादीने डिसेंबर, जानेवारी पर्यंत आपले उमेदवार ठरवले. उमेदवारांना काम करायला सांगितलं. ज्या जागांवर पक्षात मतभेद होते. तिथे स्वतः पवार नेत्यांना घेऊन बसले. कोल्हापूर, सातारासारख्या ठिकाणी पवारांनी चार-पाच बैठका घेतल्या. पण कुठेही उमेदवारी निवडीत गडबड झाली नाही. माढाबाबत शरद पवार यांनी निवडणूक लढवावी ही पक्षाची इच्छा होती, पण पार्थ पवारला मावळमध्ये संधी द्यायचा निर्णय घेत गृह कलह टाळण्याचा निर्णय शरद पवार यांनी घेतला. माढ्यात मोहिते पाटील यांच्या निघून जाण्याने राष्ट्रवादीला धक्का बसणार नाही, याची काळजी त्यांनी नीट घेतली. 15 जागांचे लक्ष्य मग यावेळी शरद पवारांनी इतकी मेहनत का घेतली? यावेळी राहट्रवादी काँग्रेसच्या 15 जागा निवडून येण्याचे लक्ष्य राष्ट्रवादी काँग्रेसने ठेवले. कोणत्या जागा आहेत ज्या येऊ शकतात, तिथे फटका बसणार नाही याची काळजी पक्षाने घेतली. ज्या जागांवर फाईट आहे तिथे राष्ट्रवादीच्या विजयासाठी जे जे करता येईल ते ते पवारांनी केलं. बीड, नगर यासारख्या जागांवर स्वतः शरद पवार यांनी दोन दोन सभा घेतल्या. पक्ष कार्यकर्त्यांच्या भेटी वेगळ्या. मतदारसंघात आमदार काम करत आहेत का यावर शरद पवार यांचे बारीक लक्ष होते. कोणी काम करत नाही जाणवलं की पवार स्वतः one on one त्या आमदारांशी बोलले. राज्यातील नेत्यांना जागा वाटून दिल्या होत्या. ते नेत्यांकडून पवार वेळोवेळी काय सुरु आहे याची माहिती घ्यायचे. बारामतीमध्ये भाजपने यावेळी सुप्रिया सुळे यांनी कोंडी करण्याचा प्रयत्न केला. पण पवारांनी बारामतीत गाव पातळीवर बैठका घेतल्या. खाली आमदारांबरोबर बैठका घातल्या, समनव्य केला. स्वतः अजित पवार बारामती, मावळ आणि शिरूर या मतदारसंघात तळ ठोकून होते. पण पवारांनी मात्र महाराष्ट्र पिंजून काढला. अगदी विदर्भातही मित्र पक्षाच्या उमेदवारासाठी अमरावती इथे जाऊन सभा घेतली. इतक्या उन्हात .. पवारांची हिप सर्जरी झाली आहे. तरीही रस्त्यावरून प्रवास करत जागोजागी  पोहोचले. नुसते आपल्याच नाही तर काँग्रेस पक्षाला पण पवारांनी मदत केली. एकीकडे काँग्रेस पक्षात विखे पाटील यांच्या मुलाने पक्ष सोडला. विखे पाटील नगर मध्ये भाजपसाठी प्रचार करत राहिले, अशोक चव्हाण नांदेड मध्ये अडकले. काँग्रेसचे नेते आहेत कुठे, राहुल गांधी पण महाराष्ट्राला कमी सभा दिल्या. अशा वेळी पवारांनी काँग्रेसच्या उमेदवारांसाठी सभा घेतल्या. सोलापूर, धुळे, शिर्डी, मुंबईत मिलिंद देवरा, उर्मिला मातोंडकर यांच्यासाठी सभा घेतल्या. राधाकृष्ण विखे पाटील यांनीच आरोप केला की काँग्रेस पक्ष राष्ट्रवादीला दावणीला बांधला गेला. म्हणजे विचार करा, पवारांनी किती लक्ष घातले की काँग्रेस पक्षांतर्गत इतका गोंधळ असताना सावरून घेऊन प्रचारात, मतदानाच्या टप्प्यात नुकसान होऊ नये, एक momentum टिकावा म्हणून काळजी घेतली. स्वाभिमानी शेतकरी संघटना आघाडीत आली पण दोन जागा मिळाव्या यासाठी राहुल गांधीपासून राज्यातील नेत्यांबरोबर समनव्य ठेवला. सांगलीत  वसंतदादा पाटील घरात वाद पेटल्यावर शरद पवार त्यांनी गोष्टी संभाळून घेतल्या. राजू शेट्टी, विशाल पाटील यांना निवडणुकीत प्रत्येक मदत केली..त्यांच्या ही संपर्कात पवार होते, कुठे काय सुरुये, मदत हवी याची काळजी घेतली. शरद पवार यांना ऐनवेळी संभ्रमात टाकणारी वक्तव्य करण्याची सवय आहे. त्यामुळे काँग्रेसच्या गोटात अस्वस्थता असते. पण या निवडणुकीत शेवटपर्यंत पवारांनी कोणतीही अशी कृती किंवा वक्तव्य करणं टाळलं ज्यामुळे मित्र पक्ष अस्वस्थ होईल. तरी शेवटच्या टप्प्यात त्यांनी मायावती, ममता, आणि चंद्राबाबू नायडू याबाबत वक्तव्य करून पिल्लू सोडलं. *राज ठाकरे factor* महाराष्ट्रातील या निवडणुकीतील सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर होता तो राज ठाकरे यांच्या सभा. राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी आणि भाजपची पोलखोल केली. मोदी आणि शाह यांची जुनी वक्तव्य, निवडणुकीच्या काळात आधी मोदींनी दिलेली आश्वासन आणि झालेली काम हेच व्हिडीओ presentation देत भाजप सरकारच्या दाव्यातील हवा काढून टाकली. पण निवडणुकीच्या तोंडावर ज्या ज्या ठिकाणी आघाडीला सकारात्मक वातावरण आहे, जिथे थोडा पुश हवा होता, तिथे राज ठाकरेंच्या सभा झाल्या. शरद पवार यांच्या प्रकट मुलाखतीनंतर हे स्पष्ट झालं की यावेळी आघाडीसाठी राज ठाकरे हुकुमाचा एक्का ठरणार. ग्रामीण भागात जिथे मोदी सरकार विरोधात नोटबंदी, जीएसटी मुळे जनता वैतागली होती, तिथे राज ठाकरेच्या भाषणांनी भाजप विरुद्ध वातावरण तापवायला मदत झाली. जो राग आहे तो मतपेटीतून कुठे जायला हवा, याची दिशा या सभांमधून दिसली. खरं तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे जनतेला जो मेसेज द्यायचा आहे, तो योग्य पद्धतीने देण्यात, शहरी भागात विशेषतः मतदारांना आकर्षित करण्यासाठी चेहरा नव्हता. मग कोणतंही बॅगेज नसलेला आणि प्रभावी भाषणातून थेट मतदारांपर्यंत पोहोचण्याची एक पर्याय होता तो म्हणजे राज ठाकरे. ज्यांच्या सभांना लोक स्वताहून येतात, ऐकतात. राज ठाकरेंच्या सभांनी आघाडीला आवश्यक पुश मिळाला! ज्या मोदींनी 2014 मध्ये राज ठाकरेंना हाताशी घेऊन राज्यात भाजपसाठी सकारात्मक वातावरण तयार केलं, त्याच मोदींविरोधात राज ठाकरे उभे राहिल्याने भाजपला फटका बसला. पवार आजही पॉवरफूल मी निवडणूक लढवणार, नाही लढवणार या शरद पवार यांच्या परस्पर विरोधी भूमिकेमुळे राष्ट्रवादीबाबत लगेच भाजपने प्रश्नचिन्ह उभे केले. पवारांना हवा कळते, पवार मागे फिरले म्हणजे भाजप येणार अशी वक्तव्य पतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्र्यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रात पहिल्यांदा घेतलेल्या सभेत जर कुणाला टार्गेट केलं तर शरद पवार यांना. राज्यात भाजपला खरं आव्हान भाजपचे आहे. काँग्रेस पक्षांतर्गत वादामुळे मागे पडली. पण राज्यात पाय रोवून उभे राहिलेले आणि केंद्रात भाजप विरोधातील सर्व पक्ष ज्यांच्याबरोबर येतात असे शरद पवार भाजपसाठी मुख्य शत्रू ठरले. अगदी नरेंद्र मोदी यांनी टीका करताना पण शरद पवार मोठे पण चुकीच्या बाजूने युद्धात उतरले असाच सूर होता. इतकंच नाहीतर राज्यात भाजप बारामती मध्ये आपल्या बेटकुल्या दाखवत असताना पंतप्रधान मोदी यांनी या निवडणुकीत ही बारामती मध्ये सभा घेणं टाळलं. पण बारामतीत सुप्रिया सुळे यांना त्रास देणं म्हणजे शरद पवारांना कायमच दुखवणं आहे,जे करणं मोदींनी टाळलं. यावरून नुसतं महाराष्ट्रात नाही तर 23 मे नंतर देशातील राजकारणात शरद पवार यांची महत्वाची भूमिका राहील याचे हे संकेत तर नाही ना अशी ही चर्चा सुरू राहिली. शरद पवार यांनी महाराष्ट्र पिंजून काढला, पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली पण नितीन गडकरींच्या नागपुरात त्यांनी सभा घेतली नाही. याऐवजी प्रचारात त्यांचा गडकरी बाबत चिंतेचा सूर दिसला. गडकरी यांच्या तब्येतीबाबत पवारांनी चिंता व्यक्त करत, काळजी घेण्याची वडीलकीचा सल्ला दिला. महाराष्ट्रातली लढाई ही खरतर देवेंद्र फडणवीस विरुद्ध शरद पवार आहे. दोघेही आपल्या आपल्या खेळात माहीर आहेत.. एकाकडे मोठा अनुभव, तर दुसरा मोदींचा शिष्य. राज्यात पहिल्या क्रमांकचा पक्ष कोण होणार यासाठी भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यात लढत आहे.. कोण कोणावर भारी पडलं हे 23 मे रोजी स्पष्ट होईल तर असे हे पन्नास वर्षे राजकारणातला अनुभव असलेले, विविध सरकार घडताना, बिघडताना ज्यांनी पाहिलं,त्यात महत्वाची भूमिका निभावली ते शरद पवार 2019 च्या निवडणुकीत बाह्या सरसावून तयार झालेत.. कुस्तीच्या मैदानातील ते तेल लावलेले, कोणाच्या पण हाताला न लागणारे खेळाडू आहेत.. शरद पवार संपले म्हणणाऱ्यांना 23 मे ला कदाचित धक्का बसू शकेल. इतकंच नाही तर 23 मे नंतर कोणत्याही पक्षाला बहुमत न मिळाल्यास शरद पवार यांची भूमिका निर्णायक ठरेल असं चित्र आज आहे!
View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अन्यथा नागपूरच्या अधिवेशनात घुसून आंदोलन करू; आरक्षित भूखंडावरुन मनसे आक्रमक, नेरुळमध्ये उतरले रस्त्यावर
अन्यथा नागपूरच्या अधिवेशनात घुसून आंदोलन करू; आरक्षित भूखंडावरुन मनसे आक्रमक, नेरुळमध्ये उतरले रस्त्यावर
Yavatmal Bus Accident : चंद्रपूर यवतमाळ एसटी बसला ट्रकची समोरुन धडक, ट्रक एसटीची एक बाजू  चिरत गेला, दोघांचा मृत्यू, 14 जखमी
चंद्रपूर यवतमाळ एसटी बसला ट्रकची समोरुन धडक, ट्रक एसटीची एक बाजू चिरत गेला, दोघांचा मृत्यू
Hardik Pandya : हार्दिक पांड्याला पाहण्यासाठी तुफान गर्दी, गुजरात विरुद्धच्या मॅचचं ठिकाण बदलावं लागलं, आता पांड्याची SMAT मधून एक्झिट, कारण समोर
हार्दिक पांड्याला पाहण्यासाठी तुफान गर्दी, आयोजकांवर सामन्याचं ठिकाण बदलण्याची वेळ, काय घडलं?
Modi-Putin : नरेंद्र मोदी- पुतिन यांचा एकाच कारमधून प्रवास, दोन्ही नेते महाराष्ट्र पासिंग SUV Toyota फॉर्च्यूनरमधून रवाना 
नरेंद्र मोदी- पुतिन यांचा एकाच कारमधून प्रवास, दोन्ही नेते महाराष्ट्र पासिंग SUV Toyota फॉर्च्यूनरमधून रवाना 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra LIVE Superfast News : 5.30 PM : बातम्यांचा वेगवान आढावा : 04 DEC 2025 : ABP Majha
Mumbai Goregaon Vivek College : गोरेगावच्या विवेक कॉलेजमध्ये बुरखा आणि हिजाबबंदीवरून तणाव
Kishori Pednekar on Nashik : साधुसंतांना पुढे करून वृक्षतोड करणार असाल, तर कोणी सहन करणार नाही
Sayaji Shinde PC : झाडं तोडणं साधु संताना पटेल का? सयाजी शिंदे यांचा तपोवनातील वृक्षतोडीवर सवाल
Sanjay Shirsat On Mahayuti And Ravindra Chavan:...तर स्वतंत्र लढू; शिवसेना शिंदे गटाचा भाजपाला इशारा

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अन्यथा नागपूरच्या अधिवेशनात घुसून आंदोलन करू; आरक्षित भूखंडावरुन मनसे आक्रमक, नेरुळमध्ये उतरले रस्त्यावर
अन्यथा नागपूरच्या अधिवेशनात घुसून आंदोलन करू; आरक्षित भूखंडावरुन मनसे आक्रमक, नेरुळमध्ये उतरले रस्त्यावर
Yavatmal Bus Accident : चंद्रपूर यवतमाळ एसटी बसला ट्रकची समोरुन धडक, ट्रक एसटीची एक बाजू  चिरत गेला, दोघांचा मृत्यू, 14 जखमी
चंद्रपूर यवतमाळ एसटी बसला ट्रकची समोरुन धडक, ट्रक एसटीची एक बाजू चिरत गेला, दोघांचा मृत्यू
Hardik Pandya : हार्दिक पांड्याला पाहण्यासाठी तुफान गर्दी, गुजरात विरुद्धच्या मॅचचं ठिकाण बदलावं लागलं, आता पांड्याची SMAT मधून एक्झिट, कारण समोर
हार्दिक पांड्याला पाहण्यासाठी तुफान गर्दी, आयोजकांवर सामन्याचं ठिकाण बदलण्याची वेळ, काय घडलं?
Modi-Putin : नरेंद्र मोदी- पुतिन यांचा एकाच कारमधून प्रवास, दोन्ही नेते महाराष्ट्र पासिंग SUV Toyota फॉर्च्यूनरमधून रवाना 
नरेंद्र मोदी- पुतिन यांचा एकाच कारमधून प्रवास, दोन्ही नेते महाराष्ट्र पासिंग SUV Toyota फॉर्च्यूनरमधून रवाना 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 डिसेंबर 2025 | गुरुवार
मोठी बातमी! निवडणूक आयोगाने संवैधानिक शिस्त पाळली नाही, निवडणुका पुढे ढकलल्यावरुन हायकोर्ट संतप्त
मोठी बातमी! निवडणूक आयोगाने संवैधानिक शिस्त पाळली नाही, निवडणुका पुढे ढकलल्यावरुन हायकोर्ट संतप्त
शिवेंद्रराजेंच्या लेकीचा शाही लग्नसोहळा, दिग्गजांची उपस्थिती; देवेंद्र फडणवीसांकडे CM फंडात दिला निधी
शिवेंद्रराजेंच्या लेकीचा शाही लग्नसोहळा, दिग्गजांची उपस्थिती; देवेंद्र फडणवीसांकडे CM फंडात दिला निधी
Video: पुणे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गाचे काम कधी पूर्ण होणार? सुप्रिया सुळेंच्या प्रश्नांवर मंत्री गडकरींनी कालावधी सांगितला!
Video: पुणे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गाचे काम कधी पूर्ण होणार? सुप्रिया सुळेंच्या प्रश्नांवर मंत्री गडकरींनी कालावधी सांगितला!
Embed widget