Hindu Religion: ....म्हणून लग्नापूर्वी वधू-वरांना हळद लावली जाते! 'या' देवाचा खास संबंध, ग्रहाशी संबंधित? धार्मिक महत्त्व जाणून घ्या
Hindu Religion: असे मानले जाते की, हळद लावल्याने 'या' ग्रहाचा आशीर्वाद राहतो, ज्यामुळे वैवाहिक जीवनात आनंद मिळतो. नवीन जोडप्याचे जीवन सुखी होते.

Hindu Religion: लग्नापूर्वी हळदीचा कार्यक्रम अगदी जोरात असतो. त्यादिवशी वऱ्हाडी मंडळी नाचतात, जेवतात, तर असं म्हणतात की, या हळदीचा कार्यक्रमाला वधू आणि तिच्या नातेवाईकांना भावनिक होतानाही आपण पाहतो. लग्नापूर्वी वधू-वराला हळद लावली जाते. पण ही हळद नेमकी का लावली जाते? हिंदू धर्मात याचं काय महत्त्व आहे? लग्नाच्या अनेक विधींमध्ये हळदीचा विधी विशेष का असतो? या सर्वांची उत्तरं आज आम्ही हिंदू धार्मिक मान्यतेनुसार जाणून घ्या...
हळदीचं धार्मिक महत्त्वही विशेष..!
तसं पाहायला गेलं तर विविधतेने भरलेल्या या देशात हळदीचा विधीही वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो. काही ठिकाणी हळदीचा समारंभ लग्नाच्या एक दिवस आधी केला जातो, तर काही ठिकाणी लग्नाच्या दिवशी सकाळी हळद लावली जाते. त्याचबरोबर बदलत्या काळानुसार वधू-वरांना एकत्र हळदी लावून याला आता हळदी सोहळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. हळदी विधीच्या धार्मिक महत्त्वाबद्दल सांगायचे तर, हळदी विधी हा केवळ विवाह विधी नसून त्याच्याशी अनेक विशेष पैलू देखील जोडलेले आहेत. चला, हळदीच्या विधीचे धार्मिक महत्त्व सविस्तर जाणून घेऊया.
पिवळा रंग 'या' ग्रहांचे प्रतिनिधित्व करतो
पिवळा रंग गुरू, सूर्य देव आणि मंगळ यांच्याशी संबंधित आहे. कारण पिवळ्या रंगातच हलके लाल आणि केशरी रंग असतात. विशेषत: ज्योतिषशास्त्रानुसार गुरु ग्रह विवाह आणि वैवाहिक जीवनासाठी चांगला मानला जातो. हळदीचा संबंध गुरूशीही आहे. त्यामुळे लग्नापूर्वी वधू-वरांना हळद लावल्याने त्यांचे वैवाहिक जीवन सुखी राहते. हळद नकारात्मक ऊर्जा देखील दूर ठेवते. असे मानले जाते की हळद लावल्याने गुरू ग्रहाचा आशीर्वाद राहतो, ज्यामुळे वैवाहिक जीवनात आनंद मिळतो. याच कारणामुळे ज्या लोकांना त्यांच्या वैवाहिक जीवनात अडथळे येत आहेत त्यांना उपाय म्हणून गुरुवारी व्रत ठेवण्याचा सल्ला दिला जातो कारण बृहस्पति देखील वैवाहिक संबंधांचे प्रतिनिधित्व करतो.
भगवान विष्णूचा आवडता रंग
हळदीचा पिवळा रंग सौभाग्याचा समजला जातो. भगवान विष्णूचा आवडता रंग देखील पिवळा मानला जातो. लग्नासारख्या शुभ कार्यात भगवान विष्णूची पूजा केली जाते आणि त्यांच्या पूजेमध्ये हळदीला खूप महत्त्व आहे. या कारणास्तव, गुरुवारी भगवान विष्णूला केळीसह पिवळ्या रंगाच्या वस्तू अर्पण केल्या जातात. भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने नवीन जोडप्याचे जीवन सुखी होते, अशी पौराणिक मान्यता आहे.
पिवळा रंग देखील आगीशी संबंधित
हिंदू धर्मात अग्नीला विशेष महत्त्व आहे. अग्नीलाही देवता मानले जाते. आगीत लाल, पिवळा आणि भगवा रंग दिसतो. मुख्यतः हवनकुंडात पेटलेली अग्नी पिवळ्या आणि गडद पिवळ्या रंगाची दिसते. पिवळा रंग देखील उष्णता आणि उबदारपणाशी संबंधित आहे. हे रंग नवीन जीवन, आनंद, प्रेम आणि शुभ कार्ये दर्शवतात. शरीरावर हळद लावल्याने आतील उष्णता जागृत होते आणि नवीन जीवनासाठी तयार होते. अशी मान्यता आहे.
हळदी समारंभात पिवळे कपडे का घालतात?
पिवळ्या रंगाला 'पितांबर' असेही म्हणतात जे गुरूचे प्रतीक आहे आणि तो धारण केल्याने गुरूचे सामर्थ्य वाढते. गुरु आपल्या जीवनात भाग्य जागृत करण्याचे काम करतात. त्यामुळे हळदी समारंभात वधू-वर पिवळे कपडे परिधान करून वधूला फुलांनी सजवले जाते.
हेही वाचा>>
Vivah Muhurta 2025: करा हो लगीनघाई...! 2025 मध्ये लग्नासाठी फक्त 75 शुभ मुहूर्त? जुलै ते ऑक्टोबर मुहूर्त नाही? तारखा जाणून घ्या..
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
