(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Vivah Muhurta 2025: करा हो लगीनघाई...! 2025 मध्ये लग्नासाठी फक्त 75 शुभ मुहूर्त? जुलै ते ऑक्टोबर मुहूर्त नाही? तारखा जाणून घ्या..
Vivah Muhurta 2025: या वर्षी लग्न झाले नाही तर काही हरकत नाही...पुढच्या वर्षी नक्की होईल. 2025 मध्ये लग्नासाठी फक्त 75 शुभ मुहूर्तच आहेत, जाणून घ्या..
Vivah Muhurta 2025: लग्न (Shubh Vivah Shub Muhurta 2025) म्हणजे प्रत्येकाच्या जीवनातील महत्त्वाचा टप्पा असतो. दोन जोडीदार आयुष्यभर एकमेकांची सुख-दुखा:त साथ देतात. हिंदू धर्माबद्दल बोलायचे झाले तर, विवाह करताना शुभ मुहूर्ताला विशेष महत्त्व आहे. कारण तो सुखी वैवाहिक जीवनाचा आधार मानला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार, लग्नाच्या वेळी ग्रह आणि नक्षत्रांची स्थिती वधू-वरांच्या जीवनावर खोलवर परिणाम करते. योग्य वेळी केलेले लग्न केवळ वैवाहिक जीवन यशस्वी करत नाही तर आनंद, समृद्धी आणि परस्पर प्रेम वाढवते अशी धारणा आहे. कुंडली आणि पंचांगाच्या आधारे मुहूर्त ठरवणे शुभ आणि लाभदायक मानले जाते. वैदिक पंचागानुसार, 2025 मध्ये लग्नासाठी एकूण 75 शुभ मुहूर्त आहेत, जानेवारी ते डिसेंबर पर्यंतच्या सर्व लग्नाच्या तारखा जाणून घ्या...
पुढच्या वर्षी लग्न करण्याचा विचार करत असाल तर...
हिंदू धर्मानुसार लग्नासाठी शुभ मुहूर्त शोधला जातो. वैदिक कॅलेंडरनुसार 2025 मध्ये लग्नासाठी एकूण 75 शुभ मुहूर्त आहेत. त्यामुळे जर तुम्ही पुढच्या वर्षी लग्न करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला लग्नासाठी फक्त 75 शुभ मुहूर्त मिळणार आहेत. तुम्ही तुमची तारीख आधीच लॉक करा आणि लग्नाची इतर तयारी सुरू करा. लग्नाच्या ठिकाणापासून ते खरेदीपर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला वेळ मिळू शकतो.
जानेवारीमध्ये लग्नासाठी एकूण 10 शुभ दिवस आहेत
16 जानेवारी 2025, गुरुवार
17 जानेवारी 2025, शुक्रवार
18 जानेवारी 2025, शनिवार
19 जानेवारी 2025, रविवार
20 जानेवारी 2025, सोमवार
21 जानेवारी 2025, मंगळवार
23 जानेवारी 2025, गुरुवार
24 जानेवारी 2025, शुक्रवार
26 जानेवारी 2025, रविवार
27 जानेवारी 2025, सोमवार
फेब्रुवारीमध्ये लग्नासाठी 14 शुभ दिवस आहेत
2 फेब्रुवारी 2025, रविवार
3 फेब्रुवारी 2025, सोमवार
6 फेब्रुवारी 2025, गुरुवार
7 फेब्रुवारी 2025, शुक्रवार
18 फेब्रुवारी 2025, मंगळवार
19 फेब्रुवारी 2025, बुधवार
21 फेब्रुवारी 2025, शुक्रवार
23 फेब्रुवारी 2025, रविवार
25 फेब्रुवारी 2025, मंगळवार
मार्चमध्ये लग्नासाठी 5 शुभ दिवस आहेत.
1 मार्च 2025, शनिवार
2 मार्च 2025, रविवार
6 मार्च 2025, गुरुवार
7 मार्च 2025, शुक्रवार
12 मार्च 2025, बुधवार
एप्रिलमध्ये लग्नासाठी 9 शुभ दिवस आहेत.
14 एप्रिल 2025, सोमवार
16 एप्रिल 2025, बुधवार
18 एप्रिल 2025, शुक्रवार
19 एप्रिल 2025, शनिवार
20 एप्रिल 2025, रविवार
21 एप्रिल 2025, सोमवार
25 एप्रिल 2025, शुक्रवार
29 एप्रिल 2025, मंगळवार
30 एप्रिल 2025, बुधवार
मे महिन्यात लग्नासाठी 15 शुभ दिवस आहेत.
1 मे 2025, गुरुवार
5 मे 2025, सोमवार
6 मे 2025, मंगळवार
8 मे 2025, गुरुवार
10 मे 2025, शनिवार
14 मे 2025, बुधवार
15 मे 2025, गुरुवार
16 मे 2025, शुक्रवार
17 मे 2025, शनिवार
18 मे 2025, रविवार
22 मे 2025, गुरुवार
23 मे 2025, शुक्रवार
24 मे 2025, शनिवार
27 मे 2025, मंगळवार
28 मे 2025, बुधवार
जूनमध्ये लग्नासाठी 5 शुभ दिवस आहेत.
2 जून 2025, सोमवार
4 जून 2025, बुधवार
5 जून 2025, गुरुवार
7 जून 2025, शनिवार
8 जून 2025, रविवार
जुलै ते ऑक्टोबरपर्यंत लग्नासाठी एकही शुभ मुहूर्त नाही.
नोव्हेंबरमध्ये लग्नासाठी 14 शुभ दिवस आहेत.
2 नोव्हेंबर 2025, रविवार
3 नोव्हेंबर 2025, सोमवार
6 नोव्हेंबर 2025, गुरुवार
8 नोव्हेंबर 2025, शनिवार
12 नोव्हेंबर 2025, बुधवार
13 नोव्हेंबर 2025, गुरुवार
16 नोव्हेंबर 2025, रविवार
17 नोव्हेंबर 2025, सोमवार
18 नोव्हेंबर 2025, मंगळवार
21 नोव्हेंबर 2025, शुक्रवार
22 नोव्हेंबर 2025, शनिवार
23 नोव्हेंबर 2025, रविवार
25 नोव्हेंबर 2025, मंगळवार
30 नोव्हेंबर 2025, रविवार
डिसेंबरमध्ये लग्नासाठी 3 शुभ दिवस आहेत.
4 डिसेंबर 2025, गुरुवार
5 डिसेंबर 2025, शुक्रवार
6 डिसेंबर 2025, शनिवार
हेही वाचा>>
Kumbh Mela: मोक्ष प्राप्त होईलच...त्यापूर्वी महाकुंभ 2025 शाही स्नानाच्या तारखा जाणून घ्या! अन् धार्मिक महत्त्वही...
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
,