एक्स्प्लोर

Agriculture News : अमरावतीत नाफेडकडून हरभरा खरेदी बंद, शेतकरी अडचणीत, बच्चू कडूंनी मांडली भूमिका  

सध्या हरभरा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. कारण नाफेडकडून होणारी खरेदी बंद केली आहे.

Agriculture News : जून महिना सुरु झाला की शेतकऱ्यांची लगबग सुरु होते ती खरीप पेरणीची. पण यासाठी शेतकऱ्यांना पैश्यांची गरज असते. मात्र, सध्या हरभरा उत्पादक शेतकऱ्यांकडे पैसेच नसल्याने ते अडचणीत आले आहे. कारण या शेतकऱ्यांचा हरभरा घरातच पडून आहे. नाफेडचं पोर्टल बंद झाल्यानं खरेदी बंद झाल्यानं शेतकरी अडचणीत सापडला आहे. यावर सरकारनं तातडीने उपाय योजना कराव्यात, अशी मागणी शेतकरी करत आहेत. जर खरेदी होत नसेल तर हरभरा आणि धान उत्पादकांना सरकारनं मदत करावी अशी मागणी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केली आहे.

मुख्यमंत्री आणि शरद पवारांनी पंतप्रधानांची भेट घ्यावी : बच्चू कडू

सध्या धान आणि हरभरा उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या वाढत चालल्या आहेत. केंद्र सरकारने जे खरेदीचे लक्षांक दिले ते कमी आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात एक लाख हरभरा उत्पादक शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे. पण आता केंद्र सरकारने खरेदीसाठी हात वर केले आहेत. धान उत्पादक शेतकरी देखील 4 ते 5 लाख असून केंद्र सरकार धान खरेदी बंद करत आहेत. केंद्र सरकारने खरेदी सुरु करावी यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली पाहिजे अशी मागणी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केली आहे. खरेदी होत नसेल तर किमान चार हजार रुपये प्रति एकर मदत हरभरा आणि धान उत्पादक शेतकऱ्यांना दिली पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली आहे. 

आता काय करायचं? शेतकऱ्यांपुढे प्रश्न

अमरावती जिल्ह्याच्या धामणगाव तालुक्यातील चिंचपूर येथील अभिजित लांबाडे यांच्याकडे 5 एकर शेती आहे. त्यांनी पाच एकरात हरबरा लागवड केली होती. त्यामध्ये त्यांना 30 क्विंटल हरभरा झाला. यासाठी त्यांना एक लाख रुपये खर्च आला. हाच हरभरा विकून त्यांना आईचे उपचार आणि खरीप पेरणी करायची आहे. त्यामुळं त्यांनी नाफेडमध्ये 5 मे रोजी नोंदणी केली होती. 2 जून रोजी त्यांना हरभरा घेऊन या म्हणून मॅसेज आला. पण त्याच दिवशी त्यांना फोन आला की पोर्टल बंद असल्यानं पुढील आदेशापर्यंत आणू नका असं त्यांना सांगण्यात आलं आहे. आता काय करायचं असा प्रश्न त्यांना पडला आहे. हीच परिस्थिती जवळा पट येथील पराग राऊत यांची आहे. पराग राऊत यांनी तर आपलं 70 क्विंटल हरभरा वाहनात भरला होता. पण त्यांनाही फोन आला की, पोर्टल बंद असल्याने हरभरा आणू नका. पराग राऊत यांच्याकडे 20 एकर शेती आहे. त्यापैकी त्यांनी 10 एकरात हरभरा लागवड केली. यामधून त्यांना 70 क्विंटल हरभरा झाला पण आता या हरभऱ्याचे करायचं काय असा प्रश्न त्यांना पडला आहे.

दरम्यान, सध्या बाजारात हरभऱ्याच दर 4 हजार 100 रुपये क्विंटल आहे, तर नाफेडमध्ये याचं दर 5 हजार 250 रुपये आहे. त्यामुळं शेतकरी इथंच हरभरा विकण्यासाठी प्राधान्य देत आहेत. पण सरकारच्या या गलथान कारभारामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. आता यावर राज्यमंत्री बच्चू कडूच काही करु शकतात अशी अपेक्षा या शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. 

महत्वाच्या बातम्या:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बुमराहचा भेदक मारा, सूर्याचं अर्धशतक, रोमांचक सामन्यात मुंबईचा 9 धावांनी विजय
बुमराहचा भेदक मारा, सूर्याचं अर्धशतक, रोमांचक सामन्यात मुंबईचा 9 धावांनी विजय
राहुल भाईचा बर्थडे जोरात, लखनौच्या खेळाडूंनी केएलच्या तोंडावर केक फासला, VIDEO Viral
राहुल भाईचा बर्थडे जोरात, लखनौच्या खेळाडूंनी केएलच्या तोंडावर केक फासला, VIDEO Viral
PBKS vs MI : हार्दिक पुन्हा फ्लॉप, सूर्या तळपला, मुंबईचं पंजाबसमोर 193 धावांचं आव्हान
PBKS vs MI : हार्दिक पुन्हा फ्लॉप, सूर्या तळपला, मुंबईचं पंजाबसमोर 193 धावांचं आव्हान
UPSC Result : 11 वर्षांनी झाला 12 वी उत्तीर्ण, आता UPSC च्या यादीत शेवटून पहिला, 42 व्या वर्षी यश मिळवणारा महेश कुमार कोण? 
11 वर्षांनी झाला 12 वी उत्तीर्ण, आता UPSC च्या यादीत शेवटून पहिला, 42 व्या वर्षी यश मिळवणारा महेश कुमार कोण? 
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Special Report Lok Sabha 2024 : लोकसभेसाठी बड्या नेत्यांचे अर्ज दाखल, शक्तिप्रदर्शनही जोरातSpecial Report BJP Lok Sabha 2024 : लोकसभेच्या परीक्षेसोबत भाजपची विधानसभेची रिहर्सलSpecial Report Mahayuti : शिंदेंच्या शिवसेनेला संपवण्याचा भाजपचा डाव : नवलेJob Majha : दक्षिण पूर्व मध्य रेल्वे येथे विविध पदांसाठी नोकरीच्या संधी : 18 April 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बुमराहचा भेदक मारा, सूर्याचं अर्धशतक, रोमांचक सामन्यात मुंबईचा 9 धावांनी विजय
बुमराहचा भेदक मारा, सूर्याचं अर्धशतक, रोमांचक सामन्यात मुंबईचा 9 धावांनी विजय
राहुल भाईचा बर्थडे जोरात, लखनौच्या खेळाडूंनी केएलच्या तोंडावर केक फासला, VIDEO Viral
राहुल भाईचा बर्थडे जोरात, लखनौच्या खेळाडूंनी केएलच्या तोंडावर केक फासला, VIDEO Viral
PBKS vs MI : हार्दिक पुन्हा फ्लॉप, सूर्या तळपला, मुंबईचं पंजाबसमोर 193 धावांचं आव्हान
PBKS vs MI : हार्दिक पुन्हा फ्लॉप, सूर्या तळपला, मुंबईचं पंजाबसमोर 193 धावांचं आव्हान
UPSC Result : 11 वर्षांनी झाला 12 वी उत्तीर्ण, आता UPSC च्या यादीत शेवटून पहिला, 42 व्या वर्षी यश मिळवणारा महेश कुमार कोण? 
11 वर्षांनी झाला 12 वी उत्तीर्ण, आता UPSC च्या यादीत शेवटून पहिला, 42 व्या वर्षी यश मिळवणारा महेश कुमार कोण? 
Sharad Pawar: बैल म्हातारा झाल्यावर... 20 वर्षांपूर्वी टोकाची टीका अन् आता शरद पवार 'त्या' जुन्या विरोधकाला भेटले
बैल म्हातारा झाल्यावर... 20 वर्षांपूर्वी टोकाची टीका अन् आता शरद पवार 'त्या' जुन्या विरोधकाला भेटले
36 धावाच चोपल्या, पण रोहित शर्माच्या नावावर 3 विक्रमांची नोंद
36 धावाच चोपल्या, पण रोहित शर्माच्या नावावर 3 विक्रमांची नोंद
Supriya Sule Net Worth : सदानंद सुळे 150 कोटींचे 'धनी', सुप्रिया सुळेंची संपत्ती किती?
Supriya Sule Net Worth : सदानंद सुळे 150 कोटींचे 'धनी', सुप्रिया सुळेंची संपत्ती किती?
धोनी चांगला खेळावा, पण....लखनौमध्ये माहीसाठी लागले खास पोस्टर
धोनी चांगला खेळावा, पण....लखनौमध्ये माहीसाठी लागले खास पोस्टर
Embed widget