एक्स्प्लोर

दोन एकरवरील केळीची बाग अज्ञाताने टाकली तोडून, शेतकऱ्याचं 10 लाख रुपयांचं नुकसान, करमाळ्यात धक्कादायक प्रकार

करमाळा तालुक्यात धक्कादायक घटना घडली आहे. अज्ञात व्यक्तीने दोन एकरवर असणारी केळीची बाग तोडून टाकली आहे. शेतकऱ्याचं तब्बल 10 लाख रुपयांचं नुकसान झालं आहे.

Solapur Agriculture News : सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात धक्कादायक घटना घडली आहे. अज्ञात व्यक्तीने दोन एकरवर असणारी केळीची बाग तोडून टाकली आहे. शेतकऱ्याचं तब्बल 10 लाख रुपयांचं नुकसान झालं आहे. केळी पिकाला पाणीपुरवठा करण्यासाठी बसवण्यात आलेल्या ठिबक सिंचनचा संच देखील ठिकठिकाणी तोडण्यात आला आहे. शेतकऱ्याला मोठा आर्थिक फटका बसला आहे. 

पिकाला पाणीपुरवठा करण्यासाठी बसवण्यात आलेला ठिबक सिंचन संचही तोडला

करमाळा तालुक्यातील खातगाव येथे अज्ञात व्यक्तीने दोन एकर क्षेत्रातील केळी बाग कोयत्याने तोडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत शेतकरी भारत शंकर क्षीरसागर यांचे अंदाजे 10 लाखांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. क्षीरसागर यांच्या दोन एकर क्षेत्रावर मायक्रोसन जातीची अंदाजे 2400 केळी लागवड करण्यात आली होती. अज्ञात व्यक्तीने कोयत्याने झाडे तोडून बागेचे नुकसान केले. तसेच केळी पिकाला पाणीपुरवठा करण्यासाठी बसविण्यात आलेल्या ठिबक सिंचन संच ही ठिकठिकाणी तोडण्यात आला आहे. 

करमाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

भारत क्षीरसागर हे गावातील दुसऱ्या शेतात दिवसभराची कामे उरकून सायंकाळी सुमारे पाच वाजता फेरफटका मारण्यासाठी संबंधित शेतात आले असता त्यांना हा प्रकार निदर्शनास आला. बागेची मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे पाहून त्यांनी तात्काळ नातेवाईकांसह करमाळा पोलिस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

गेल्या काही दिवसापासून शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे नुकसान करण्याचे प्रकार वाढत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अचानक चांगले पिक आले असताना त्यावर किटकनाशके फवारणे किंवा पिकांची तोडणी करणे अशा प्रकारचे प्रकार घडत असल्याचे समोर येत आहे. बार्शी तालुक्यातील कोरफळे गावात मेहनती शेतकरी किरण बर्डे यांच्या द्राक्षबागेवर अज्ञात व्यक्तीने रात्रीच्या अंधारात तणनाशक फवारल्याने संपूर्ण बाग उद्ध्वस्त झाली आहे. गेल्या काही दिवसापूर्वी सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील कोरफळे येथे देखील अज्ञात व्यक्तीने द्राक्षाची बाग फवारल्याची घटना घडली होती. एका मेहनती शेतकऱ्याने मोठ्या कष्टानं घाम गाळून पिक आणले होते. मात्र, समाजातील वाईट प्रवृत्तीने असा प्रकारे पिकाचे नुकसान केले होते. गेल्या काही दिवसापासून अशा घटना वारंवार होत असल्याचे दिसत आहे. कत्यामुळं सरकारनं प्रशासनानं अशा घटनांची गंभीर दखल घ्यावी, तसेच या प्रकरणी दोषी असणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी असी मागणी केली जात आहे. 

 
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: मुंबईत ज्येष्ठ नागरिकांसाठी महापालिकेचे पहिले वृद्धाश्रम; गोरेगाव पूर्व येथे लवकरच लोकार्पण
Maharashtra Live blog updates: मुंबईत ज्येष्ठ नागरिकांसाठी महापालिकेचे पहिले वृद्धाश्रम; गोरेगाव पूर्व येथे लवकरच लोकार्पण
Pune Crime News : तू खूप सुंदर दिसतेस म्हणत हात पकडला अन्....; डिलिव्हरी बॉयकडून तरुणीचा विनयभंग; शिवाजीनगर परिसरातील संतापजनक घटना
तू खूप सुंदर दिसतेस म्हणत हात पकडला अन्....; डिलिव्हरी बॉयकडून तरुणीचा विनयभंग; पुण्यातील शिवाजीनगर परिसरातील संतापजनक घटना
Gas Cylinder Price Hiked : युद्धाचा भडका, सर्वसामान्यांना महागाईचा चटका! घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती महागल्या; आजपासून नवे दर लागू
युद्धाचा भडका, सर्वसामान्यांना महागाईचा चटका! घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती महागल्या; आजपासून नवे दर लागू
LPG Gas Shortage: केंद्र सरकारने व्यावसायिक LPG चा गॅसपुरवठा थांबवला, देशातील हॉटेल, रेस्टॉरंट इंडस्ट्री ठप्प होण्याची भीती
केंद्र सरकारने व्यावसायिक LPG चा गॅसपुरवठा थांबवला, देशातील हॉटेल, रेस्टॉरंट इंडस्ट्री ठप्प होण्याची भीती
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report
Mojtaba Khamenei Iran :  मोजतबा खामेनींच्या नावाला अमेरिकेचा विरोध Special Report
Gas Shortage India : शिगेला युद्धज्वर; भारत 'गॅस'वर Special Report
Amravati SSC Exam : पेपर लिहिला घरात, कोण जाणार तुरुंगात? Special Report
Shetkari KarjMafi : कर्जमाफी मिळणार, कधी, कशी आणि किती? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Harshwardhan Sapkal and PM Modi: पंतप्रधान मोदी आणि सावरकरांचा AI फोटो, काँग्रेसच्या हर्षवर्धन सपकाळांची बोचरी टीका, फोटो व्हायरल
शाब्बास…तुम्ही परंपरा जपली! काँग्रेसच्या हर्षवर्धन सपकाळांची पंतप्रधान मोदींवर बोचरी टीका
Gas Cylinder Price Hiked : युद्धाचा भडका, सर्वसामान्यांना महागाईचा चटका! घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती महागल्या; आजपासून नवे दर लागू
युद्धाचा भडका, सर्वसामान्यांना महागाईचा चटका! घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती महागल्या; आजपासून नवे दर लागू
Rohit Shetty News : रोहित शेट्टीच्या घरावरील गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट; मुख्य आरोपीचा भावालाही अटक, लोणकर बंधुंच्या सांगण्यावरूनच फायरिंग
रोहित शेट्टीच्या घरावरील गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट; मुख्य आरोपीच्या भावालाही अटक, लोणकर बंधुंच्या सांगण्यावरूनच फायरिंग
Chana Price Crisis : हमीभाव 5,875 मात्र अकोल्यात हरभऱ्याची 4,800 ला खरेदी; शेतकऱ्यांची ‘मातीमोल’ विक्री
हमीभाव 5,875 मात्र अकोल्यात हरभऱ्याची 4,800 ला खरेदी; शेतकऱ्यांची ‘मातीमोल’ विक्री
LPG CNG gas shortage in India: इराण Vs इस्रायल युद्धामुळे भारताला चटके, CNG गॅसच्या किंमती वाढण्याची शक्यता, घरगुती सिलेंडर उशीरा मिळणार?
इराण Vs इस्रायल युद्धामुळे भारताला चटके, CNG गॅसच्या किंमती वाढण्याची शक्यता, घरगुती सिलेंडर उशीरा मिळणार?
NCP Merger : दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्न अपयशी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा नो रिस्पॉन्स, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्नही फसला, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले, इनसाईड स्टोरी समोर
Team India : जिंकण्यासाठी अंधश्रद्धा? टीम इंडियाने अहमदाबादचं हॉटेल अन् ड्रेसिंग रुम बदलली; 'मोदी स्टेडियम'वरच्या पराभवाची आठवण पुसण्यासाठी निर्णय? 
जिंकण्यासाठी अंधश्रद्धा? टीम इंडियाने अहमदाबादचं हॉटेल अन् ड्रेसिंग रुम बदलली; 'मोदी स्टेडियम'वरच्या पराभवाची आठवण पुसण्यासाठी निर्णय? 
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
Embed widget