एक्स्प्लोर

Nagpur News: राज्यातील प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्थांचे पुनर्गठन होणार; सहकार क्षेत्राचे बळकटीकरणाचे उद्दिष्ट की भाजपची राजकीय खेळी?

Nagpur News : राज्यातील शेतकऱ्यांशी थेट संबंध असलेल्या 'प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्था' (PACS) म्हणजेच "पॅक्स"चे पुनर्गठण करण्याची प्रक्रिया राज्य सरकारने सुरू केली आहे.

Nagpur News : राज्यातील शेतकऱ्यांशी थेट संबंध असलेल्या 'प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्था' (PACS - Primary Agricultural Credit Society) म्हणजेच "पॅक्स"चे पुनर्गठण करण्याची प्रक्रिया राज्य सरकारने सुरू केली आहे. त्यासाठी राज्यातील प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्थांसाठी स्पष्ट व कडक आर्थिक निकष लावले जाणार आहे. पहिल्या टप्यात सर्व प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्थांच्या आर्थिक आरोग्याची तपासणी सहकार विभाग करणार असून त्यासाठी सहकारी संस्थांच्या अप्पर आयुक्तांच्या नेतृत्वात विशेष समितीचे गठन करण्यात आले आहे. आता नव्या धोरणानुसार राज्यातील प्रत्येक महसुली गावात फक्त एक प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्था राहणार आहे. एका गावात एकापेक्षा जास्त प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्था असल्यास त्यांचे विलीनीकरण केले जाईल. तसेच सध्या गावपातळीवर ज्या प्राथमिक पतपुरवठा संस्था कार्यरत आहेत, त्या खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना पतपुरवठा करत आहेत, की नुसतं राजकारणासाठी कागदोपत्री संस्था चालवून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांवर आपला वर्चस्व ठेवला जात आहे, हेही तपासले जाणार आहे.

PACS : सत्ताधारी भाजप गाव पातळीवरील सहकारी चळवळीत पाय रोण्याचा प्रयत्न?

दरम्यान, हे फक्त गाव पातळीवर सहकारी कृषी पतपुरवठा सुदृढ करण्यासाठी केले जात आहे असं नाही. तर यामागे राजकीय हेतू असल्याचे नाकारता येत नाही. सध्या गाव पातळीवर बहुतांशी प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्थांच्या माध्यमातून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राजकीय वजन कायम आहे. मात्र, अस्तित्वात असलेल्या प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्था ंच्या पुनर्गठनातून आणि नव्या संस्था स्थापन करून सत्ताधारी भाजप गाव पातळीवरील सहकारी चळवळीत पाय रोण्याचा प्रयत्न करत आहे, असंही बोलले जात आहे.

PACS News :  प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्थांच्या पुनर्गठनासाठी काय केले जाणार?

- राज्यातील प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्था ंच्या नोंदणीचे नवे निकष लागू केले जाणार..

- त्यासाठी सहकार विभागाची प्रक्रिया सुरू..

- राज्यातील प्रत्येक महसुली गावात एक प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्था राहील..(गावात एकापेक्षा जास्त पॅक राहणार नाही..)

- सध्या राज्यातील 27000 पेक्षा जास्त महसुली गावांपैकी फक्त 20000 गावांमध्येच प्राथमिक पत पुरवठा संस्था कार्यरत आहे..

- त्यामुळे राज्यात नवीन 7000 पेक्षा जास्त प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्था स्थापन होणार..

- ज्या 20000 गावात प्राथमिक पत पुरवठा संस्था कार्यरत आहेत, त्या खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांसाठी काम करत आहेत की नुसतं कागदोपत्री संस्था चालवल्या जात आहे, हे ही तपासले जाणार...

- कार्यरत प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्थांची आर्थिक स्थिती तपासली जाईल..

- आर्थिक दृष्ट्या कमकुवत संस्था एकतर बंद केल्या जातील किंवा त्यांचे सक्षम संस्थेमध्ये विलीनीकरण केले जाईल..

- मात्र एका गावात फक्त एकच प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्था राहील..

- राजकीय दृष्टिकोनातून गाव पातळीवरील प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्थांच्या माध्यमातून सहकार आणि राजकीय क्षेत्रात असलेला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा वर्चस्व कमी करण्यासाठी भाजपकडून ही राजकीय खेळी खेळले जात असल्याचे विश्लेषकांना वाटतंय.

 इतर महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Girish Mahajan on Rohit Pawar: रोहित पवारांनी आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी वल्गर विधानं करू नये; गिरीश महाजनांचा जोरदार पलटवार, जय पवारांवरही बोलले
रोहित पवारांनी आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी वल्गर विधानं करू नये; गिरीश महाजनांचा जोरदार पलटवार, जय पवारांवरही बोलले
Nanded Crime: 'मी मारणे गँगचा शार्प शूटर बोलतोय... नांदेड बसस्थानकात बॉम्बस्फोट होणार'; पोलीस कंट्रोल रुममधील फोनमुळे एकच खळबळ
'मी मारणे गँगचा शार्प शूटर बोलतोय... नांदेड बसस्थानकात बॉम्बस्फोट होणार'; पोलीस कंट्रोल रुममधील फोनमुळे एकच खळबळ
Gas cylinder LPG: इराण-अमेरिका युद्धामुळे घरगुती सिलेंडरच्या खरेदीच्या नियमात महत्त्वाचा बदल, सर्वसामान्यांमध्ये संभ्रमावस्था
इराण-अमेरिका युद्धामुळे घरगुती सिलेंडरच्या खरेदीच्या नियमात महत्त्वाचा बदल, सर्वसामान्यांमध्ये संभ्रमावस्था
Maharashtra Live blog updates: गोव्यात 'बिबट्या'ची दहशत, स्कुटरवर झेप बहीणभाऊ जखमी
Maharashtra Live blog updates: गोव्यात 'बिबट्या'ची दहशत, स्कुटरवर झेप बहीणभाऊ जखमी
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

AI Film on Shivaji Maharaj : संभाजीनगरच्या गृहिणीची कमाल, AI ने थेट शिवरायांवर सिनेमा बनवला!
Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report
Mojtaba Khamenei Iran :  मोजतबा खामेनींच्या नावाला अमेरिकेचा विरोध Special Report
Gas Shortage India : शिगेला युद्धज्वर; भारत 'गॅस'वर Special Report
Amravati SSC Exam : पेपर लिहिला घरात, कोण जाणार तुरुंगात? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: इस्त्रायलनं पहिल्यांदा गाझापट्टीत शाळा, दवाखाने, बाजारेपठ, नागरी वस्त्या संपवल्या; आता इराणमद्ये तेलसाठे नष्ट करण्यास सुरुवात, 30 इंधन टँक, तेल डेपो टार्गेट
Video: इस्त्रायलनं पहिल्यांदा गाझापट्टीत शाळा, दवाखाने, बाजारेपठ, नागरी वस्त्या संपवल्या; आता इराणमद्ये तेलसाठे नष्ट करण्यास सुरुवात, 30 इंधन टँक, तेल डेपो टार्गेट
Gas cylinder LPG: इराण-अमेरिका युद्धामुळे घरगुती सिलेंडरच्या खरेदीच्या नियमात महत्त्वाचा बदल, सर्वसामान्यांमध्ये संभ्रमावस्था
इराण-अमेरिका युद्धामुळे घरगुती सिलेंडरच्या खरेदीच्या नियमात महत्त्वाचा बदल, सर्वसामान्यांमध्ये संभ्रमावस्था
Dhurandhar 2: धुरंधर 2 च्या ट्रेलरचा धुरळा! अख्खं बॉलिवूड हैराण, ऋतिकसह अनेकांनी पटापट केल्या कमेंटस
धुरंधर 2 च्या ट्रेलरचा धुरळा! अख्खं बॉलिवूड हैराण, ऋतिकसह अनेकांनी पटापट केल्या कमेंटस
Ajit Pawar Death Plane Crash: रोहित पवारांच्या साखर कारखान्यामुळे अजितदादांच्या विमानाला अपघात? भाजप नेत्याचा गंभीर आरोप
रोहित पवारांच्या साखर कारखान्यामुळे अजितदादांच्या विमानाला अपघात? भाजप नेत्याचा गंभीर आरोप
Varun Chakaravarthy Ind Vs NZ ICC T20 World Cup Final 2026: भारत Vs न्यूझीलंड फायनलपूर्वी सर्वात मोठी अपडेट, वरुण चक्रवर्ती प्लेईंग इलेव्हनमधून बाहेर? प्रॅक्टिस सेशनमध्ये नेमकं काय घडलं?
भारत Vs न्यूझीलंड फायनलपूर्वी सर्वात मोठी अपडेट, वरुण चक्रवर्ती प्लेईंग इलेव्हनमधून बाहेर? प्रॅक्टिस सेशनमध्ये नेमकं काय घडलं?
Pune Crime: जुन्या वादातून पुण्यात गोळीबाराचा थरार! विदेशी बनावटीच्या पिस्तूल अन् जिवंत काडतुसांसह दोघांना अटक
जुन्या वादातून पुण्यात गोळीबाराचा थरार! विदेशी बनावटीच्या पिस्तूल अन् जिवंत काडतुसांसह दोघांना अटक
टीम इंडिया अहमदाबादमध्ये, इकडे मुंबईच्या शिवाजी पार्कवर रोहितची फटकेबाजी, चाहत्यांची गर्दी
टीम इंडिया अहमदाबादमध्ये, इकडे मुंबईच्या शिवाजी पार्कवर रोहितची फटकेबाजी, चाहत्यांची गर्दी
Iran vs Israel War: नवव्या दिवशीही इराण-इस्रायलचा संघर्ष सुरूच, तेहरानवर भीषण बॉम्बहल्ले, इराणमध्ये आतापर्यंत 1200 जणांचा मृत्यू; दुबईत मुंबईतील पर्यटक अडकले
नवव्या दिवशीही इराण-इस्रायलचा संघर्ष सुरूच, तेहरानवर भीषण बॉम्बहल्ले, इराणमध्ये आतापर्यंत 1200 जणांचा मृत्यू; दुबईत मुंबईतील पर्यटक अडकले
Embed widget