एक्स्प्लोर

कांद्याच्या दरात मोठी घसरण, उत्पादन खर्चही निघेना, शेतकरी संघटना आक्रमक, 1500 रुपये अनुदान देण्याची मागणी 

सध्या राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी संकटता आहेत. कारण कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.

Nashik onion Price : सध्या राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी संकटता आहेत. कारण कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. उत्पादन खर्चही निघने कठीण झालं आहे. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत. असातच स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आक्रमक पवित्रा घेतला आहे. कांद्याच्या घसरत्या दराविरोधात नाशिक जिल्ह्यातील विंचूर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रास्ता रोको आंदोलन केलं. कांद्याला 1 हजार 500 रुपये अनुदान देण्याची मागणी केली आहे.

कांद्याच्या दरात सातत्याने घसरत असल्यामुळं शेतकरी संघटना आक्रमक

कांद्याच्या दरात सातत्याने घसरण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आज विंचूर येथे उपबाजार समितीसमोर नाशिक–छत्रपती संभाजीनगर राज्य मार्गावर रास्ता - रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलना दरम्यान, संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत शासनाविरोधात संताप व्यक्त केला. सध्या कांद्याला उत्पादन खर्चापेक्षाही कमी दर मिळत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. यामुळं कांद्याला तात्काळ पंधराशे रुपये प्रति क्विंटल अनुदान द्यावे, तसेच कांद्याला समांतर बाजार भाव योजना लागू करावी आदी मागण्या करण्यात आल्या.

साधारणत: गेल्या दोन महिन्यांत कांद्याचे दर क्विन्टलला 800 रुपयांनी घसरले आणि नाशिक जिल्ह्यात आंदोलनाचे सत्र सुरू झाले. लाल कांद्याची आवक वाढलेली असताना देशांतर्गत घटलेली मागणी आणि थंडावलेली निर्यात घाऊक बाजारातील दरावर प्रभाव पाडत आहे. उशिराच्या खरीपापाठोपाठ (लेट खरीप) लवकरच उन्हाळी कांदा बाजारात येण्यास सुरुवात होईल. वेळीच उपाययोजना न झाल्यास दरात चढ-उताराची भीती शेतकरी वर्गासह बाजार समित्यांकडून व्यक्त केली जात आहे.

शेतकऱ्यांना कांदा लागवडीचा खर्चसुद्धा निघत नाही

कांद्याचा लागवडीचा हंगाम हा 15 नोव्हेंबर ते 15 जानेवारी असतो. मात्र, यंदा ऑक्टोबरच्या शेवटच्या आणि नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात पाऊस झाल्यामुळे कांदा रोपांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे लागवडीसाठी रोपांचा तुटवडा जाणवत आहे. कांदा बियाणांचे दर प्रतिकिलो 2500 ते 3000 रुपये आहेत. एकरी तीन किलो बियाणे लागते. त्यामुळे शेतकऱ्यांना कांदा लागवडीचा खर्चसुद्धा निघत नसल्याने आता कांदा लागवड करणे शेतकऱ्यांना परवडत नाही. अतिवृष्टी, अवकाळी पावसामुळे कांदा मोठ्या प्रमाणात खराब झाला आहे. सोलापूर जिल्ह्यासह अनेक ठिकाणी खरीप आणि लेट खरीप पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांनी लाखो रुपये खर्च करून पिकविलेला कांदा मातीमोल झाला आहे. 

कांद्याचा दर सध्या 8 ते 10 रुपये प्रतिकिलोवर

सध्या कांद्याचे दर कमी असून, काढणीनंतर जेव्हा कांदा विक्रीसाठी बाजारात येतो, तेव्हा अनेक वेळा बाजारभावात खूप घसरण होते. यामुळे शेतकऱ्यांना लागवडीचा खर्चही मिळणे कठीण झाले आहे. यापूर्वी काही ठिकाणी दोन महिन्यांपूर्वी 40 रुपये किलो असलेला कांद्याचा दर सध्या 8 ते 10 रुपये प्रतिकिलोवर आला आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Yugendra Pawar: अजितदादांचं विमान पडलं तिकडे एकही मोठं झाड नाही, केवळ लहान झुडपं आहेत; युगेंद्र पवारांकडून डीजीसीएच्या रिपोर्टमधील चूक समोर आणली
अजितदादांचं विमान पडलं तिकडे एकही मोठं झाड नाही, केवळ लहान झुडपं आहेत; युगेंद्र पवारांकडून डीजीसीएच्या रिपोर्टमधील चूक समोर आणली
Ritu Tawde: मुंबईच्या महापौर रितू तावडेंचं गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना पत्र; भूपेंद्रभाई पटेलांकडे केली मोठी मागणी
मुंबईच्या महापौर रितू तावडेंचं गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना पत्र; भूपेंद्रभाई पटेलांकडे केली मोठी मागणी
Rajya Sabha Election 2026: राज्यसभा उमेदवारीपूर्वी एकनाथ शिंदेंची निर्णायक बैठक; निवडणूक बिनविरोध की दुसरा उमेदवार देणार? घडामोडींना वेग
राज्यसभा उमेदवारीपूर्वी एकनाथ शिंदेंची निर्णायक बैठक; निवडणूक बिनविरोध की दुसरा उमेदवार देणार? घडामोडींना वेग
Rajya Sabha Election 2026 Maharashtra Candidate Full List: भाजप, शिवसेना, ठाकरे गटपासून दोन्ही राष्ट्रवादीपर्यंत...राज्यसभेसाठी महाराष्ट्रातून कुणाला उमेदवारी?, पाहा संपूर्ण यादी...
भाजप, शिवसेना, ठाकरे गटपासून दोन्ही राष्ट्रवादीपर्यंत...राज्यसभेसाठी महाराष्ट्रातून कुणाला उमेदवारी?, पाहा संपूर्ण यादी...
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut Mumbai PC : गणित जमत नसल्यानं प्रियंका चतुर्वेदी राज्यसभेपासून दूर - संजय राऊत
Special Report Iran vs America : ब्रिटनच्या वेगळ्या भूमिकेवरुनही ट्रम्प यांचा संताप
Special Report Raj Thackeray - Uddhav Thackeray : मनसे-ठाकरेसेनेतील नाराजीवर तोडगा निघाला?
Special Report Rajya Sabha : राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांची घोषणा
Jalgaon Banana : केळीचे दर 2.500 रुपयांवरुन 1500 रुपयांवर, युद्धाचा उत्पादकांना फटका

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nitish Kumar: नितीशकुमारांच्या बिहारी राजकारणाच्या पर्वाचा अखेर शेवट; राज्यसभेत दुसरी इनिंग सुरु करणार! नवा मुख्यमंत्री भाजपचा की जेडीयूचा होणार?
नितीशकुमारांच्या बिहारी राजकारणाच्या पर्वाचा अखेर शेवट; राज्यसभेत दुसरी इनिंग सुरु करणार! नवा मुख्यमंत्री भाजपचा की जेडीयूचा होणार?
Rajya Sabha Election 2026 Shivsena Shinde Group Candidate: राज्यसभेच्या तिकिटासाठी तेंडुलकरच्या लग्नमंडपातून धावपळ; शिंदेंच्या कारच्या मागे शायना एनसी धावत सुटल्या, नेमकं काय घडलं?, VIDEO
राज्यसभेच्या तिकिटासाठी तेंडुलकरच्या लग्नमंडपातून धावपळ; शिंदेंच्या कारच्या मागे शायना एनसी धावत सुटल्या, नेमकं काय घडलं?, VIDEO
Rajya Sabha Election 2026 Jyoti Waghmare: एकनाथ शिंदेंचा मास्टरस्ट्रोक, आंबेडकरी चळवळीतील आक्रमक चेहऱ्याला शिवसेनेकडून राज्यसभा निवडणुकीसाठी संधी, कोण आहेत ज्योती वाघमारे?
एकनाथ शिंदेंचा मास्टरस्ट्रोक, आंबेडकरी चळवळीतील आक्रमक चेहऱ्याला राज्यसभा निवडणुकीसाठी संधी, कोण आहेत ज्योती वाघमारे?
अमेरिका इस्त्रायलच्या इराण हल्ल्याचे 100 तास; एक हजारांवर मृत्यूमुखी, 17 इराणी जहाजे बुडाली; 9 देशातील 14 अमेरिकन लष्करी तळ उद्ध्वस्त, भारताच्या हद्दीतही अमेरिकेची थेट घुसखोरी
अमेरिका इस्त्रायलच्या इराण हल्ल्याचे 100 तास; एक हजारांवर मृत्यूमुखी, 17 इराणी जहाजे बुडाली; 9 देशातील 14 अमेरिकन लष्करी तळ उद्ध्वस्त, भारताच्या हद्दीतही अमेरिकेची थेट घुसखोरी
BJP Working Committee: राज्यसभा निवडणुकीच्या धामधुमीत भाजपकडून कार्यकारिणीची घोषणा, उज्ज्वल निकमांच्या मुलावर मोठी जबाबदारी
भाजपकडून मुंबई प्रदेश कार्यकारिणीची घोषणा, उज्ज्वल निकमांच्या मुलावर मोठी जबाबदारी
बिहारमधील नितीशपर्व संपल्यात जमा! राज्यसभेला आज अर्ज दाखल करण्याची शक्यता, अमित शाह आजच पाटण्यात येणार; कार्यकर्त्याचा सीएम निवासस्थानासमोर आक्रोश, 'म्हणाले, ही गद्दारी, हा निर्णय त्यांचा नाही...'
बिहारमधील नितीशपर्व संपल्यात जमा! राज्यसभेला आज अर्ज दाखल करण्याची शक्यता, अमित शाह आजच पाटण्यात येणार; कार्यकर्त्याचा सीएम निवासस्थानासमोर आक्रोश, 'म्हणाले, ही गद्दारी, हा निर्णय त्यांचा नाही...'
Sharad Ponkshe On Kerala Story 2: 'प्रत्येक हिंदू माणसानं...', 'द केरला स्टोरी 2' सिनेमाबाबत शरद पोंक्षेंनी स्पष्टच सांगितलं, हिंदी सिनेस्टार्सनाही सुनावलं
'प्रत्येक हिंदू माणसानं...', 'द केरला स्टोरी 2' सिनेमाबाबत शरद पोंक्षेंनी स्पष्टच सांगितलं, हिंदी सिनेस्टार्सनाही सुनावलं
Pune Crime News: पुण्यात लेकीची छेड काढणाऱ्या विद्यार्थ्याला बापाने लोळवून लोळवून मारलं, हुल्लडबाजाला बेदम चोप
पुण्यात लेकीची छेड काढणाऱ्या विद्यार्थ्याला बापाने लोळवून लोळवून मारलं, हुल्लडबाजाला बेदम चोप
Embed widget