एक्स्प्लोर

Sugarcane News : शेतकऱ्यांची चिंता वाढली, महाराष्ट्रात 17.5 लाख टन ऊस शिल्लक, जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत कारखाने सुरु राहणार

राज्यात अतिरीक्त उसाचा प्रश्न गंभीर बनला आहे. महाराष्ट्रात अद्याप 17.5 लाख टन ऊस शिल्लक आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

Sugarcane News : यंदाचा उसाचा गाळप हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. हंगाम संपत आला तरी अद्याप राज्यातील काही जिल्ह्यामध्ये ऊस शिल्लक आहे. राज्यात अतिरीक्त उसाचा प्रश्न गंभीर बनला आहे. महाराष्ट्रात अद्याप 17.5 लाख टन ऊस शिल्लक आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. आमचा ऊस कारखान्याला जाणार की नाही? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर पडला आहे. दरम्यान, राहिलेल्या या उसाचे गाळप या महिन्याच्या अखेरीस पूर्ण केले जाईल अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्याचबरोबर 30 हून अधिक साखर कारखाने ऊस संपेपर्यंत कार्यरत राहतील असेही ते म्हणाले.

महाराष्ट्रात दरवर्षी ऊस गाळप हंगाम साधारणपणे ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये सुरु होतो. हा हंगाम एप्रिल महिन्याच्या मध्यापर्यंत चालतो. मात्र, यावर्षी उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुले अतिरीक्त उसाच्या गाळपाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अतिरीक्त शिल्लक ऊस असणाऱ्या महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यांपैकी मराठवाड्यातील 7 जिल्ह्यांचा समावेश आहे. मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर ऊस शिल्लक आहे. गेल्या वर्षी झालेल्या चांगल्या पावसानंतर राज्यातील उसाच्या लागवडीखालील क्षेत्रात लक्षणीय वाढ झाली आहे. ऊस गाळप हंगाम संपल्यानंतरही राज्यात सुमारे 17.5 लाख टन ऊस गाळप होण्याच्या प्रतीक्षेत आहे. राज्याच्या काही भागात यंदाचा ऊस गाळप हंगाम हा जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सुरु राहू शकतो अशी माहिती साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली आहे.

जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत कारखाने सुरु राहणार

सध्या राज्यभरातील शेतात सध्या सुमारे 17.5 लाख टन उसाचे क्षेत्र शिल्लक आहे. यातील बहुतांश ऊस 31 मे पर्यंत गाळप केला जाईल. अहमदनगर आणि जालना जिल्ह्यांतील काही भागात, जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत गाळप सुरु राहू शकेल असे त्यांनी सांगितले.  इतर राज्यातून 129 हार्वेस्टर आणण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत. त्याद्वारे उसाची तोडणी सुरु आहे. एकट्या जालना जिल्ह्यात सध्या 29 हार्वेस्टर काम करत असल्याची माहिती शेखर गायकवाड यांनी दिली. 

मागील वर्षीच्या तुलनेत यंदा ऊस लागवडीत वाढ

राज्यात 2020-21 मध्ये 11.42 लाख हेक्‍टरवर उसाची लागवड झाली होती, परंतु यावर्षी (2021-22) हा आकडा 2.25 लाख हेक्‍टरने वाढून 13.67 लाख हेक्टर झाला आहे. गतवर्षी 1 हजार 13.31 लाख टन उसाचे गाळप झाले होते. तर यावर्षी (16 मे पर्यंत) 1 हजार 300.62 लाख टन उसाचे गाळप झाले आहे. आत्तापर्यंत गाळपात 287.31 लाख टनांची वाढ झाली आहे. राज्यात 30 हून अधिक साखर कारखाने सुरु राहू शकतात. 15 मेपर्यंत राज्यातील एकूण 199 साखर कारखान्यांपैकी 126 कारखान्यांनी या हंगामासाठी त्यांचे कामकाज बंद केले आहे. 25 मे पर्यंत हा आकडा 163 पर्यंत जाऊ शकतो. उर्वरीत 36 साखर कारखाने उसाचा साठा संपेपर्यंत काम सुरु ठेवू शकतील अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

कोणत्या जिल्ह्यात किती ऊस शिल्लक

सध्या बीडमध्ये 4 लाख टन, त्यापाठोपाठ जालना 3.90 लाख टन, अहमदनगर 3 लाख टन, लातूर 2.42 लाख टन, उस्मानाबाद 2.38 लाख टन, सातारा 1 लाख टन, नांदेड 63 लाख टन, नांदेड येथे 63 लाख टन ऊस शिल्लक आहे. औरंगाबादमध्ये 50,000 टन आणि परभणीत 30,000 टन ऊस शिल्लक असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दली आहे. दरम्यान, 2022-23 मध्ये ऊस गाळपाचे नियोजन थोडे लवकर सुरु होईल अशी माहिती त्यांनी दिली.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis: अदानी किंवा कोणीही असो, महाराष्ट्रात गुंतवणूक करणाऱ्यांचं स्वागतच करु; फडणवीसांनी राज ठाकरेंना ठणकावून सांगितलं
अदानी किंवा कोणीही असो, महाराष्ट्रात गुंतवणूक करणाऱ्यांचं स्वागतच करु; फडणवीसांनी राज ठाकरेंना ठणकावून सांगितलं
Raj Thackeray : मुंबई विमानतळावर गरबा खेळलात, मराठीपण पुसून टाकताय? मुंबईत फक्त ढोल-ताशा आणि लेझीमच वाजणार, बाकी नाटकं नकोत; राज ठाकरेंचा इशारा
मुंबई विमानतळावर गरबा खेळलात, मराठीपण पुसून टाकताय? मुंबईत फक्त ढोल-ताशा आणि लेझीमच वाजणार, बाकी नाटकं नकोत; राज ठाकरेंचा इशारा
Anil Shinde : शिवसेनेचे अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष अनिल शिंदेंच्या घरी छापा, अनिल शिंदेंची प्रकृती बिघडली, थेट रुग्णालयात दाखल
शिवसेनेच्या अहिल्यानगर जिल्हाध्यक्षांच्या घरी छापा, अनिल शिंदेंची प्रकृती बिघडली थेट रुग्णालयात दाखल
Raj Thackeray : तिघांना 15 कोटी, एकाला पाच तर एकाला एक कोटीची ऑफर; राज ठाकरेंनी कल्याण-डोंबिवलीतील उमेदवार समोर आणले
तिघांना 15 कोटी, एकाला पाच तर एकाला एक कोटीची ऑफर; राज ठाकरेंनी कल्याण-डोंबिवलीतील उमेदवार समोर आणले

व्हिडीओ

Mahapalika Parishad Thane :अंगावर घेऊ नका, 'त्या' नेत्याचं नावं घेतलं तर शिंदेंची शिवसेना बदनाम होईल
Shrikant Shinde Majha Katta : पळवापळवी, राजकीय कलह ते युती, श्रीकांत शिंदेंसोबत माझा कट्टावर चर्चा
Uddhav Thackeray Full Speech : मुंबईचा घास भाजपला गिळू देणार नाही, 20 वर्षानंतर भावासमोर तुफान भाषण
Aaditya Thackeray Speech ShivajiPark: भरसभेत फडणवीसांची मिमिक्री, कोस्टल रोडवरून हल्लाबोल
Praniti Shinde on BJP :  काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेची देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis: अदानी किंवा कोणीही असो, महाराष्ट्रात गुंतवणूक करणाऱ्यांचं स्वागतच करु; फडणवीसांनी राज ठाकरेंना ठणकावून सांगितलं
अदानी किंवा कोणीही असो, महाराष्ट्रात गुंतवणूक करणाऱ्यांचं स्वागतच करु; फडणवीसांनी राज ठाकरेंना ठणकावून सांगितलं
Raj Thackeray : मुंबई विमानतळावर गरबा खेळलात, मराठीपण पुसून टाकताय? मुंबईत फक्त ढोल-ताशा आणि लेझीमच वाजणार, बाकी नाटकं नकोत; राज ठाकरेंचा इशारा
मुंबई विमानतळावर गरबा खेळलात, मराठीपण पुसून टाकताय? मुंबईत फक्त ढोल-ताशा आणि लेझीमच वाजणार, बाकी नाटकं नकोत; राज ठाकरेंचा इशारा
Anil Shinde : शिवसेनेचे अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष अनिल शिंदेंच्या घरी छापा, अनिल शिंदेंची प्रकृती बिघडली, थेट रुग्णालयात दाखल
शिवसेनेच्या अहिल्यानगर जिल्हाध्यक्षांच्या घरी छापा, अनिल शिंदेंची प्रकृती बिघडली थेट रुग्णालयात दाखल
Raj Thackeray : तिघांना 15 कोटी, एकाला पाच तर एकाला एक कोटीची ऑफर; राज ठाकरेंनी कल्याण-डोंबिवलीतील उमेदवार समोर आणले
तिघांना 15 कोटी, एकाला पाच तर एकाला एक कोटीची ऑफर; राज ठाकरेंनी कल्याण-डोंबिवलीतील उमेदवार समोर आणले
Maharashtra Live Updates: आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघात पैसेवाटपाचे आरोप
Maharashtra Live Updates: आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघात पैसेवाटपाचे आरोप
देवेंद्र फडणवीसांनीही व्हिडिओ लावले, अदानींचे फोटो दाखवले; मुंबई विमानतळावरुन ठाकरे बंधूचं नवं घर काढलं
देवेंद्र फडणवीसांनीही व्हिडिओ लावले, अदानींचे फोटो दाखवले; मुंबई विमानतळावरुन ठाकरे बंधूचं नवं घर काढलं
Devendra Fadnavis on Adani: गौतम अदानींच्या साम्राज्याचा इतका झपाट्याने विकास का झाला? देवेंद्र फडणवीसांचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर, म्हणाले...
गौतम अदानींच्या साम्राज्याचा इतका झपाट्याने विकास का झाला? फडणवीसांचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर, म्हणाले...
Ganesh Naik : आम्हाला छेडू नका, नादाला लागलात तर तुमची जागा दाखवणार; गणेश नाईकांचा एकनाथ शिंदेंना इशारा
आम्हाला छेडू नका, नादाला लागलात तर तुमची जागा दाखवणार; गणेश नाईकांचा एकनाथ शिंदेंना इशारा
Embed widget