(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Onion News : फडणवीसांच्या आश्वासनाचं काय झालं? नाफेडकडून अद्यापही बाजार समितीत कांद्याची खरेदी नाहीच, शेतकरी अडचणीत
Onion News : राज्याचे उमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आश्वासन देऊनही बाजार समितीमध्ये अद्याप नाफेडकडून (Nafed) कांद्याची खरेदी सुरु झालेली नाही.
Onion News : कांद्याच्या दरात (Onion Price) घसरण झाल्यामुळं शेतकरी (Farmers) सध्या अडचणीत सापडला आहे. मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे. दरम्यान, राज्याचे उमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आश्वासन देऊनही बाजार समितीमध्ये अद्याप नाफेडकडून (Nafed) कांद्याची खरेदी सुरु झालेली नाही. त्यामुळं उपमुख्यमंत्र्यांनी सभागृहात दिलेलं आश्वासन हवेतच विरलं की काय? असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत.
Devendra Fadnavis : फडणवीसांनी आश्वासन देऊन सहा दिवस उलटले
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाफेडच्या माध्यमातून बाजार समितीत कांद्याची खरेदी सुरु करण्याचं आश्वासन दिलं होतं. हे आश्वासन देऊन सहा दिवस उलटून गेले. तरही अद्याप बाजार समितीत कांद्याची खरेदी सुरु झाली नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. सध्या कांद्याला खूप कमी दर मिळत आहे. या दरातून शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे.
कांद्याला कमीत कमी दोन हजारांचा दर हवा
कांद्याला कमीत कमी प्रतिक्विंटल दोन हजार रुपयांचा दर अपेक्षित असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. दोन हजार रुपयांचा दर मिळाला तरच शेतकऱ्यांच्या हातात थोडेफार पैसे राहतील असे शेतकरी म्हणाले. गेल्या महिन्याभरापासून शेतखऱ्यांच्या कांद्याची विक्री सुरु आहे. मात्र, अद्यापही दरात वाढ झाली नसल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं.
विधीमंडळात देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले होते?
विधामंडळाच्या अधिवेशनात (Budget Session) कांदा प्रश्नावरुन विरोधक आक्रमक झाले होते. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis) यांनी नाफेडच्या माध्यमातून तीन कंपन्यांमार्फत कांदा खरेदी सुरु करण्यात आल्याचे सांगितलं. बाजार समितीमध्ये लवकरच कांदा खरेदी केंद्रे (Onion buying centers) सुरु करण्यात येतील असंही त्यांनी सांगितले होते. मात्र, प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी असल्याचे चित्र दिसून आले. अद्याप नाफेडकडून बाजार समितीत कांद्याची खरेदी सुरु झाली नसल्याची स्थिती दिसत आहे. सध्या महाकिसान वृद्धी अॅग्रो प्रोड्यूसर कंपनी लिमिटेडकडून कांद्याची खरेदी सुरु आहे. मात्र, नाफेडमध्ये खरेदी सुरु नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत.
कांदाप्रश्नी राष्ट्रवादीचे आंदोलन
कांदा प्रश्नावरुन राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. शेतकरी प्रश्नावरुन राष्ट्रवादी काँग्रेसने नाशिक जिल्ह्यातील चांदवडमध्ये रास्ता रोको आंदोलन सुरु केलं आहे. कांद्याचे दर, द्राक्षाचे पडलेले दर, वाढती महागाई या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलन सुरु केलं आहे. राष्ट्रवादीचे आमदार दिलीप बनकर आणि पंकज भुजबळ यांच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरु आहे.
VIDEO : NAFED Market Purchase : नाफेडकडून 6 दिवसानंतरही खरेदी नाहीच, उपमुख्यमंत्र्यांचं आश्वासन हवेत विरलं?
महत्त्वाच्या बातम्या: