Ujani Dam : खुशखबर! आज 'उजनी' धरण प्लसमध्ये येणार, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा
Ujani Dam : इंदापूर शहरासह तालुक्यामध्येही चांगलाच पाऊस झाला आहे. या पावसामुळं उजनी धरणाच्या पाणी साठ्यात देखील वाढ होत आहे.
Ujani Dam Water : सद्या राज्यभर पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. अनेक जिल्ह्यात नदी नाल्यांना पूर आला आहे. काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. दरम्यान या पावसामुळं धरणांच्या पाणी साठ्यात झपाट्यानं वाढ होत आहे. इंदापूर शहरासह तालुक्यामध्येही चांगलाच पाऊस झाला आहे. त्यामुळं बळीराजा सुखावला आहे. तर या पावसामुळं उजनी धरणाच्या पाणी साठ्यात देखील वाढ होत आहे. आत्तापर्यंत उजनी धरणात साडेपाच टीएमसी पाणी आले आहे. काही दिवसांपूर्वी उजनी धरण हे मायनसमध्ये गेलं होतं. मात्र, आज संध्याकाळपर्यंत उजनी धरण हे प्लसमध्ये येईल, अशी माहिती जलसंपदा विभागानं दिली आहे.
जून महिन्यात पावसानं ओढ दिली होती. मात्र, मागच्या काही दिवसापासून इंदापूर तालुक्यात सर्वत्र पावसानं हजेरी दिल्यानं शेतकऱ्यांमध्ये आंनदाचं वातावरण आहे. मुळशी, खडकवासला धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस पडल्यानं उजनी धरणात देखील 5 दिवसात उजनी धरणात साडेपाच टीएमसी पाणी आले आहे. उजनी धरणात जुलैपासून पाणी येण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत उजनी धरणात 7 तारखेपासून साडेपाच टीएमसी पाणी आले आहे. काही दिवसांपूर्वी उजनी धारण हे मायनसमध्ये गेलं होतं. त्यामुळं आज उजनी धरण प्लसमध्ये येमार असल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलं आहे. त्यामुळं शेतकऱ्यांसाठी ही बातमी आनंदाची आहे.
उजनी शेतकऱ्यांसाठी वरदायीनी
सोलापूर जिल्हा हा महाराष्ट्रातील सर्वांत कमी पर्जन्यमान असलेला जिल्हा आहे. तरी या जिल्ह्याला उजनी धरणाने वैभव प्राप्त करुन दिलं आहे. या जिल्ह्यात कमी पाऊस पडत असला तरी पुणे जिल्ह्यात पडणाऱ्या पावसाने हे धरण भरते आणि सोलापूरची तहान भागते. फक्त शेतीच नाही तर उद्योगांना आणि पिण्यासाठी या पाण्याचा उपयोग होतो. शेतकऱ्यांसाठी हे धरण अत्यंत महत्वाचे मानले जाते. या धरणामुळं सोलापूर जिल्ह्याच्या बागायती क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळं उजनी धरण हे सोलापूर जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा बनले आहे. पुणे जिल्ह्यातील इंदापूर, भिगवण या भागाला या धरणातूनच पाणी जाते.
महत्त्वाच्या बातम्या: