एक्स्प्लोर

Union Budget 2022 : हा अर्थसंकल्प शेतीला अधोगतीकडे घेऊन जाणारा, शेतकरी संघटनांची टीका

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर शेतकरी नेत्यांनी टीका केलीय. या अर्थसंकल्पातून शेती क्षेत्राला काहीच मिळाले नसल्याचे स्वतंत्र भारत पक्षाचे प्रमुख अनिल घनवट म्हणाले.

Union Budget 2022 India: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज संसदेत अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. काही जणांकडून केंद्र सरकारचे सरर्थन होत आहे. तर काही जणांनी या अर्थसंकल्पावर जोरदार टीका केली आहे. स्वतंत्र भारत पक्षाचे प्रमुख अनिल घनवट यांनी केंद्र सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पावर जोरदार टीका केली आहे. अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांना काहीच मिळाले नसल्याचे घनवट यांनी म्हटले आहे. देशातील शेतीला अधोगतीकडे घेऊन जाणारे निर्णय या अर्थसंकल्पात घेतले असल्याचे घनवट म्हणाले.

नेमकं काय म्हणाले घनवट?

पंजाबच्या निवडणुका होत आहेत, त्यामुळे या अर्थसंकल्पावर हमीभावाच्या मुद्यावर भर दिला आहे. ही खरेदी आत्तापर्यंत चालूच होती. पंजाबला गहू आणि तांदूळ सोडून इतर पिकाकडे वळवण्याची गरज असल्याचे घनवट म्हणाले. सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन देण्यात येणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले. मात्र, स्वातंत्र्यापूर्वी देशात सेंद्रीय शेतीच केली जात होती. त्यावेळी मोठ्या प्रमाणावर अन्नधान्याची टंचाई होती. अमेरिकेकडून धान्य आयात करावे लागत होते. पुन्हा तिकडेच देशाला घेऊन जायचे आहे का? असा सवाल घनवट यांनी केला आहे. श्रीलंकेने रासायनिक खतांवर बंदी घातली, त्यामुळे त्यांचे 60 टक्के उत्पादन घटले. त्यामुळे त्यांना परदेशातून अन्न आयात करावे लागले, खते खरेदी करावी लागली. त्या दिशेनेच आपला देश जातो की काय अशी शंका वाटत असल्याचे घनवट म्हणाले. जग अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन विकास करत असताना आपण सेंद्रीय शेतीकडे जात असल्याचे अर्थमंत्री म्हणाले.

तेलबियांचे उत्पादन वाढवण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले. कसे देणार ते सांगा? तेलबियांचे साठा मर्यादा लावून प्रोत्साहन देणार का? शेतकऱ्यांच्या तेलबियांना चांगले दर कसे मिळतील यासाठी प्रयत्न करण्याची घोषणा त्यांनी करायला हवी होती असे घनवट म्हणाले. नदीजोड प्रकल्पांची घोषणा करतात. प्रत्यक्षात काहीच होत नसल्याचे घनवट म्हणाले. एकीकडे ड्रोन वापरण्याची परवानगी देता दुसरीकडे किटकनाशकमुक्त शेती करण्याचे सांगता, नेमकं करायचे काय असा सवाल त्यांनी केला. खतांच्या किंमती वाढत आहेत, त्या नियंत्रीत करता येतील का यासाठी काहीही बोलले गेले नाही. प्रक्रिया उद्योगाबाबत काहीही केले नाही. देशातील 40 टक्के नाशीवंत माल फेकून द्यावा लागतो. 

अर्थसंकल्पात  मूळ गोष्टींवर भर देण्याऐवजी हवेतल्या घोषणा -  संदीप जगताप

आज सादर झालेला अर्थसंकल्प शेतकऱ्यांना निराश करणारा आहे. या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी भरघोस तरतूद करण्याऐवजी भाषणबाजीवर भर दिलेला दिसून येतो. खत औषधांच्या किंमती गगनाला भिडल्यात त्यावर नियंत्रण आणण्यासाठी कुठलीही तरतूद नसल्याचे म्हणत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी जोरदार टीका केली. ऑरगॅनिक फार्मिंग ही वास्तव संकल्पना नाही. आज खता औषधांशिवाय शेती अशक्य आहे. म्हणून मूळ गोष्टींवर भर देण्याऐवजी हवेतल्या घोषणा झाल्या. मूलभूत सुविधा सुधरवणे. निर्यात वाढीला प्रोत्साहन देणे, प्रक्रिया उद्योग व शेतीपूरक औजारांना 100  टक्के अनुदान यासाठी भरघोस तरतूद नाही. यामुळे हा हा अर्थसंकल्प शेतकऱ्यांचा नसल्याचे सीतारमण यांनी म्हटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Satish Bhosale : सतीश भोसले उर्फ खोक्या भाई भाजपचा कार्यकर्ता नाही? 2021 सालीच पक्षातून केलेली हकालपट्टी, प्रतिमा मलीन झाल्यानंतर भाजपचं स्पष्टीकरण
सतीश भोसले उर्फ खोक्या भाई भाजपचा कार्यकर्ता नाही? 2021 सालीच पक्षातून केलेली हकालपट्टी, प्रतिमा मलीन झाल्यानंतर भाजपचं स्पष्टीकरण
Khokya Satish Bhosle:
"माफीच्या लायकीचा नाही..."; हरिण, काळवीट मारणाऱ्या खोक्या उर्फ सतीश भोसलेला बिष्णोई गँगकडून धमकी
तब्बल 9 वर्षांनी पतंजली फूड अँड हर्बल पार्क लोकार्पण, मी मुख्यमंत्री होण्याची वाट हे पार्क पाहत होतं, देवेंद्र फडणवीसांची मिश्किल प्रतिक्रिया 
मुख्यमंत्री होण्याची वाट पतंजली फूड अँड हर्बल पार्क पाहत होतं; देवेंद्र फडणवीसांची मिश्किल प्रतिक्रिया 
BJP on Raj Thackeray : घरात बसून कुंभमेळ्याचं पाणी अस्वच्छ म्हणणं चुकीचं; राज ठाकरेंवर भाजपचा पहिला पलटवार
घरात बसून कुंभमेळ्याचं पाणी अस्वच्छ म्हणणं चुकीचं; राज ठाकरेंवर भाजपचा पहिला पलटवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 03 PM TOP Headlines 03PM 08 March 2025Anandache Paan : पेरिपल्स ऑफ हिंदुस्थान, खंडाबद्दल गप्पा; सुनंदा भोसेकर यांचं संशोधनात्मक लिखाण | 09 March 2025Raj Thackeray : अंधश्रद्धेतून जरा बाहेर या, डोकी हलवा : राज ठाकरेRaj Thackeray On Kumbmela Water : गंगा स्वच्छ होणार हे राजीव गांधी असल्यापासून ऐकतोय : राज ठाकरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satish Bhosale : सतीश भोसले उर्फ खोक्या भाई भाजपचा कार्यकर्ता नाही? 2021 सालीच पक्षातून केलेली हकालपट्टी, प्रतिमा मलीन झाल्यानंतर भाजपचं स्पष्टीकरण
सतीश भोसले उर्फ खोक्या भाई भाजपचा कार्यकर्ता नाही? 2021 सालीच पक्षातून केलेली हकालपट्टी, प्रतिमा मलीन झाल्यानंतर भाजपचं स्पष्टीकरण
Khokya Satish Bhosle:
"माफीच्या लायकीचा नाही..."; हरिण, काळवीट मारणाऱ्या खोक्या उर्फ सतीश भोसलेला बिष्णोई गँगकडून धमकी
तब्बल 9 वर्षांनी पतंजली फूड अँड हर्बल पार्क लोकार्पण, मी मुख्यमंत्री होण्याची वाट हे पार्क पाहत होतं, देवेंद्र फडणवीसांची मिश्किल प्रतिक्रिया 
मुख्यमंत्री होण्याची वाट पतंजली फूड अँड हर्बल पार्क पाहत होतं; देवेंद्र फडणवीसांची मिश्किल प्रतिक्रिया 
BJP on Raj Thackeray : घरात बसून कुंभमेळ्याचं पाणी अस्वच्छ म्हणणं चुकीचं; राज ठाकरेंवर भाजपचा पहिला पलटवार
घरात बसून कुंभमेळ्याचं पाणी अस्वच्छ म्हणणं चुकीचं; राज ठाकरेंवर भाजपचा पहिला पलटवार
रक्ताच्या प्रत्येक थेंबाची किंमत मोजली जाईल, संतोष देशमुखांना क्रूरपणे संपवलं, बारामतीत आक्राेश मोर्चात कुटुंबीय आक्रमक, Photos
रक्ताच्या प्रत्येक थेंबाची किंमत मोजली जाईल, संतोष देशमुखांना क्रूरपणे संपवलं, बारामतीत आक्राेश मोर्चात कुटुंबीय आक्रमक, Photos
IND vs NZ Champions Trophy 2025 Final: चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात 'यांच्या' खांद्यांवर महत्त्वाची जबाबदारी; आणीबाणीच्या परिस्थिती निभावणार मोलाची भूमिका
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात 'यांच्या' खांद्यांवर महत्त्वाची जबाबदारी; आणीबाणीच्या परिस्थिती निभावणार मोलाची भूमिका
Aaditya Thackeray : एकनाथ शिंदेंची मिमिक्री ते भाजपवर प्रहार, लोकसभेचं यश ते विधानसभेतील वोटर फ्रॉड; निर्धार मेळाव्यातून आदित्य ठाकरेंची जोरदार फटकेबाजी
एकनाथ शिंदेंची मिमिक्री ते भाजपवर प्रहार, लोकसभेचं यश ते विधानसभेतील वोटर फ्रॉड; निर्धार मेळाव्यातून आदित्य ठाकरेंची जोरदार फटकेबाजी
भारतीय रेल्वेगाड्यांच्या नावांमधून दिसणारी भारतीय संस्कृती!
भारतीय रेल्वेगाड्यांच्या नावांमधून दिसणारी भारतीय संस्कृती!
Embed widget