Dadaji Bhuse : कृषीमंत्र्यांनी गाड्याचा ताफा थांबवत शेतकऱ्यांशी साधला संवाद, शेतमाल स्वतः च विकण्याचं केलं आवाहन
कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी गाड्यांचा ताफा थांबवून शेतकऱ्यांशी संवाद साधला. दादाजी भुसे हे दोन दिवसांच्या हिंगोली आणि परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.
Dadaji Bhuse : राज्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे हे परभणी आणि हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. आज सकाळी हिंगोलीकडे जात असताना त्यांनी परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परिसरात आपला ताफा थांबवून भाजीपाला विक्रेत्या शेतकऱ्यांची भेट घेतली. तसेच त्यांच्याशी संवाद साधून, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच बाराशिव येथील हळद उत्पादक शेतकऱ्यांशी देखील त्यांनी संवाद साधला. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला माल स्वतः च शेतकऱ्यांनी विकला पाहिजे, असे आवाहन यावेळी दादाजी भुसे यांनी शेतकऱ्यांना केले.
गाड्याच्या ताफा थांबवून दादाजी भुसे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यांच्या समस्या देखील यावेळी भुसे यांनी जाणून घेतल्या. उत्पादित केलेला माल स्वतः च शेतकऱ्यांनी विकला पाहिजे असेही भुसे यावेळी म्हणाले. यावेळी स्थानिक शेतकऱ्यांनी कृषीमंत्र्यांना आम्हाला रस्त्यावर बसावे लागते. त्यामुळे बाजारासाठी जागा उपलब्ध करुन देण्याबाबत मागणी केली असता, कृषीमंत्र्यांनी लवकरच यावर पर्याय शोधू असे आश्वासन दिले आहे.
दरम्यान, आज परभणी आणि हिंगोली जिल्हा दौऱ्यावर जात असताना वाटेत बाराशिव (जि.हिंगोली) येथील हळद उत्पादक शेतकऱ्यांशी देखील दादाजी भुसे यांनी संवाद साधला. त्यांच्या शेतात हळद पिक काढणी करताना महिला शेतमजुरांना पाहून गाडी थांबवली. प्रत्यक्षात शेताच्या बांधावर जाऊन उपस्थित महिला शेतमजुर आणि शेतकरी बांधवाची भेट घेऊन भुसे यांनी संवाद साधला. सध्याच्या शेती विषयक अडचणी, त्यावरील उपाययोजना यावर सविस्तर चर्चा करुन उपस्थित अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दादाजी भुसे यांनी केल्या.
मंत्री दादाजी भुसे यांचा 21 आणि 22 एप्रिल असा दोन दिवसांचा हा दौरा असणार आहे. या दोन दिवसात भुसे विविध ठिकाणी भेटी देणार असून, शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. तसेच महिला शेतकरी परिसंवादास देखील उपस्थित राहून ते मार्गदर्शन करणार आहेत. उद्या वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापीठातील कार्यक्रमांना दादाजी भुसे हजेरी लावणार आहेत. त्याठिकाणी बायोमिक्स प्रयोगशाळा इमारतीचा उद्घाटन सोहळा , तसेच सावित्रीबाई फुले मुलींचे वसतीगृह उद्घाटन सोहला संपन्न होणार आहे. या कार्यक्रमांना भुस हजेरी लावणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या: