एक्स्प्लोर
Advertisement
कॅन्सरने जीव गमावलेल्या कर्मचाऱ्यांबद्दल 'सॅमसंग'ची दिलगिरी
LIVE
Background
मुंबई : कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजारांमुळे कर्मचाऱ्यांना जीव गमवावे लागल्याबद्दल 'सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स'ने दिलगिरी व्यक्त केली आहे. संगणक चीप आणि डिस्प्ले (सेमीकंडक्टर) फॅक्टरींमध्ये कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्यात अपयशी ठरल्याबद्दल सॅमसंगने खेद व्यक्त केला आहे. सॅमसंग ही दक्षिण कोरियाई कंपनी तंत्रज्ञान क्षेत्रात बलाढ्य मानली जाते. सॅमसंगमधील आजारी किंवा आजारपणामुळे मृत्युमुखी पडलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांनी दिलेल्या दशकभराच्या लढ्यानंतर कंपनीने तडजोडीचं धोरण स्वीकारलं. सॅमसंगचा माफीनामा हा मध्यस्थांनी सुचवलेल्या सेटलमेंटचा एक भाग आहे. पीडितांना 15 कोटी वोन (अंदाजे 96 लाख रुपये) नुकसानभरपाई दिली जाणार आहे. सॅमसंगमध्ये कार्यरत 240 कर्मचाऱ्यांना 16 प्रकारचे कर्करोग झाल्याचा दावा कुटुंबीयांच्या संघटनेने केला आहे. त्यापैकी 80 जणांचा मृत्यू झाल्याचं संघटनेचं म्हणणं आहे. कर्मचाऱ्यांचा आरोग्याला असलेले संभाव्य धोके ओळखण्यात कंपनी अपयशी ठरल्याचं सॅमसंगच्या डिव्हाईस सोल्यूशन विभागाचे अध्यक्ष किनान किम म्हणाले. सॅमसंगमधील डझनभर कर्मचाऱ्यांना ल्युकेमिया किंवा ब्रेन ट्यूमरसारख्या जीवघेण्या आजारांचं निदान झालं होतं. 'आजारपणामुळे जीव धोक्यात आलेले कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांची आम्ही मनापासून माफी मागतो' असं किनान किम यांनी सेओलमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत म्हणाले. यावेळी अनेक कार्यकर्ते आणि कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. सॅमसंग फॅक्टरीत काम करणाऱ्या 23 वर्षीय तरुणीचा ल्युकेमियाने मृत्यू झाल्यावर तिचे टॅक्सीचालक पिता हुअँग सँग गी यांनी भरपाई घेण्यास नकार दिला होता. त्यानंतर अशाप्रकारे मृत्युमुखी पडलेल्या कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय आणि कंपनीत 2007 मध्ये लढा सुरु झाला. चीप आणि डिस्प्ले इंडस्ट्रीत मोठ्या प्रमाणावर रसायनांचा वापर होत असतानाही सुरक्षेत हलगर्जी होत असल्याकडे कुटुंबीयांच्या संघटनेने लक्ष वेधलं होतं.
15:22 PM (IST) • 13 Dec 2018
Congress - 23, BJP-15
Load More
मराठीतील सर्व ताज्या बातम्या सर्वात आधी वाचा एबीपी माझावर. राजकारणपासून कोरोनापर्यंत आणि क्रीडापासून ते बॉलिवूडपर्यंतच्या सर्व अपडेट्स वाचण्यासाठी मराठीतील विश्वसनीय वेबसाईट म्हणजे एबीपी माझा. मराठीतील सर्व बातम्या वाचण्यासाठी लगेच फॉलो करा
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement