India and Pakistan : T-20 विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान पुन्हा एकदा भिडणार : ABP Majha
क्रिकेटच्या मैदानात ऑक्टोबरमध्ये पुन्हा एकदा मौका-मौका पाहायला मिळणार आहे. टी-२० विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान पुन्हा एकदा भिडणार आहेत. २३ ऑक्टोबरला भारत आणि पाकिस्तान आमनेसामने येणार आहेत. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० विश्वचषकाचं वेळापत्रक आयसीसीने प्रसिद्ध केलंय. १६ ऑक्टोबरपासून पात्रता फेरी सामन्यांनी टी-२० विश्वचषकाला सुरुवात होईल. तर २२ ऑक्टोबरपासून सुप-१२ सामन्यांचा थरार सुरु होईल. भारताच्या गटात पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, बांग्लादेश आणि पात्रता फेरीतील दोन संघ असतील. तर दुसऱ्या गटात न्यूझीलंड, श्रीलंका, वेस्ट इंडिज, अफगाणिस्तानसह पात्रता फेरीतील दोन संघांचा समावेश असेल. २०२१ साली झालेल्या टी-२० विश्वचषक सामन्यात पाकिस्ताननं भारताचा पराभव केला होता. त्यामुळे या पराभवाचा बदला घेण्याच्या इराद्याने टीम इंडिया मैदानात उतरेल.























