IND Vs ENG : आजपासून भारत - इंग्लंड तिसरी कसोटी, भारताचा नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय ABP Majha
टीम इंडिया आणि इंग्लंडदरम्यान सुरु असलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसऱ्या सामन्याला आजपासून लीड्सवर सुरुवात होणार आहे. दमदार फॉर्ममध्ये असलेल्या टीम इंडियाचा ही कसोटी जिंकत आघाडी घेण्याचा निर्धार आहे तर इंग्लंडचा संघ हा सामना जिंकून मालिकेत बरोबरी करण्याच्या निर्धारासह उतरणार आहे.
या सामन्यात विशेष लक्ष असेल ते म्हणजो भारतीय कर्णधार विराट कोहलीकडे. कारण अजूनही विराटला लय सापडलेली नाही. लीड्सवर छाप पाडण्यासाठी उत्सुक आहे. भारताकडून रोहित शर्मा आणि के. एल. राहुल या सलामीवीरांची कामगिरी सरस ठरली आहे. या दोघांचा भन्नाट फॉर्म टीम इंडियासाठी फायद्याचा ठरत आहे. असं असलं तरी मधल्या फळीचा फॉर्म हा भारतासाठी चिंतेचा विषय आहे. चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांचे अपयश भारतासाठी चिंताजनक आहे. भारताकडून आज रविचंद्रन अश्विनला संधी मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे शार्दूल ठाकूर दुखापतीतून बाहेर आला असला तरी इशांत शर्माच्या लॉर्ड्सवरील कामगिरीमुळं त्याला संधी मिळण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळं इशांत शर्मा, मोहम्मद शामी, सिराज आणि बुमराह या वेगवान चौकडीसहच टीम इंडिया मैदानात उतरण्याची शक्यता आहे.