एक्स्प्लोर
Yavatmal : यवतमाळमधील भिडेंच्या व्याख्यानाला विरोध, आंबेडकरी कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात
आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे वारंवार चर्चेत राहणाऱ्या संभाजी भिडेंविरोधात यवतमाळमध्ये आंबेडकरवादी संघटनांनी आंदोलन केलंय. शिवाय संभाजी भिडे यांचे पोस्टरही फाडलेत. श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान यवतमाळ विभागाने आज संभाजी भिडे यांचे व्याख्यान आयोजित केलंय. हे व्याख्यात यवतमाळच्या बलवंत मंगल कार्यालयात होणाराय. त्या विरोधात बसस्थानक संविधान चौकात संभाजी भिडेंच्या विरोधात आंदोलन करून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
आणखी पाहा























