एक्स्प्लोर
Cyclone Biparjoy: बिपरजॉय चक्रीवादळ गुजरातवर धडकलं, जीवितहानी नाही : ABP Majha
बिपरजॉय चक्रीवादळ काल रात्री उशिरा गुजरातवर धडकलं. सुदैवानं आतापर्यंत कुठूनही जीवितहानी झाल्याचं वृत्त आलेलं नाही. जिल्हा प्रशासन, NDRF आणि लष्करानं घेतलेल्या खबरदारीचा हा परिणाम म्हणायला हवा. कच्छ आणि सौराष्ट्रमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे, तर मांडवी, मोरबी, पोरबंदरच्या अनेक गावांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला आहे. जखाऊ आणि मांडवीमध्ये सर्वाधिक नुकसान झालंय. तेथील अनेक भागांमध्ये झाडं कोसळली आहेत, विजेचे खांब पडलेत.. अनेक ठिकाणी पत्र्याच्या शेडही उडून गेल्या आहेत. दरम्यान, चक्रीवादळाचा जोर हळूहळू कमी होतोय. आज दिवसभर राजस्थानच्या अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
आणखी पाहा























