एक्स्प्लोर

Nashik Crime News: इव्हेंटच्या नावाखाली विवाहितेचा 'सौदा', दोन लाखांत विक्री करत बळजबरी विवाह लावण्याचा घाट, पोलिसांना कुणकुण लागली अन्...; नाशिकमध्ये नेमकं काय घडलं?

Nashik Crime News : नाशिकमध्ये मुलींच्या अपहरणाच्या घटना वाढत असताना नाशिकच्या सातपूर पोलीस ठाणे हद्दीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

Nashik Crime News: नाशिकमध्ये मुलींच्या अपहरणाच्या घटना वाढत असतानाच सातपूर पोलीस ठाणे हद्दीत एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अवघ्या तीन-चार महिन्यांच्या तान्ह्या बाळाची आई आणि पतीपासून विभक्त असलेल्या महिलेची ‘इव्हेंट मॅनेजमेंट’मध्ये नोकरी देण्याच्या बहाण्याने दोन लाख रुपयांत विक्री करण्यात आल्याचा आरोप आहे. एवढेच नव्हे तर नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथे तिचा जबरदस्तीने विवाह लावण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Nashik Crime News: नोकरीच्या आमिषाने जाळ्यात ओढले

सातपूरच्या कार्बन नाका परिसरात राहणाऱ्या पीडित महिलेला 27 फेब्रुवारी रोजी राणी आणि भागी नावाच्या दोन महिला एजंटांनी संपर्क साधला. “इव्हेंटचे चांगले काम मिळवून देतो,” असे सांगत तिला विश्वासात घेतले. त्यानंतर कारमधून तिला मालेगावमार्गे थेट नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथे नेण्यात आले. तेथे नवनाथ खिरडकर नावाच्या तरुणाकडून दोन लाख रुपये घेत पीडितेच्या इच्छेविरुद्ध तिचा जबरदस्तीने विवाह लावण्यात आल्याचा आरोप आहे. एका रात्रीत आयुष्य उद्ध्वस्त झाल्याची जाणीव झालेल्या पीडितेने 28 फेब्रुवारी रोजी कसाबसा मोबाईलवरून आईशी संपर्क साधून संपूर्ण प्रकार सांगितला.

Nashik Crime News: 300 जणांच्या जमावातून सुटका

पीडितेच्या पालकांनी तातडीने सातपूर पोलीस ठाणे गाठले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांचे पथक लगेच जातेगावकडे रवाना झाले. तेथे सुमारे 300 ग्रामस्थांचा जमाव होता. तणावपूर्ण वातावरणात पोलिसांनी धाडसाने कारवाई करत पीडितेची सुखरूप सुटका केली. या प्रकरणात दोन महिलांना अटक करण्यात आली असून आणखी सहा संशयित फरार आहेत. त्यांच्या शोधासाठी पोलिसांनी विशेष पथके रवाना केली आहेत. या मागे मोठे रॅकेट कार्यरत असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

Nashik Crime News: ऑपरेशन शोध मोहिमेला वेग

नाशिकमध्ये महिलांच्या आणि अल्पवयीन मुलींच्या बेपत्ता होण्याच्या घटना वाढल्याने पोलिसांनी ‘ऑपरेशन शोध’ मोहीम सुरू केली आहे. गेल्या दोन महिन्यांत 79 अल्पवयीन मुला-मुलींचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले आहे. मात्र, गेल्या दोन दिवसांत अंबड, सातपूर आणि इंदिरानगर भागांतून तीन अल्पवयीन मुलींच्या अपहरणाची नोंद झाली आहे. त्यामुळे शहरात चिंतेचे वातावरण आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

UP Ballia Crime: विवाहित प्रेयसीचे अश्लील फोटो, ब्लॅकमेलिंग अन् प्रियकराचा हृदयद्रावक अंत; ओळख मिटवण्यासाठी चेहऱ्यावर टॉयलेट क्लीनर ओतलं, पण सत्य समोर आलंच!

Pune Digital Arrest Scam Crime News: सीबीआय ऑफिसर बोलतोय...तुम्हाला डिजिटल अरेस्ट करण्यात येणार; पुण्यातील वृद्धाची 10 कोटी 74 लाख रुपयांची फसवणूक, नेमकं काय घडलं?

महत्त्वाच्या बातम्या

पान टपरीसमोर उभं असलेल्या युवकावर झाडल्या थेट गोळ्या, धक्क्कादायक घटनेनं नाशिक हादरलं
पान टपरीसमोर उभं असलेल्या युवकावर झाडल्या थेट गोळ्या, धक्क्कादायक घटनेनं नाशिक हादरलं
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?
धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
Embed widget