एक्स्प्लोर
Thane Politics : 'आमच्याकडे Atom Bomb आहे, तो आम्ही फोडतो'; Jitendra Awhad यांचा सरकारला इशारा
ठाण्यात दिवाळीच्या दीपोत्सवानिमित्त ठाकरे गट, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट एकत्र आले. 'तुम्ही सुळसुळ्या आणि टिकल्या फोडा, आमच्याकडे अटॉमबॉम्ब आहे तो आम्ही फोडतो,' असा थेट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी दिला. यावेळी व्यासपीठावर शिवसेनेचे (UBT) माजी खासदार राजन विचारे (Rajan Vichare), जिल्हाप्रमुख केदार दिघे (Kedar Dighe) आणि मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव (Avinash Jadhav) उपस्थित होते. विधानसभा निवडणूक चोरून जिंकल्याचा आरोप आव्हाड यांनी केला. मतदार यादीतील गोंधळाविरोधात १ नोव्हेंबरला निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोठा मोर्चा काढणार असल्याची घोषणाही यावेळी करण्यात आली. यापुढे प्रत्येक अन्यायाविरोधात रस्त्यावर उतरून हक्क मागणार असल्याचे नेत्यांनी स्पष्ट केले. ठाण्यातील तुळजाभवानी मंदिरात हा दीपोत्सव साजरा झाला, जिथे नेत्यांनी एकत्र महाआरती केली.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

नरेंद्र बंडबे
Opinion























