Raj Thackeray Thane Court ठाणे कोर्ट राज ठाकरेंसंदर्भात सुनावणी संपली, गुन्हा कबुल नसल्याचं उत्तर
Raj Thackeray Thane Court ठाणे कोर्ट राज ठाकरेंसंदर्भात सुनावणी संपली, गुन्हा कबुल नसल्याचं उत्तर
Raj Thackeray Thane Court ठाणे: 2008 साली रेल्वे भरतीदरम्यान कल्याण स्थानकावर उत्तर भारतीय उमेदवारांना मनसे कार्यकर्त्यांनी मारहाण करत रेल्वेचे देखील मोठे नुकसान केलं होतं. या हल्ल्यांच्या प्रकरणात मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी आज ठाणे न्यायालयात सुनावणी होती. या सुनावणीसाठी राज ठाकरे ठाणे न्यायालयात दाखल झाले होते. यावेळी ठाणे न्यायालयात नेमकं काय घडलं?, जाणून घ्या... (Raj Thackeray Thane Court) ठाणे न्यायालयातील सुनावणीला काय काय घडलं? (Raj Thackeray Thane Court) - राज ठाकरेंची इतर आरोपींसह ठाणे न्यायालयात उपस्थिती न्यायाधीश- गुन्हा कबूल आहे का? राज ठाकरे- मला गुन्हा कबूल नाही. न्यायाधीश- एक महिन्यात प्रकरण संपून जाईल, सहकार्य करा. राज ठाकरे- पूर्ण सहकार्य करणार. सुनावणी संपली. राज ठाकरे यांचे वकील ओंकार राजूरकर काय म्हणाले? (Raj Thackeray Thane Court) पुढील तारीख अजून पडली नाही, थोड्या वेळाने ती येईल. राज ठाकरे आज हजर झाले. मात्र पुन्हा त्यांना हजर राहण्याची गरज नाही. आज गुन्हा कबूल आहे की नाही? विचारण्यात आले. मात्र राज ठाकरे यांनाही गुन्हा कबूल नाही असे सांगितले. येत्या एका महिन्यात केस पूर्ण होईल, त्यामुळे कोर्टाला सहकार्य करा, असे न्यायाधीशांनी सांगितले. राज ठाकरे पूर्ण सहकार्य करणार आहेत, अशी माहिती राज ठाकरे यांचे वकील ओंकार राजूरकर यांनी सुनावणी झाल्यानंतर दिली.























