एक्स्प्लोर
Sangli मध्ये लसीकरणानंतर Lampi आजाराचं संकट, लसीकरणानंतर 532 जनावरांना बाधा : ABP Majha
मागील महिन्यापासून जनावरांमध्ये प्रादुर्भाव सुरू झालेला लम्पी आजार लसीकरणानंतरही थांबला नसल्यचे राज्यात चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे एकीकडे परतीच्या पावसाने शेतमालाचे प्रचंड नुकसान झालेले असताना दुसरीकडे शेतकऱ्यांचे पशुधनही या लम्पी आजाराच्या वाढत्या संकटामुळे धोक्यात आले आहे. सांगली जिल्ह्यात तर मागील आठवड्याभरात लसीकरण करून देखील ५३२ जनावरांना बाधा झालीय. दुसरीकडे आता ऊस हंगाम सुरू झाल्याने अन्य जिल्ह्यातुन जनावरे ऊस पट्टात येऊ लागलेत.यामुळे लम्पिचा धोका आणखीनच वाढताना दिसत आहे.
आणखी पाहा























