(Source: ECI/ABP News/ABP Majha)
PM Modi in Pune : मोदी, पवार एका मंचावर, विरोधक मोदींना काळे झेंडे दाखवणार
पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक ऑगस्टला शरद पवारांच्या उपस्थितीत लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. पुण्यातील एसपी कॉलेजच्या प्रांगणात हा सोहळा पार पडणार आहे. एकीकडे, या सोहळ्यात शरद पवार उपस्थित राहणार आहेत, तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचा मात्र हा पुरस्कार देण्याला विरोध आहे.. केवळ शरद पवार गटच नाही तर काँग्रेस, ठाकरे गट आणि अनेक सामाजिक संघटनांनी मोदींना पुरस्कार देण्यास विरोध केला आहे. याचाच भाग म्हणून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांच्या नेतृत्वात पुण्यातील अलका टॉकीज चौकात मोदींना काळे झेंडे दाखवण्यात येणार आहेत. याच्या नियोजनासाठी आज साडे अकरा वाजता पुण्यातील काँग्रेस भवनात बैठक होणार आहे. एकूणच, शरद पवार आणि सुशीलकुमार शिंदे मोदींच्या पुरस्कार प्रदान कार्यक्रमास उपस्थित राहणार असले तरी त्यांच्या पक्षांचे नेते त्याचवेळी मोदींच्या विरोधात आंदोलन करणार आहेत.