(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Vishal Patil Sangli Congress Melava : लोकसभेत विशाल पाटलांची बंडखोरी, मेळाव्यात मात्र हजेरी!
सांगलीत नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस कार्यकर्त्यांचा स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला काँग्रेसमधून बंडखोरी करत अपक्ष उमेदवार राहिलेले विशाल पाटील यांनींही हजेरी लावली होती... त्यांच्या हजेरीमुळे चर्चांना उधाण आलय.. सर्व कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी झटून काम केल्याने आणि विशाल पाटील यांच्या विजयाच्या आशा असल्याने या स्नेहमेळावाचं आयोजन करण्यात आल्याचं बोललं जातंय.. तसेच या स्नेहमेळाव्याच्या माध्यमातून आगामी काळात पार पडणाऱ्या विधानसभा निवडणुकीत एकजूट दाखवण्याचा प्रयत्नही करण्यात आलाय. या स्नेहमेळावा मध्ये काँग्रेसचे नेते आमदार विश्वजित कदम, लोकसभेचे अपक्ष उमेदवार विशाल पाटील, शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
Pravara River SDRF Boat : प्रवरा नदीत मोठी दुर्घटना! SDRF ची बोट बुडाली, तिघांचा मृत्यू
उजनी धरणातील बोट दुर्घटना ताजी असतानाचा आता अहमदनगरच्या अकोलेतील प्रवरा नदीत SDRF पथकाची बोट उलटल्याची घटना घडली आहे. यात तिघांचा मृत्यू झाला आहे. बुडालेल्या व्यक्तीचा शोध घेणाऱ्या SDRF पथकाची बोट उलटली आहे. यात 5 जण होते. त्यातून तिघांचा मृत्यू झाला आहे.
हे व्हिडिओ देखील पाहा
उजनी धरणात (Ujani Dam)बोट उलटून बुडाली. यात सहाजण बेपत्ता होते अखेर शोधमोहितमेनंतर पाच जणांचे मृतदेह हाती लागली लागले आहेत. मागील 36 तास या सगळ्यांचा शोध राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे (NDRF) जवान घेत होते. अखेर त्यांना यश आलं असून पाच मृतहेद हाती लागले आहेत आणि एका मृतदेहाचा अजूनही शोध सुरु आहे. यात जाधव पती पत्नी गोकूळ जाधव आणि कोमल जाधव व त्यांची दोन लहान मुले आणि एकाचा मृतदेह हाती लागला आहे. हे मृतदेह बाहेर काढून पोस्ट मार्टम करण्यासाठी करमाळा उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात येणार आहे. आता एकाचा मृतहेद शोधण्यासाठी पथक कामाला लागलं आहे. त्याचा मृतहेद कधी मिळणार याची प्रतिक्षा आहे.
मंगळवारी संध्याकाळी ही घटना घडली होती. सगळे एका नातेवाईकाकडे जागरण गोंधळाला जात असताना अचनक वादळी वाऱ्याला सुरुवात झाली. त्यावेळी बोट पलटी झाली आणि सगळेच पाण्यात उतरले. बोटीला सावरण्याचा प्रयत्न केला मात्र सुसाट्याच्या वाऱ्यानं पाण्याचा प्रवाह वाढला आणि बोटीत पाणी शिरलं. यावेळी बोटीत सात जण होते. यातील पोलीस असलेल्या डोंगरे यांनी पोहून थेट काढ गाठलं मात्र सहाजण पाण्यात बुडाले. डोंगरे यांनी गावात जाऊन या घटनेची माहिती दिली आणि ही घटना समोर आली. त्यानंतर NDRF पथकाकडून शोध सुरु झाला. तब्बल 15 तास शोध घेतला मात्र मृतदेह सापडले नाही. मात्र त्यानंतरही शोध सुरुच ठेवला अखेर 17 तासांनी बोट सापडली. ही बोट जलाशयाच्या तळाशी 35 फूट खोल पाण्यात आढळून आली होती.