Bengaluru Crime : बंगळुरुत महालक्ष्मीचे 59 तुकडे करुन पळाला, आता मुख्य आरोपीचा मृतदेह ओडिशात सापडला, सस्पेन्स वाढला
Bengaluru Mahalakshmi Case : बंगळुरुतील महालक्ष्मी खून प्रकरण उघडकीस आल्यानं खळबळ उडाली होती. या प्रकरणानं नवं वळण घेतलंय.
बंगळुरु : कर्नाटकची राजधानी असलेल्या बंगळुरु शहरातील व्यालीकल भागात तीन मजली इमारतीत पहिल्या मजल्यावरील घरात 29 वर्षांची महालक्ष्मी नावाची महिला वास्तव्यास होती. या इमारतीमधील पहिल्या मजल्यावरील त्या घरात 21 सप्टेंबरला तिच्या मृतदेहाचे तुकडे आढळले होते. हे प्रकरण उघडकीस येताच मोठी खळबळ उडाली होती. महालक्ष्मीच्या हत्येनंतर तिच्या मतृदेहाचे तुकडे फ्रीजमध्ये ठेवण्यात आले होते, इतक्या क्रूरपणे तिची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणानं नव वळण घेतलं आहे. कारण, या प्रकरणातील मुख्य संशयित मुक्ति रंजन राय याचा मृतदेह ओडिशात आढळून आला आहे.
ओडिशातील भद्रक भागात एका व्यक्तीचा मृतदेह झाडाला लटकलेल्या स्थितीत आढळून आल्यानं खळबळ उडाली होती. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मृताची ओळख मुक्ति रंजन राय असल्याचं स्पष्ट केलं. त्या ठिकाणीच एक वही आणि स्कुटी गाडी सापडली.
मुक्ति रंजन राय यानं एका चिठ्ठीत बंगळुरुत त्यानं महालक्ष्मी या महिलेची हत्या केल्याचं कबूल केलं होतं, अशी माहिती आहे. त्यानं तिच्या मृतदेहाचे तुकडे करुन फ्रीजमध्ये ठेवले होते. बंगळुरु पोलिसांनी मुक्ति रंजन राय याच्या भावाची चौकशी केल्यानंतर या घटनेची माहिती मिळाली. बंगळुरु पोलिसांनी त्यानंतर ओडिशा पोलिसांसोबत संवाद साधत या घटनेची माहिती घेतली. ओडिशा पोलिसांच्या माहितीनुसार मुक्ति रंजन रायनं पहाटे 5 ते 5.30 वाजता जीवन संपवलं. बंगळुरु पोलिसांकडून त्याचं लोकेशन ट्रॅक केलं जात होतं, मात्र त्याला पकडण्यापूर्वीच त्यानं जीवन संपवलं.
महालक्ष्मी खून प्रकरणात पोलिसांनी संशयित आरोपी मुक्ति रंजन राय असल्याचं स्पष्ट केलं होतं. पोलिसांच्या दाव्यानुसार महालक्ष्मीचा खून झाला तेव्हापासून आरोपी फरार होता. बंगळुरु पोलिसांनी त्याचा शोध काही राज्यांमध्ये सुरु केला होता.
महालक्ष्मी खून प्रकरण 21 सप्टेंबरला उघडकीस आलं
बंगळुरुच्या व्यालीकल भागात वास्तव्यास असलेल्या महालक्ष्मी या महिलेची हत्या करण्यात आली होती. ही घटना 21 सप्टेंबरला उघडकीस आली मात्र त्याअगोदर 19 दिवसांपूर्वी ही घटना घडली असावी असा अंदाज आहे. महालक्ष्मी ज्या घरात वास्तव्यास होती त्या घरात तिच्या मृतदेहाचे तुकडे आढळले होते.
पोलिसांनी महालक्ष्मीचा खून करणाऱ्या संशयित आरोपीला शोधलं होतं. त्या आरोपीचं कुटुंब मुंबईत राहत असल्याचं पोलिसांना समजलं होतं. आरोपी मुक्ति रंजन रायच्या भावापर्यंत बंगळुरु पोलीस पोहोचले होते. महालक्ष्मीच्या घराजवळच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये सशंयित आरोपी कैद झाला होता. मृत मुक्ति रंजन राय हा मूळचा पश्चिम बंगलाचा होता.
इतर बातम्या :