एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Mumbai Rains: मुंबई धो-धो पाऊस, पण BMC च्या आपातकालीन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मदतीसाठी आलेला एकही फोन उचलला नाही; ठाकरे गटाचा आरोप

Mumbai Rains: हवामान खात्याकडून मुंबईसाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट, शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी. मुंबई महानगरपालिकेकडून कामात कुचराई झाल्याचा ठाकरे गटाचा आरोप

मुंबई: परतीच्या पावसाचा मुंबई शहराला जोरदार फटका बसताना दिसत आहे. मुंबईत बुधवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत होताना दिसले. नेहमीप्रमाणे रस्ते वाहतूक,रेल्वे अशा सर्व सुविधांचा बोजवारा उडाला. त्यामुळे मुंबईकरांना प्रचंड मनस्तापाला सामोरे जावे लागले. अशातच आपल्या विभागात पावसाचे पाणी साठल्यानंतर मुंबई महानगरपालिकेकडे (BMC) मदतीसाठी याचना करणाऱ्या नागरिकांचीही निराशा होताना दिसली. बुधवारी संध्याकाळी मुंबईत प्रचंड पाऊस (Mumbai Rains) पडत असतानाही मुंबई महानगरपालिकेच्या आपातकालीन विभागात मदतीसाठी येणारे फोन उचलले जात नव्हते, असा आरोप ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनी केला आहे. 

सुनील प्रभू यांनी यासंदर्भात मुंबई महापालिका आयुक्त आणि मुंबई पोलीस आयुक्त यांना पत्र लिहून तक्रार केली आहे. मुंबईत मुसळधार पाऊस झालेला असताना जनजीवन विस्कळीत झाले. अशा तातडीच्या परिस्थितीमध्ये महापालिकेच्या आपत्कालीन विभागातील फोन उचलत जात नसल्याच्या तक्रारी स्थानिकांकडून प्राप्त होत असल्याचा सुनील प्रभू यांनी आयुक्तांना पत्रात म्हटले आहे. 

तसेच सखल भागात पाणी सासू नये म्हणून आवश्यक ठिकाणी पंप बसवण्यात आले होते.  परंतु अनेक ठिकाणचे पंप बंद होते. त्यामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप सुनील प्रभू यांनी केला आहे. आपातकालीन परिस्थितीत मुंबईकरांना सुविधा मिळत नसून याबाबत  विभागाच्या सहाय्यक महापालिका आयुक्तांना विशेष सूचना देण्यात याव्यात, अशी विनंती सुद्धा आमदार सुनील प्रभू यांनी केली आहे.

अतिवृष्टीमुळे मुंबईत मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती. वाहतूक नियंत्रण करण्यासाठी रस्त्यावर  पोलीस उपलब्ध नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याचे सुनील प्रभू यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना पत्रातून सांगितले आहे. आपत्कालीन  परिस्थितीत किंवा अतिवृष्टीच्या काळात वाहतूक सुरळीत ठेवण्याकरिता आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, ही विनंती सुद्धा सुनील प्रभू यांनी मुंबई पोलीस आयुक्तांकडे केली आहे.

मेट्रोच्या कामासाठी उघडण्यात आलेल्या ड्रेनेज लाईनमध्ये पडून महिलेचा मृत्यू

मुंबईच्या अंधेरी पूर्वेत Seepz परिसरात बुधवारी रात्री  नऊ-साडेनऊच्या सुमारास रस्ता क्रॉस करत असताना एक महिला दुभाजकावर उघड्या अवस्थेत असलेल्या ड्रेनेज लाईनमध्ये पडली. यामध्ये संबंधित महिलेचा मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान स्थानिक पोलीस आणि मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी घटनास्थळावर तात्काळ धाव घेऊन बचावकार्य सुरू केले होते.

काल संध्याकाळपासून मुसळधार पाऊस सुरू होता . Seepz भागात रस्त्यावर मोठा प्रमाणात पाणी साचले होते. रस्त्याच्या मधोमध डिव्हायडरमध्ये ड्रेनेज लाईन ओपन होती. यामध्ये पडल्यानंतर महिला नाल्यात वाहून 100 मीटर लांब गेली. अग्निशामन दलाच्या जवानांनी तब्बल तासाभराने या महिलेला या नाल्यातून बाहेर काढले. उपचारासाठी कूपर रुग्णालय मध्ये दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान महिलेच्या मृत्यू झाला. 

आणखी वाचा

आजही मुसळधार पाऊस पडणार, मुंबई आणि उपनगरातील शाळा- महाविद्यालयांना सुट्टी जाहीर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mahim Vidhan Sabha: राजपुत्र अमित ठाकरेंचा दारुण पराभव; राज ठाकरेंना मोठा धक्का, महेश सावंत यांनी मारली बाजी
राजपुत्र अमित ठाकरेंचा दारुण पराभव; राज ठाकरेंना मोठा धक्का, महेश सावंत यांनी मारली बाजी
Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk Nikal 2024: राज्यातील 288 मतदारसंघांच्या निकालाचे लेटेस्ट अपडेटस् पाहा एका क्लिकवर...
Maharashtra Result 2024: राज्यातील 288 मतदारसंघांच्या निकालाचे लेटेस्ट अपडेटस् पाहा एका क्लिकवर...
Maharashtra vidhansabha Election Results 2024: कोकणात राणे बंधुचा विजय, वैभव नाईक यांचा धक्कादायक पराभव; निलेश राणेंचा तब्बल 53,000 मताधिक्य
कोकणात राणे बंधुचा विजय, वैभव नाईक यांचा धक्कादायक पराभव; निलेश राणेंचा तब्बल 53,000 मताधिक्य
Maharashtra vidhansabha election results देवेंद्र फडणवीसांची हॅटट्रिक, सलग तिसऱ्यांदा शतकेपार झेंडा; भाजप विजयाचा नवा रेकॉर्ड
देवेंद्र फडणवीसांची हॅटट्रिक, सलग तिसऱ्यांदा शतकेपार झेंडा; भाजप विजयाचा नवा रेकॉर्ड
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raju Waghamare on CM : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा मुख्यमंत्रिपदावर दावा #electionresults2024Maharashtra Election Result 2024 :निवडणुकीत कोणते मुद्दे चर्चेत राहिले?Uday Tanpathakयांचं विश्लेषणMaharashtra Election Result 2024:सत्तेचा मार्ग विदर्भातून?जनता ठरवणार खरी शिवसेना, राष्ट्रवादी कोणतीMaharashtra Election Result 2024 : पहिला कल भाजपच्या बाजूने, टपाली मतमोजणी सुरू

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mahim Vidhan Sabha: राजपुत्र अमित ठाकरेंचा दारुण पराभव; राज ठाकरेंना मोठा धक्का, महेश सावंत यांनी मारली बाजी
राजपुत्र अमित ठाकरेंचा दारुण पराभव; राज ठाकरेंना मोठा धक्का, महेश सावंत यांनी मारली बाजी
Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk Nikal 2024: राज्यातील 288 मतदारसंघांच्या निकालाचे लेटेस्ट अपडेटस् पाहा एका क्लिकवर...
Maharashtra Result 2024: राज्यातील 288 मतदारसंघांच्या निकालाचे लेटेस्ट अपडेटस् पाहा एका क्लिकवर...
Maharashtra vidhansabha Election Results 2024: कोकणात राणे बंधुचा विजय, वैभव नाईक यांचा धक्कादायक पराभव; निलेश राणेंचा तब्बल 53,000 मताधिक्य
कोकणात राणे बंधुचा विजय, वैभव नाईक यांचा धक्कादायक पराभव; निलेश राणेंचा तब्बल 53,000 मताधिक्य
Maharashtra vidhansabha election results देवेंद्र फडणवीसांची हॅटट्रिक, सलग तिसऱ्यांदा शतकेपार झेंडा; भाजप विजयाचा नवा रेकॉर्ड
देवेंद्र फडणवीसांची हॅटट्रिक, सलग तिसऱ्यांदा शतकेपार झेंडा; भाजप विजयाचा नवा रेकॉर्ड
Eknath Shinde on CM: एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपदाबाबत मोठ्ठं विधान, म्हणाले, 'आमचं काहीच ठरलं नव्हतं'
एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपदाबाबत मोठ्ठं विधान, म्हणाले, 'आमचं काहीच ठरलं नव्हतं'
Maharashtra vidhansabha results 2024 : परळीत धनुभाऊंचीच हवा, बीड जिल्ह्यातील सर्वात मोठा विजय ; तुतारीचा करिश्मा चालला नाही
परळीत धनुभाऊंचीच हवा, बीड जिल्ह्यातील सर्वात मोठा विजय ; तुतारीचा करिश्मा चालला नाही
Sharad Pawar: राज्यात पवार पॅटर्न फेल, थोरल्या पवारांनी राज्य पिंजून काढलं पण तुतारी वाजलीच नाही
राज्यात पवार पॅटर्न फेल, थोरल्या पवारांनी राज्य पिंजून काढलं पण तुतारी वाजलीच नाही
Maharashtra Assembly Election Result : मुहायुतीची बुलेट ट्रेन सुस्साट, महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड, नियम काय सांगतो?
मुहायुतीची बुलेट ट्रेन सुस्साट, महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड, नियम काय सांगतो?
Embed widget