MP MLA Pension Details : आमदार ते पंतप्रधान कोणाची पेन्शन किती? Old Pension Yojna
अहमदनगर : उशिरा आल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो, मी इथून संभाजीनगर ला जाणार असल्याचे सांगत शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी शिर्डी येथील जुनी पेन्शन मेळाव्यात भाषणाला सुरुवात केली. राज्यातील जुनी पेन्शन संघटनेच्या पदाधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मेळाव्याचे शिर्डी येथे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला मंत्री दीपक केसरकर यांनी हजेरी लावली. यावेळी बोलताना जुनी पेन्शन योजना (Old Pension Yojana) आणि नवी पेन्शन योजनेबाबत भाष्य केले. तसेच, आतापर्यंत तुमच्या अडचणी दूर करण्याचं काम एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनीच केलं आहे. शालेय शिक्षण सेवकांना आपण लाभ दिला असल्याचे त्यांनी म्हटले. दरम्यान, दीपक केसरकर यांचे भाषण सुरू असताना काही उपस्थितांनी मध्येच उभे राहून गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तसेच, जुनी पेन्शनची मागणी करत कार्यक्रमातून काढता पाय घेतला.
येथील कार्यक्रमात पुढे बोलताना दीपक केसरकर म्हणाले की, कमी अनुदान असणाऱ्या शिक्षकांना देखील मदत करण्यासाठी समिती नेमली आहे. त्याचा अहवाल दोन दिवसात प्राप्त होईल.पगाराच्या रकमेपेक्षा खर्च जास्त असल्याने यातून मार्ग काढू. केंद्र सरकार ने जाहीर केलेली पेन्शन योजना सर्वांना माहीत आहे. मात्र,याबाबत सम्रभ पसरविला जातोय. काही लोक इथे भाषण करून गेले असतील, ते सत्तेत असताना काही देऊ शकले नाहीत. मात्र, एकनाथ शिंदे यांना जबाबदारी समजते. एक सामान्य रिक्षावाला या पदावर बसला आहे, असे म्हणत नाव न घेता शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरेंवर केसरकरांनी हल्लाबोल केला.