Maharashtra Political Crisis SC Hearing : राणा केसचा चुकीचा अर्थ लावला जातोय : नीरज कौल
आम्हीच खरी शिवसेना असल्याचा दावा आज शिंदे गटाचे वकील नीरज किशन कौल यानी केला. उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करायला सांगण्याचे राज्यपालांचे निर्देश हे योग्यच होते असंही ते म्हणाले. त्यावर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी त्यांना काही प्रश्न विचारले. आमदारांवर अपात्रतेची कारवाई प्रलंबित असताना ते बहुमत चाचणीसाठी मतदान कसे करणार असा प्रश्न सरन्यायाधीशांनी शिंदे गटाला विचारला. तसेच पक्षफुटीवरच प्रश्नचिन्ह असताना बहुमत चाचणी घेतली गेली? असाही सवाल त्यांनी विचारला. राज्यातील सत्तासंघर्षावरील सुनावणीवर ठाकरे गटाकडून युक्तीवाद पूर्ण झाला असून आता शिंदे गटाच्या वतीनं युक्तीवाद सुरू आहे. ही सुनावणी याच आठवड्यात पूर्ण करणार असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. आज सरन्यायाधीशांनी शिंदे गटाच्या युक्तीवादावर काही प्रश्न विचारले.





















