एक्स्प्लोर

Kolhapur News: बाॅल आणण्यासाठी शेजारच्या घरावर गेला अन् परतलाच नाही; 11 हजार व्होल्ट क्षमतेच्या उच्चदाब वाहिनीचा संपर्क होताच एकुलत्या एक लेकराचा जागेवर जीव गेला

अफान बाॅल आणण्यासाठी टेरेसवर गेला असता घराच्या अगदी दीड-दोन फूट अंतरावरून जाणाऱ्या 11 हजार व्होल्ट क्षमतेच्या उच्चदाब वाहिनीचा त्याला संपर्क होताच जोराचा विद्युत धक्का बसला.

Kolhapur Crime: कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील उजळाईवाडीमध्ये शेजारच्या घरावर गेलेला चेंडू आणण्यासाठी गेलेल्या 13 वर्षीय शाळकरी मुलाचा उच्चदाब विद्युत वाहिनीच्या संपर्कात येऊन मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी दुपारी घडली. अफान असिफ बागवान (वय 13) असे मृत मुलाचे नाव आहे. काल शाळेला सुटी असल्याने तो सकाळी मित्रांसोबत क्रिकेट खेळण्यासाठी घराबाहेर पडला. खेळताना चेंडू शेजारील हनुमंत खांडेकर यांच्या इमारतीवर गेला. असिफ बाॅल आणण्यासाठी टेरेसवर गेला असता घराच्या अगदी दीड-दोन फूट अंतरावरून जाणाऱ्या 11 हजार व्होल्ट क्षमतेच्या उच्चदाब वाहिनीचा त्याला संपर्क होताच जोराचा विद्युत धक्का बसला. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. या इमारतीवरून विमानतळाला पुरवठा करणारी उच्चदाब वाहिनी जाते. 

घटना नेमकी कशी घडली?

उजळाईवाडीतील बालाजी पार्क येथे अफान आपल्या कुटुंबासोबत राहत होता. इयत्ता सातवीत शिकणाऱ्या अफानला शिक्षकांच्या सुरू असलेल्या संपामुळे शुक्रवारी शाळेला सुट्टी होती. त्याचा मित्रासह खेळत असताना क्रिकेटचा चेंडू शेजारील घराच्या छतावर गेला. चेंडू आणण्यासाठी तो वर चढला असता घराच्या अगदी दीड ते दोन फूट अंतरावरून जाणाऱ्या उच्चदाबाच्या विद्युत तारेला त्याचा संपर्क आला. क्षणात प्रचंड विजेचा धक्का बसल्याने तो जागीच कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला.

कुटुंबावर दुःखाचा डोंगर

घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली.  वडील औद्योगिक वसाहतीत कामगार आहेत, तर आई गृहिणी. दोन बहिणीनंतर तो कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. अत्यंत मनमिळावू, हुशार आणि अभ्यासू स्वभावामुळे मोहम्मद सर्वांच्या आवडीचा होता. त्याच्या अचानक झालेल्या मृत्यूने आई-वडील, कुटुंबीय आणि मित्रांचे अश्रू अनावर झाले. या अपघाताची नोंद गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. 

महाप्रसादातून शंभर गावकऱ्यांना विषबाधा

दुसरीकडे, दत्त जयंतीच्या महाप्रसादातून सुमारे शंभर गावकऱ्यांना विषबाधा झाल्याची घटना गडहिंग्लज तालुक्यातील सांबरे गावात ही घटना घडली. विषबाधित रुग्णांना गडहिंग्लज येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. सांबरे गावात दत्त जयंतीनिमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. महाप्रसाद घेतला असता सुमारे शंभर गावकऱ्यांना विषबाधा झाल्याने उलट्याचा त्रास सुरु झाला. विषबाधा झालेल्या गावकऱ्यांवर नेसरी आणि परिसरातील रुग्णालयांमध्ये उपचार करण्यात आले. मात्र 30 ते 40 रुग्णांना अधिक उपचारासाठी गडहिंग्लज येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. 

इतर महत्वाच्या बातम्या

 

एबीपी माझामध्ये कोल्हापूर ब्युरो म्हणून गेल्या साडे तीन वर्षांपासून कार्यरत. तसेच टीव्ही 9 मराठी कोल्हापूर ब्युरो म्हणूनही कामाचा अनुभव. 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Vivekanand Patil On Raj Thackeray: पुण्यातील MPSC चं आंदोलन स्थगित, राज ठाकरेंनी केला विवेकानंद पाटीलला फोन, म्हणाले...
पुण्यातील MPSC चं आंदोलन स्थगित, राज ठाकरेंनी केला विवेकानंद पाटीलला फोन, म्हणाले...
Kolhapur News: तुझं लग्न ठरलंय तर मग दोघं मिळून आयुष्य संपवू असं खरंच श्रीपाद आणि तरन्नुमचं ठरलं होतं? पोलिसांनीच केला घटनाक्रमाचा उलघडा
कोल्हापूर : तुझं लग्न ठरलंय तर मग दोघं मिळून आयुष्य संपवू असं खरंच श्रीपाद आणि तरन्नुमचं ठरलं होतं? पोलिसांनीच केला घटनाक्रमाचा उलघडा
Raju Shetti: ऊसदर जाहीर न करता ऊस तोडायला ती तुमच्या बापाची पेंड आहे का? राजू शेट्टींचा दिलीप वळसे पाटलांवर हल्लाबोल; म्हणाले, तेव्हा तुम्ही गोट्या खेळत होता का?
ऊसदर जाहीर न करता ऊस तोडायला ती तुमच्या बापाची पेंड आहे का? राजू शेट्टींचा दिलीप वळसे पाटलांवर हल्लाबोल; म्हणाले, तेव्हा तुम्ही गोट्या खेळत होता का?
Gokul Election: जागावाटपात एकमेकांचा घामटा काढल्यानंतर आता महायुतीला क्रॉस व्होटिंगचा धसका; इतिहासात पहिल्यांदाच ठरावधारकांना सहलीवर पाठवणार, शपथा सुद्धा घेतल्या जाणार!
जागावाटपात एकमेकांचा घामटा काढल्यानंतर आता महायुतीला क्रॉस व्होटिंगचा धसका; इतिहासात पहिल्यांदाच ठरावधारकांना सहलीवर पाठवणार, शपथा सुद्धा घेतल्या जाणार!

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल
BJP Vs India Aghadi Special Report : इंडिया आघाडीच्या मोर्चावरून राजकीय वाद, दोन गुन्हे दाखल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhatrapati Sambhjinagar :बाळाने जन्मताच जीव सोडला, मात्र नवरात्रीच्या कारणास्तव आई-वडिलांचा स्पर्शास नकार, स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांकडून अंत्यसंस्कार
बाळाने जन्मताच जीव सोडला, मात्र नवरात्रीच्या कारणास्तव आई-वडिलांचा स्पर्शास नकार, स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांकडून अंत्यसंस्कार
Mumbai Traffic Update: मुंबईत मंत्री ट्रॅफिकने वैतागले, आदिती तटकरे, जयकुमार गोरे गाडीतून उतरले; कॅबिनेटसाठी चालत पोहोचले
मुंबईत मंत्री ट्रॅफिकने वैतागले, आदिती तटकरे, जयकुमार गोरे गाडीतून उतरले; कॅबिनेटसाठी चालत पोहोचले
Sachin Sanap Pune Election : पुणे पदवीधरवरून शिवसेनेत नाराजी; दुसरीकडे शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवार सचिन सानपांची मोठी राजकीय लॉबी; सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटीवर प्रतिक्रिया, म्हणाले 'मला सांगितलं गेलंय की...'
पुणे पदवीधरवरून शिवसेनेत नाराजी; दुसरीकडे शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवार सचिन सानपांची मोठी राजकीय लॉबी; सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटीवर प्रतिक्रिया, म्हणाले 'मला सांगितलं गेलंय की...'
Chandrashekhar Bawankule : अनधिकृत बांधकामांच्या दस्त नोंदणीवर बंदी; बावनकुळेंचा मोठा निर्णय, आता अर्जासोबतच्या कागदपत्रांची 7 मुद्द्यांवर होणार क्रॉस चेकिंग
अनधिकृत बांधकामांच्या दस्त नोंदणीवर बंदी; बावनकुळेंचा मोठा निर्णय, आता अर्जासोबतच्या कागदपत्रांची 7 मुद्द्यांवर होणार क्रॉस चेकिंग
Maval News: मावळच्या इंद्रायणीवर दुष्काळाचं सावट, भात किलोमागे 20 रुपयांनी महागणार! एल निनोच्या संकटाने शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांच्याही चिंता वाढली
मावळच्या इंद्रायणीवर दुष्काळाचं सावट, भात किलोमागे 20 रुपयांनी महागणार! एल निनोच्या संकटाने शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांच्याही चिंता वाढली
Imperial Heritage Nalasopara Fire: घरात आग लागली, चारजण इमारतीच्या 14 मजल्यावर 45 मिनिटं लटकले, नालासोपाऱ्यातील थरकाप उडवणारा VIDEO
घरात आग लागली, चारजण इमारतीच्या 14 मजल्यावर 45 मिनिटं लटकले, नालासोपाऱ्यातील थरकाप उडवणारा VIDEO
Maharashtra Vidhan Parishad Election: पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडावी लागल्याने शिवसेनेत नाराजी; पदाधिकाऱ्यांनी घेतली एकनाथ शिंदेंनी भेट, बैठकीत नेमकं काय घडलं?
पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडावी लागल्याने शिवसेनेत नाराजी; पदाधिकाऱ्यांनी घेतली एकनाथ शिंदेंनी भेट, बैठकीत नेमकं काय घडलं?
Emraan Hashmi Gunmaaster G9 Stunt SUV Flips Viral Video: इमरान हाश्मीची SUV हवेतच पलटली, गरगर गिरक्या घेऊन व्हॅनवर आदळली; VIRAL VIDEO नं काळजाचा ठोका चुकला, लाडका अभिनेता सुखरुप तर आहे ना? चाहत्यांना चिंता
इमरान हाश्मीची SUV हवेतच पलटली, गरगर गिरक्या घेऊन व्हॅनवर आदळली; VIRAL VIDEO नं काळजाचा ठोका चुकला, लाडका अभिनेता सुखरुप तर आहे ना? चाहत्यांना चिंता
Embed widget