Sunil Kedar : सुनील केदारांच्या तुरुंगवासानंतर सावनेर विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीची शक्यता
Sunil Kedar : सुनील केदारांच्या तुरुंगवासानंतर सावनेर विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीची शक्यता
सुनील केदार यांना बँक घोटाळा प्रकरणी तुरुंगवास झाल्यानंतर पोटनिवडणुकीची शक्यता ------------ सावनेर विधानसभा क्षेत्रात पोटनिवडणूक घेतली जाईल अशी शक्यता बळावली आहे...
नागपूर : सुनील केदार (Sunil Kedar) यांना बँक घोटाळा (Nagpur Bank Scam) प्रकरणी तुरुंगवास झाल्यानंतर रिक्त झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीची चर्चा आता सुरु झाली आहे. सावनेर विधानसभा क्षेत्रात पोटनिवडणूक घेतली जाईल अशी शक्यता बळावली आहे. राजकीय वर्तुळात देखील तशी चर्चा सुरू झाली आहे. प्रशासनीक सूत्रांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे पुढील आठवड्यात यासंदर्भात काही हालचाली होऊ शकतात...
नागपूर जिल्हा बँक रोखे घोटाळ्याप्रकरणी 22 जानेवारीला पाच वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. त्यानंतर सुनील केदार यांचे नियमानुसार त्यांची विधानसभेचे सदस्यत्व देखील रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे सावनेर विधानसभा मतदार संघाची जागा रिक्त झाली आहे. त्यानंतर लगेचच विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचे वारे वाहायला लागले आहेत. उमेदवारीवरून दावे- प्रतिदावे सुरु झाले आहेत.