Purushottam Puttewar Hit & Run: सुनेनेचं दिली होती पुरुषोत्तम पुट्टेवारांच्या हत्येची सुपारी
नागपुरातील 82 वर्षीय पुरुषोत्तम पुट्टेवार यांच्या रस्त्यावरील अपघातात झालेल्या मृत्यू प्रकरणात समोर आले धक्कादायक वास्तव..
नागपूरच्या अजनी पोलीस स्टेशन अंतर्गत बालाजी नगर परिसरात 82 वर्षीय पुरुषोत्तम पुट्टेवार यांना 22 मे रोजी एका भरधाव कार ने धडक दिली होती... त्यामध्ये पुरुषोत्तम पुट्टेवार यांचा मृत्यू झाला होता...
सुरुवातीला सर्वांना ते रस्त्यावर घडणारे हीट अँड रन चे प्रकार वाटले होते.. मात्र नंतर पोलिसांना या प्रकरणात काही गोपनीय माहिती मिळाली.. त्या आधारावर पोलिसांनी केलेल्या तपासात पुरुषोत्तम पुट्टेवार यांना लागलेली कारची धडक सुनियोजित पद्धतीने घडविलेला अपघात होता आणि पुरुषोत्तम पुट्टेवार यांची हत्या करण्याच्या उद्दिष्टाने तो अपघात घडवण्यात आलं होतं अशी माहिती मिळाली...
सखोल तपासानंतर नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेने याप्रकरणी नीरज निमजे व सचिन धार्मिक या दोघांना अटक केली आहे... पुरुषोत्तम पुट्टेवार यांना धडक देणाऱ्या कार मध्ये हे दोघे स्वार होते.
महत्त्वाच्या बातम्या





















