(Source: Poll of Polls)
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
सिक्कीम (Sikkim) येथे ढगफुटीसदृश्य पाऊस (Heavy rains) झालाय. या पावसामुळं 1500 ते 2000 पर्यटक अडकलेत. यामध्ये महाराष्ट्रातील (Maharashtra) देखील अनेक पर्यटक अडकले आहेत.
Heavy rains in Sikkim : सिक्कीम (Sikkim) येथे ढगफुटीसदृश्य पाऊस (Heavy rains) झाला आहे. या पावसामुळं 1500 ते 2000 पर्यटक अडकले आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील (Maharashtra) देखील अनेक पर्यटक अडकले आहेत. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी अडकलेल्या पर्यटकांपैकी काही जणांशी फोनवरुन संवाद साधला. या सर्व अडकलेल्या पर्यटकांची विचारपूस करुन त्यांना मुख्यमंत्र्यांनी धीर दिला आहे.
सिक्कीममधील लाचोंग इथं अडकले पर्यटक
दरम्यान, सिक्कीममध्ये अडकलेल्या या पर्यटकांची लवकरात लवकर सुटका व्हावी, यासाठी मुख्यमंत्री कार्यालयातील संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. ताबडतोब अडकलेल्या पर्यटकांपर्यंत मदत पुरवण्याचे मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले आहेत. सध्या 28 जणांचा एक ग्रुप सिक्कीम येथील लाचोंग या ठिकाणी अडकला असून, त्यांची लवकरात लवकर सुटका व्हावी यासाठी स्वतः मुख्यमंत्री प्रयत्न करत आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या फोननंतर प्रशासन लागले कामाला
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या फोननंतर प्रशासन कामाला लागले आहे. अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना तातडीने मदत पुरवण्यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. सिक्कीमध्ये अडकलेल्या 28 जणांना सीएमओ तसेच सिक्कीम सरकारकडून देखील मदतीसाठी फोन आले आहेत. त्यांना हवी ती मदत तातडीने पुरवली जाणार आहे. अडकलेल्या पर्यटकांच्या सुटकेसाठी दोन हेलिकॉप्टर तयार आहेत. परंतु, ढग आणि ख़राब हवामानामुळे त्यात अडचणी येत आहेत. मुख्यमंत्री कार्यालयातली टीम रेग्युलर टीमच्या सतत संपर्कात आहे.
मुसळधार पावसामुळं काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत
सध्या देशाच्या विविध भागात जोरदार पाऊस कोसळत आहे. मुसळधार पावसामुळं काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत होत असल्याचं पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. तर काही ठिकाणी पुराच पाणी नागरिकांच्या घरात देखील शिरल्याची स्थिती आहे. अनेक ठिकाणी रस्ते खरचले आहेत. त्यामुळं वाहतुकीवर देखील मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. दरम्यान, या पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात येत आहे.
१
दरम्यान सध्या सिक्कीममध्ये मुसळधार पावसानं हाहाकार घातला आहे. तेथील जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली आहे. अनेकांच्या संसार उघड्यावर आले आहेत. मुख्यमंत्री कार्यालयाने या घटनेनंतर निवेदन जारी केले होते. त्यात सिक्कीममध्ये सरकारने मदत आणि नागरिकांना आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधा देण्यासाठी पावले उचलली आहेत. पिडित कुटुंबियांना आवश्यक असलेली मदत आणि तात्पुरती व्यवस्था तसेच आवश्यक असलेली मदत देण्याचे प्रयत्न सुरु असल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं आहे.
हत्वाच्या बातम्या:
पुणे, सोलापूर, परभणीसह कोकणात तुफान पावसाला सुरुवात; मुंबई, ठाण्यात रिमझिम सरी