Nagpur Hit And Run Case : अर्चना पुट्टेवारचा मोबाईल हस्तगत,अनेक धागेदोरे हाती लागणार : ABP Majha
पुरुषोत्तम पुट्टेवार यांच्या हत्या प्रकरणात अत्यंत महत्त्वाचा पुरावा ठरेल, तो अर्चना पुट्टेवार यांचा मोबाईल फोन हस्तगत करण्यात पोलिसांना यश आलं आहे... या मोबाईल फोनच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचे खुलासे या प्रकरणात होण्याची शक्यता आहे...
अर्चना पुट्टेवार यांची सहकारी आणि या प्रकरणात एक आरोपी असलेली पायल नागेश्वरच्या माहितीवरून पोलिसांनी हे मोबाईल फोन हस्तगत केले आहे...
जेव्हापासून पोलिसांनी या प्रकरणात मास्टरमाइंड म्हणून अर्चना पुट्टेवार ला अटक केली होती.. तेव्हापासूनच अर्चना यांनी त्यांचा मोबाईल फोन गायब केला होता... अनेक प्रयत्न करूनही तो मोबाईल फोन पोलिसांना मिळू शकत नव्हता...
मात्र आता तो मोबाईल फोन पोलिसांना मिळाल्यामुळे या प्रकरणात अत्यंत महत्त्वाचे खुलासे फोनमधील रेकॉर्डच्या आधारे होण्याची शक्यता आहे....























