(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Thackeray vs Fadnavis : धरावी, अदानी आणि मोदी, उद्धव ठाकरे - देवेंद्र फडणवीस यांच्यात जुंपली
नागपूर : अनेक वर्ष बाळासाहेब ठाकरेंनी 370 कलम (Article 370) हटवण्याची मागणी केली होती. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ते स्वप्न पूर्ण केलं, अशी प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी दिली आहे. पण ज्यावेळी मोदी हे स्वप्न पूर्ण करत होते, तेव्हा उद्धव ठाकरे यांची भूमिका राज्य सभेत वेगळी, इतर ठिकाणी वेगळी होती, असं म्हणत फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) निशाणा साधला. आम्ही अखंड भारतावर विश्वास ठेवणारी लोकं आहोत, ते असंभव होतं, ते मोदींनी संभव करुन दाखवलं त्यामुळे आपण येत्या काळाची वाट पाहावी, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. सर्वोच्च न्यायालयाने काश्मीरमधून कलम 370 हटवण्याच्या निर्णयाला वैध ठरवलं. त्यानंतर या निर्णयावर अनेकांनी त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. दरम्यान कोर्टाच्या निर्णयाने कोणलाही आता शंका येणार नाही, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीसांनी दिली.
देशाच्या इतिहासात आज अतिशय महत्वाचा दिवस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत सरकारने 370 रद्द करण्याचा निर्णय घेतला आज त्यावर सर्वोच्च न्यायालयाने एक प्रकारे मोहर उमटवली. आज भारताचा आणि जम्मू काश्मीरच्या लोकांचा विजय झाला. जम्मू काश्मीर एक विकासाचा आगार होण्याऐवजी दहशतवादी आगार झालं होतं पण 370 रद्द केल्यानंतर विकासाचा आगार होणार आहे. आज कोर्टाने मोहोर उमटवली त्यामुळे जम्मू काश्मीरमध्ये विकासाची मोहोर उमटवली असल्याची प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीसांनी दिली.