TOP 90 : सकाळच्या 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज : 31 डिसेंबर 2024: ABP Majha
नववर्षानिमित्त सिद्धिविनायकाच्या दर्शन वेळेत बदल, दर्शनाची वेळ सकाळी ६.०० ते दुपारी ११.५० वाजेपर्यंत आणि रात्री ८.०० ते १०.३० वाजेपर्यंत दर्शन घेता येणार
लोणावळ्यातील लाईन्स आणि टायगर या दोन्ही पॉईंटवर पर्यटकांना बंदी, 31 डिसेंबरच्या निमित्ताने वनविभागाकडून बंदी घालण्याचा निर्णय.
नववर्ष स्वागतासाठी भंडारदरा धरण परिसर सज्ज,पर्यटकांसाठी अनेक ठिकाणी टेन्ट उभारले, आदिवासी नृत्याच्या मेजवानीसह धरणाच्या बॅक वॉटरमध्ये बोटिंगची व्यवस्था.
नवीन वर्षाच्या स्वागतासाठी चौपाट्यांवर होणारी गर्दी लक्षात घेता बेस्टकडून ज्यादा गाड्या, गेट वे ऑफ इंडिया, जुहू चौपाटी, गोराई बीच, मार्वे बीच आणि मुंबईतील इतर समुद्र किनाऱयांवर जाण्यासाठी रात्री विशेष 25 बस चालवल्या जाणार.
नववर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येंनी लोक बाहेर पडत असल्याने आज रात्री लोकलच्या विशेष फेऱ्या, लोकलच्या तिन्ही मार्गावर चालवल्या जाणाऱ्या विशेष फेऱ्या.
मुंबई प्रवासी आरक्षण प्रणाली आज रात्री ११.४५ ते १.१५ या कालावधीत बंद करण्यात राहणार. या कालावधीत तिकिट काढता येणार नाही. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होईल.
थर्टी फर्स्टसाठी मुंबईत १५ हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात, ड्रंक अॅण्ड ड्राइव्ह'च्या विरोधात पोलिस विशेष मोहीम राबवणार, बॉम्बशोधक आणि नाशक पथके, श्वान पथके, दंगल नियंत्रक पथकांवरही सुरक्षेची जबाबदारी
पुण्यात राज्य सरकारच्या परवानगीनं पब, बार आणि मद्यविक्री उद्या पहाटेपर्यंत सुरू राहणार, या निर्णयाविरोधात राष्ट्रवादी युवक काँगेस शरद पवार पक्षाच्यावतीनं निदर्शनं करण्यात येणार.
पुण्यात नववर्षाच्या पूर्वसंध्येला राज्य उत्पादन शुल्काची कारवाई, विविध ठिकाणी नाकाबंदी करत १ कोटी २० लाखांची बनावट दारू जप्त, ९ आरोपींना अटक.
यंदाच्या निवडणूक वर्षात ७२ कोटी ७० लाख लिटर मद्यविक्री , लोकसभा निवडणुकीत १८ लाख २२ हजार १४२ लिटर मद्य जप्त, तर विधानसभा निवडणुकीदरम्यान ३१ लाख ५४ हजार ७१० लिटर मद्य जप्त.
मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या पर्यटकांची खासगी बस चालकांकडून लूट, एका प्रवाशाला मोजावे लागतायत ३ ते ५ हजार रूपये, हे दर दिल्लीला जाणाऱ्या खासगी बस पेक्षाही अधिक.