एक्स्प्लोर
Jejuri Somvati Aamavasya 2024 Photos : जेजुरी गडावर सोमवती अमावस्येचा उत्साह; खंडेराया नगरीत भंडाऱ्याची उधळण, लाखो भाविकांची गर्दी
Jejuri Somvati Aamavasya 2024 : सोमवती अमावस्येनिमित्त राज्यभरातून लाखो भाविकांनी जेजुरी दर्शनासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे.

Jejuri Somvati Aamavasya 2024 Photos
1/19

आज जेजुरी गडावर सोमवती अमावस्या उत्सव साजरा होत आहे.
2/19

ज्या सोमवारी अमावस्या येते, त्या दिवसाला सोमवती आमावस्या असे म्हणतात. त्या दिवशी खंडोबाची यात्रा भरते, या यात्रेच्या निमित्ताने लाखो भाविक जेजुरीमध्ये येत असतात.
3/19

अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरी गडावर आज सोमवती अमावस्या यात्रा मोठ्या उत्साहात (Somavati Amavasya Jejuri) साजरी होत आहे.
4/19

काल रात्रीपासूनच जेजुरी रोषणाईत आणि भंडाऱ्यात न्हाऊन निघाली आहे.
5/19

नववर्षाची सुरुवात होत असल्याने देखील खंडेरायाच्या दर्शनाला भाविकांनी गर्दी केली आहे.
6/19

राज्यभरातून लाखो भाविकांनी जेजुरी गडावर दर्शनासाठी गर्दी केली आहे.
7/19

जेजुरी नगरीत भंडाऱ्याची मुक्त उधळण होत आहे.
8/19

सोमवती अमावस्या उत्सवानिमित्त जेजुरी गडावरून देवाची पालखी कऱ्हा स्नानासाठी दुपारी एक वाजता निघेल.
9/19

साडेपाच वाजता पालखी कऱ्हा नदी पात्रात पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी विधीवत पूजा करून देवांना कऱ्हा नदीच्या पवित्र पाण्याने स्नान घालण्यात येईल.
10/19

यावेळी भंडाऱ्याची मुक्त उधळण आणि येळकोट येळकोटच्या जयघोषाने परिसर दुमदुमुन जाईल.
11/19

परंतु त्या आधीच जेजुरी गडावर भाविकांची मोठी गर्दी झालेली आहे.
12/19

यळकोट यळकोटचा गजर करत भंडाऱ्याची उधळण करत लाखो भाविक खंडेरायाच्या जेजुरीत (Jejuri Khandoba Yatra) दाखल झाले आहेत.
13/19

जेजुरी गड फुलांनी सजला आहे आणि भंडाऱ्यात न्हाऊन निघाला आहे.
14/19

सोमवारी अमावस्या येत असल्यामुळे ही अमावस्या ‘सोमवती अमावस्या’ म्हणून ओळखली जाते.
15/19

खंडेरायाची जेजुरी आज पिवळीधमक झाली आहे.
16/19

खंडेरायाच्या वर्षभर विविध यात्रा भरत असतात, त्यातीलच एक महत्त्वाची म्हणजे ही सोमवती अमावस्या.
17/19

राज्यभरातील भाविक आज खंडेराया चरणी नतमस्तक झाले.
18/19

अनेक ठिकाणी तळी भरणी केली जात आहे.
19/19

भाविक भक्तिमय वातावरणात नवीन वर्षाचं स्वागत करत आहेत.
Published at : 30 Dec 2024 12:40 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
व्यापार-उद्योग
भारत
आरोग्य
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
