Satish Wagh Case: सतीश वाघ यांना मारण्यासाठी वापरलेलं ते धारदार शस्त्र कुठे? कोर्टात युक्तीवादावेळी नेमकं काय घडलं?
Satish Wagh Murder Case: ज्या धारदार शस्त्राने त्यांच्यावर वार केले त्यानंतर ते भीमा नदीत फेकून दिल्याची माहिती आरोपींनी पोलिसांना तपासादरम्यान दिली आहे. त्याचा तपास करण्यात आला मात्र, ते धारदार शस्त्र अद्याप सापडलेलं नसल्याची माहिती आहे.
पुणे: पुण्यातील विधानपरिषदचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश सादबा वाघ (Satish Wagh Murder Case) (वय 55) यांचं अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आली. सतीश वाघ यांच्यावर अपहरण केलं त्यानंतर चालत्या कारमध्ये चाकूने त्यांच्या गळ्यावर तब्बल 72 वार करून त्यांची हत्या करण्यात आली होती. सतीश वाघ यांची पत्नी मोहिनी सतीश वाघ हिने संपत्तीच्या तसेच अनैतिक संबंधांच्या संशयातून हत्या घडवून आणल्याचं पोलिस तपासात समोर आलं आहे. तर त्यांच्या अपहरणानंतर कारमध्येच त्यांच्यावर वार केले त्यांचा जीव गेल्यानंतर त्यांचा मृतदेह शिंदवणे घाटामध्ये फेकून देण्यात आला होता. तर ज्या धारदार शस्त्राने त्यांच्यावर वार केले त्यानंतर ते भीमा नदीत फेकून दिल्याची माहिती आरोपींनी पोलिसांना तपासादरम्यान दिली आहे. त्याचा तपास करण्यात आला मात्र, ते धारदार शस्त्र अद्याप सापडलेलं नसल्याची माहिती आहे. (Satish Wagh Murder Case)
सतीश वाघ यांच्या हत्या प्रकरणात पत्नी मोहिनी वाघसह सहा आरोपींची येरवडा कारागृहात रवानगी केली आहे. मोहिनी वाघ व अतिश जाधव यांच्या पोलिस कोठडीचे हक्क अबाधित ठेवून त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. पवन श्यामसुंदर शर्मा (वय 30, रा. आव्हाळवाडी), नवनाथ अर्जुन गुरसाळे (वय 31, रा. वाघोली, मूळ रा. बीड), विकास ऊर्फ विक्की सीताराम शिंदे (वय 28, रा. वाघोली, मूळ रा. अहिल्यानगर), अक्षय ऊर्फ सोन्या हरिश जावळकर (वय 29, रा. फुरसुंगी फाटा), मोहिनी सतीश वाघ (वय 48, रा. फुरसुंगी) व अतिश संतोष जाधव (वय 20, रा. लोणीकंद, मूळ रा. धाराशी) अशी न्यायालयीन कोठडी झालेल्या आरोपींची नावे आहे. त्यांच्या पोलिस कोठडीची मुदत संपत आल्याने त्यांना काल (सोमवारी दि. 30) न्यायालयात हजर करण्यात आले होते. (Satish Wagh Murder Case)
न्यायालयात सरकारी पक्षाकडून सरकारी वकील ज्योती वाघमारे यांनी युक्तिवाद केला. यावेळी वाघमारे यांनी न्यायालयाला सांगितले, जाधव व गुरसाळे यांनी गुन्ह्यात वापरलेले हत्यार पेरणे फाटा येथील भीमा नदीपात्रात टाकले असल्याचे सांगितले आहे. त्यासमक्ष गोताखोर टीमच्या साहाय्याने नदीपात्रामध्ये शोध घेण्यात आला आहे. मात्र, हत्यार अद्याप सापडले नाही. तपास करायचा असल्याचा युक्तिवाद वाघमारे यांनी केला आहे. न्यायालयाने सरकार पक्षासह बचाव पक्षाचा युक्तिवाद ऐकून घेत सर्व आरोपींची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आलेली आहे. (Satish Wagh Murder Case)
वाघ यांना तब्बल 72 वेळा चाकूने भोसकलं
नऊ डिसेंबर रोजी सकाळी सव्वासहाच्या सुमारास सतीश वाघ मॉर्निंग वॉकला गेले असताना त्याचवेळी फुरसुंगी फाटा परिसरातून नंबरप्लेट नसलेल्या चारचाकी गाडीतून चौघांनी त्यांचे अपहरण केले होते. याप्रकरणी सतीश यांचा मुलगा ओंकार वाघ (वय 27) याने हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. वाघ यांच्या अपहरणाची माहिती मिळताच गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांच्या पथकांनी आरोपींचा शोध सुरू केला होता. मात्र, सतीश वाघ यांचे अपहरण केल्यानंतर दहा ते पंधरा मिनिटांतच आरोपींनी सतीश वाघ यांचा गाडीतच खून केला असल्याची माहिती समोर आली. वाघ यांना तब्बल 72 वेळा चाकूने भोसकण्यात आलं. सतीश वाघ यांच्या गळ्यावर सर्वाधिक वार करण्यात आले होते, पाठीवर देखील वार करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले होते. वाघ यांचा जीव गेल्यानंतर आरोपींनी मृतदेह शिंदवणे घाटातील निर्जनस्थळी फेकून दिला. सायंकाळी त्यांचा मृतदेह स्थानिक नागरिकांना आढळला. त्यांनी याबाबत उरुळी कांचन पोलिसांना माहिती दिली होती.