ABP Majha Headlines : 09 AM : 31 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
मस्साजोग सरपंच हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ सर्व ग्रामपंचायतींचं ३ दिवस कामबंद आंदोलन, नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशीही राहणार कामकाज बंद
सरपंच हत्या प्रकरणात सीआयडी अॅक्शन मोडवर..फरार चार आरोपींची खाती गोठवण्यासंदर्भात १३ बँकांना पत्र तर वाल्मिक कराडशी संबंधित महिलेची आजही चौकशी
प्राजक्ता माळीबाबत केलेल्या वक्तव्याबाबत भाजप आमदार सुरेश धसांकडून दिलगिरी व्यक्त...प्राजक्ताताईंचा अपमान करायचा नव्हता, धस यांची स्पष्टोक्ती...
खासदार प्रियांका गांधींकडून केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांचं कौतुक, वायनाड भूस्खलन नैसर्गिक आपत्ती घोषित करण्याचा निर्णय योग्य असल्याचं सांगत केलं स्वागत
दोन हजार रुपयांच्या नोटा रिझर्व बँक ऑफ इंडियातून बदलणाऱ्या रॅकेटचा नागपुरात भांडाफोड, चार आरोपींना अटक, २ लाख ६७ हजार रुपये जप्त
छत्रपती संभाजीनगरमधील क्रीडा संकुल घोटाळ्यात कर्मचारी कंत्राटदाराचाही सहभाग, प्रमुख आरोपीकडून ८० लाख रुपये घेणारा व्यवस्थापक अटकेत, चार दिवसांची पोलीस कोठडी
बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी प्रकरणी अटकेतील आरोपी नितीन सप्रेचा मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप, पोलिसांनी जबरदस्तीने जबाब नोंदवल्याचा कोर्टात दावा
नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबई सज्ज, रेस्टॉरंट, पब पहाटे पाचपर्यंत खुले, लोकलच्या तीनही मार्गावर विशेष फेऱ्या, बेस्टच्या अतिरिक्त बस, तर शहरभर पोलिसांचा तगडा बंदोबस्त
उत्पादन घटल्यामुळे आगामी वर्षात चहा महागण्याची शक्यता, भारतीय चहा संघाच्या अध्यक्षांचा चहा महागण्याचे संकेत