एक्स्प्लोर
Anand Dighe Navratri Tembhi Naka : ठाण्यात आनंद दिघेंच्या दुर्गेश्वरी देवीचं आगमन, वादाची शक्यता?
ठाण्यातील सर्वात मोठा उत्सव म्हणजे धर्मवीर आनंद दिघेंच्या टेम्भीनाक्याच्या दुर्गेश्वरी देवीचा आगमन सोहळा. आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या जय अंबे माँ ट्रस्टच्या दुर्गेश्वरी देवीचं आजपासून आगमन होणार आहे. तळवा इथल्या मूर्ती कारखान्यामधून ही मूर्ती टेम्भीनाका येथे आणली जाईल. या मिरवणुकीमध्ये सुरुवातीपासूनच शेवटपर्यंत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती असते. यंदा मात्र देवीच्या मिरवणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेचे राजन विचारे आणि केदार दिघे हे देखील येणार असल्यामुळे राजकीय वाद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून आनंद दिघेंवरुन राजकीय वर्तुळामध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. त्यात आता देवीच्या आगमन सोहळ्यामध्ये जर दोन्ही गटाचे नेते समोरासमोर आले तर वाद होण्याची शक्यता देखील आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र
Hapus Mango हापूस आंब्यावरही गुजरातचा दावा; गांंधीनगर,नवसारी विद्यापीठांचा भौगोलिक मानांकनासाठी अर्ज
Special Report TET Exam : गुणवत्तेची परीक्षा का नकारताय सर? चांदा ते बांदा सर आणि मॅडम रस्त्यावर
Special Report Indigo Airline : इंडिगो जमिनीवर, प्रवासी गॅसवर, एअरपोर्टवर प्रवाशांची अलोट गर्दी
Special Report Ajit Pawar Dance : जय की बारात, सेलिब्रेशन जोरात, बहारीनमध्ये विवाहसोहळा
Thackeray Sena Vs BJP Rada : ठाकरेंची शिवसेना, भाजपमध्ये कामगार युनियनवरुन राडा
आणखी पाहा
Advertisement
Advertisement





















