एक्स्प्लोर

पुणे, मुंबईपेक्षाही कमी लोकसंख्या असलेल्या बहरिनमध्ये असं नेमकं आहे तरी काय? शियाबहुल असूनही इराणकडे न झुकता शेजारच्या सुन्नीबहुल सौदीच्या जीवावर उड्या!

Bahrain Jay Pawar Wedding: अजितदादा यांनी लेकाच्या लग्नाचा निर्णय थेट बहरिनमध्ये घेतल्याने सर्वांच्याच भूवया उंचावल्या. बहरिनची निवड का केली? असाच प्रश्न प्रत्येकाला पडला. 

Bahrain Jay Pawar Wedding: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार आणि ऋतुजा पाटील यांचा ग्रँड विवाह मुस्लीम देश असलेल्या बहरिनमध्ये निमंत्रित पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पाडला. मुलाच्या लग्नात राजकीय ताणतणाव बाजूला करून अजितदादा सुद्धा मनसोक्त नाचताना दिसले. अजितदादा यांनी लेकाच्या लग्नाचा निर्णय थेट बहरिनमध्ये घेतल्याने सर्वांच्याच भूवया उंचावल्या. बहरिनची निवड का केली? असाच प्रश्न प्रत्येकाला पडला. 

बहरिन देश आहे तरी कसा?

पुणे, मुंबईपेक्षा कमी लोकसंख्या असलेला बहरिन देश आहे तरी कसा? शिया मुस्लीमबहुल असूनही सौदीच्या वळचणीला कसा गेला? इराणपासून दूर कसा गेला? याबाबत या लेखात पाहणार आहोत. बहरिन हा फार मोठा देश नाही, पण भौगोलिक स्थान, सामाजिक व धार्मिक रचना, आणि अर्थव्यवस्था या सर्वांमुळे Persian Gulf मधील महत्त्वपूर्ण देश आहे. त्यामुळे सामरिकदृष्ट्या संवेदनशील राष्ट्र आहे. बहरिनची एकूण लोकसंख्या निश्चित नसली तरी, अंदाजानुसार ते जवळपास 15 ते 17 लाख असावी. या लोकांमध्ये स्थानिक नागरिक तसेच परदेशी कामगार अशा दोन्हींचा समावेश आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Supriya Sule (@supriyasule)

बहरिनमधील महत्त्वाची शहरे कोणती?

बहरिनची  राजधानी Manama हे प्रशासन, व्यापार, वित्तीय सेवा व पर्यटनाचे केंद्र आहे. या ठिकाणी मिनी मुंबईप्रमाणे वर्दळ असते. जवळील Muharraq हे ऐतिहासिक व नागरी दृष्ट्या महत्त्वाचे आहे; तर Hamad Town, Riffa, A’ali, Sitra, Isa Town शहरे रहिवासी, औद्योगिक क्षेत्रासाठी महत्त्वाची आहेत. 

बहरिनची अर्थव्यवस्था कशावर अवलंबून?

पूर्वी, बहरिनची अर्थव्यवस्था मुख्यतः तेल व नैसर्गिक वायूवर अवलंबून होती. तेल, गॅस रिफायनिंग आणि निर्यात या माध्यमातून देशाने आर्थिक बळ मिळवले; मात्र जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाची घसरण झाल्याने हे अवलंबित्व धोकादायक ठरले असते. त्यामुळे, गेल्या काही दशकांत बहरिनने आपली आर्थिक रचना बदलण्याचा प्रयत्न केला आहे: वित्तीय सेवा, बँकिंग, फिनटेक, लघु व मध्यम उद्योग, अल्युमिनियम स्मेल्टिंग, उत्पादन, सेवा-उद्योग यांना वाढवले आहे.

पर्यटनाला चालना दिली 

यासोबतच, पर्यटन हा आर्थिक स्त्रोत म्हणून उदयास आला आहे. बहरिनचा समृद्ध ऐतिहासिक वारसा, सांस्कृतिक वारसा, आधुनिक शहरांची रचना, जलपर्यटन, बीच पर्यटकांना आकर्षित करतात. पर्यटकांसाठी सुविधा वाढवण्यावर, हॉटेल–रिसॉर्ट उभारण्यावर, पर्यटन संवर्धनावर सरकारने लक्ष दिले आहे. या बदलांमुळे देशाला निधी मिळू लागला आहे.

सामाजिक–धार्मिक रचना गुंतागुंतीची 

दुसरीकडे, बहरिनची सामाजिक–धार्मिक रचना गुंतागुंतीची आहे. शिया तुलनेत अधिक आहेत. सरकारने अधिकृतरित्या शिया व सुन्नीची तपशीलवार आकडेवारी सादर केलेली नाही. तरीही विविध अहवाल व अनुमानांनुसार शिया मुस्लिम मोठ्या संख्येने आहेत. दुसरीकडे, सुन्नी मुस्लिम अल्पसंख्येत असले तरी, अनेक प्रशासनिक पदे, सुरक्षा संस्था, राजघराणी या पक्षांमध्ये सुन्नींचा प्रभाव व वर्चस्व आहे. या भिन्नतेमुळे सामाजिक व राजकीय संवेदनशीलता कायम आहे. तरीही, शासनाचे धोरण हे इस्लामी राष्ट्र म्हणून सर्व मुसलमानांना संलग्न ठेवण्याचे आहे.  राजकीयदृष्ट्या, बहरिन हे एक राजेशाही राज्य आहे. राजघराणे सत्ता व प्रशासन हाताळतात. सध्याच्या राजेंच्या नेतृत्वाखाली देश चालतो. सरकारने कधीही शिया व सुन्नी यांच्यात भेद करून अधिकृत प्रमाणात मान्यता दिलेली नाही.  

सौदीच्या जीवावर बहरिनच्या उड्या 

भौगोलिकदृष्ट्या, बहरिन खाडीतील एक द्वीप राष्ट्र आहे. त्यांचा मुख्य शेजारी देश सौदी अरेबिया आहे. वांद्रे वरळी सीलिंक प्रमाणे किंग फहाद सिलिंकच्या माध्यमातून सौदी बहरिनशी जोडला गेला आहे. त्यामुळे व्यापार, वाहतूक सोपी झाली आहे. यामुळे सौदी व खाडीतील इतर देशांशी बहरिनचे संबंध नेहमीच घनिष्ठ राहिले आहेत. आर्थिक, व्यावसायिक व सामाजिक दृष्टीने सौदीशी सहकार्य हे बहरिनसाठी फायदेशीर ठरले आहे. कारण गुंतवणूक, पायाभूत सुविधा यासाठी दक्षिण– पश्चिमेकडील सहयोग गरजेचा आहे. परंतु, देशांतर्गत शिया-सुन्नी मतभेद, स्थानिक नागरिक व परदेशी कामगार यांच्यातील विसंगती, स्थिर कामगार व गुंतवणूक यांची आवश्यकता, तसेच सामाजिक समन्वय व सांप्रदायिक शांतता कायम ठेवण्याची गरज ही बहरिनच्या भविष्यातील मुख्य आव्हाने आहेत.

इतर महत्वाच्या बातम्या

जून 2022 पासून एबीपी माझा डिजिटल टीममध्ये असून गेल्या चार वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये कार्यरत. यापूर्वी दैनिक पुढारी, सकाळ, ईटीव्ही मराठी अशा संस्थामध्ये कामाचा अनुभव. समाजकारण, राजकारण तसेच मध्य पूर्वेतील विविध विषयांवर गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने लिखाण.  
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ITC : केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Pune Mahapalika : एबी फॉर्म गिळल्याचा आरोप असलेले उद्धव कांबळे माझावर, म्हणाले मीच आहे उमेदवार!
Sanjay Raut PC : मराठी माणसाच्या तोंडावर पिचकाऱ्या मारण्याचा काम भाजपने केलं, संजय राऊतांचा घणाघात
Lay Bhari Award 2025 : लय भारी पुरस्कार 2025
Rahul Narvekar On Election : पराभव दिसू लागल्यानं राऊतांचे बिनबुडाचे आरोप, नार्वेकरांची टीका
Special Report Vanchit Congress:20जागांवर काँग्रेस वंचित,मुंबईत वंचितच्या निर्णयाने काँग्रेसची पळापळ

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ITC : केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
मोठी बातमी : तिकीट नाकारल्यानंतर नरेश म्हस्केंचा मुलगा रोखठोक बोलला, म्हणाला, हट्टी मुलाचं ऐकलं जातं, पण....
तिकीट नाकारल्यानंतर नरेश म्हस्केंचा मुलगा रोखठोक बोलला, म्हणाला, हट्टी मुलाचं ऐकलं जातं, पण....
पुण्यातील पूजा मोरे ओक्साबोक्शी रडल्या, उमेदवारी मागे घेताना पतीलाही अश्रू अनावर; भाजपात हायव्होल्टेज ड्रामा
पुण्यातील पूजा मोरे ओक्साबोक्शी रडल्या, उमेदवारी मागे घेताना पतीलाही अश्रू अनावर; भाजपात हायव्होल्टेज ड्रामा
मुंबई महापालिकेसाठी ठाकरे विरुद्ध शिंदे सेना; सदा सरवणकरांच्या मुलीला तिकीट, जोगेश्वरीत कुणाला संधी?
मुंबई महापालिकेसाठी ठाकरे विरुद्ध शिंदे सेना; सदा सरवणकरांच्या मुलीला तिकीट, जोगेश्वरीत कुणाला संधी?
नांदेडमध्ये अशोक चव्हाणांनी 50 लाख घेऊन तिकीट दिलं, माजी नगरसेवकाचा आरोप, म्हणाले, मी 1980 पासून सोबत होतो
नांदेडमध्ये अशोक चव्हाणांनी 50 लाख घेऊन तिकीट दिलं, माजी नगरसेवकाचा आरोप, म्हणाले, मी 1980 पासून सोबत होतो
Embed widget