एक्स्प्लोर
INDvsPAK Hockey: थरारक सामन्यात India आणि Pakistan 3-3 ने बरोबरीत, चुरस वाढली
मलेशियामध्ये सुरु असलेल्या सुलतान जोहोर चषक (Sultan of Johor Cup) स्पर्धेत भारताच्या ज्युनियर पुरुष हॉकी संघाने पाकिस्तानविरुद्ध (Pakistan) जबरदस्त पुनरागमन करत सामना ३-३ असा बरोबरीत सोडवला. चुरशीच्या झालेल्या या सामन्यात भारतीय संघ दोन गोलने पिछाडीवर होता, पण अखेरच्या दोन क्वार्टरमध्ये शानदार खेळ करत त्यांनी सामन्यात बरोबरी साधली. भारताकडून अरिजीत सिंग हुंदल (४३'), सौरभ आनंद कुशवाहा (४७') आणि मनमीत सिंग (५३') यांनी गोल केले, तर पाकिस्तानकडून हन्नान शाहिद (५') आणि सुफियान खान (३९', ५५') यांनी गोल नोंदवले. या बरोबरीमुळे भारतीय संघ स्पर्धेत अपराजित राहिला आहे. हा सामना मंगळवारी मलेशियातील जोहोर बाहरू येथील तमन दया हॉकी स्टेडियमवर खेळवण्यात आला.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

















