Baba Adhav Funeral : समाजसेवक बाबा आढाव यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांना अखेरचा निरोप देण्यासाठी सध्या पुण्यात तयारी सुरू आहे. पुणे शहर आणि राज्याच्या कामगार, सामाजिक आणि राजकीय वर्तुळात आदराने पाहिले जाणाऱ्या या नेत्याचे पार्थिव सध्या हमाल भवन येथे अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले आहे.हमाल भवन येथे बाबा आढाव यांना शासकीय मानवंदना दिली जात आहे. या मानवंदनेनंतर त्यांचे पार्थिव शववाहिनीत ठेवून वैकुंठ स्मशानभूमीकडे रवाना करण्यात येईल.
वैकुंठ स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
बाबा आढाव यांच्यावर वैकुंठ स्मशानभूमी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडणार आहेत.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार हे वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यदर्शनासाठी उपस्थित राहणार आहेत.
त्यांच्या अंत्यसंस्काराला राजकीय, सामाजिक आणि कामगार वर्गातील त्यांचे सर्व स्नेही आणि आप्तजन मोठ्या संख्येने उपस्थित राहतील.
बाबा आढाव यांनी आपले संपूर्ण आयुष्य कष्टकरी, कामगार आणि उपेक्षित वर्गाच्या न्याय-हक्कांसाठी समर्पित केले. त्यांच्या निधनाने महाराष्ट्रातील सामाजिक चळवळीची मोठी हानी झाली आहे.





















