Sharad Pawar Pc : मविआच्या मुख्यमंत्रिपदाचा निर्णय संख्याबळावर, शरद पवारांचे वक्तव्य ABP Majha
Sharad Pawar Pc : मविआच्या मुख्यमंत्रिपदाचा निर्णय संख्याबळावर, शरद पवारांचे वक्तव्य ABP Majha
शिवरायांनी सूरतेची लूट केली नाही असं भाजपचं म्हणणं आहे..मात्र शिवरायांचा सूरतेवर स्वारी करण्याचा उद्देश वेगळा होता - इंद्रजीत सावंत आणि जयसिंगराव पवार या इतिहासतज्ञांनी सिद्ध केलं आहे - अनेक जुने पुतळे आहेत, ज्यांना काहीच झालं नाही..त्यामुळे बांधकाम सदोष होत - ज्यांना काम दिलं त्यांना अनुभव नव्हता, हे स्पष्ट होतंय. - रोज एक दोन तरी अशा केसेस होतात ज्यामधे स्त्रियावंर अत्याचार असतात.. - बदलापूरमधे जी दुर्दैवी घटना घ़डली त्याची प्रतिक्रिया म्हणून नागरिकांनी नंतर रेलरोको केला - यात राजकारण काय कऱणार..काही हजार लोक जमले, त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केली - ते काय आम्ही आणले नव्हते - केंद्रसरकारमधे जे एक चांगले मंत्री आहेत त्यातले गडकरी एक आहेत -मुख्यमंत्री पदासंदर्भात निर्णय आपल्याजवळ संख्या असल्यानंतर निर्णय़ घेता येईल - स्थिर सरकार देण्याचा आमचा प्रयत्न आहे - जातीनिहाय जनगणना हा विषय आम्ही नेहमीच मांडत आलोय...आता आरएसएस हा विषयावर बोलतायत महाराष्ट्राची ही संस्कृती आहे का ज्यांना अनुभव नाही त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बनवावा --------------------------- सुरत आणि सुरतचा खजिना छत्रपती शिवाजी महाराज यांनी लुटला का नाही हा प्रश्न होता? राज्याच्या उपमुख्यमंत्री यांनी शिवाजी महाराज यांनी लूट केली नाही असं म्हटलं शिवाय काँग्रेसने चुकीचा इतिहास समोर आणला असं म्हटलं यावर बोलण्याचा अधिकार इतिहास संशोधक यांचा आहे काल इतिहास संशोधक जयसिंगराव पवार यांनी याबाबत इतिहास सांगितला चुकीचा इतिहास जनतेसमोर आणला तर त्याचा चुकीचा परिणाम होतो मालवण किनारी उभा केलेल्या पुतळ्याचं काम ज्यांना दिलं होतं त्यांनी इतकं मोठं काम त्यांनी कधी केलं नाही मुख्यमंत्री आणि सहकारी सांगतात वाऱ्याचा वेग वाढल्याचं कारण सांगतात जी कारण सांगितलं जातं ते योग्य नाहीत --- दररोज दोन ते तीन अशा घटना पाहायला मिळत आहेत की अत्याचार हिंसा घटना घडत आहेत नागरिकांत भीतीचं वातावरण आहे गृहविभागाने नागरिकांना धाडस देणं गरजेचं असतं मात्र तसं होताना दिसत नाही बदलापूर घटना घडली हे चांगलं नाही ज्या लोकांनी संताप व्यक्त केला त्यांच्यावर गुन्हे दाखल केले बदलापूर इथं सामान्य नागरीकांची प्रतिक्रिया होती तिथं राजकारण कुणी करण्याचा प्रश्न नाही मालवण किल्ल्याच्या इथं महाराज यांचा पुतळा कोसळला त्यावेळी शिवभक्तांची भावना असते ते राजकारण म्हणता येणार नाही नितीन गडकरी सत्तेत आहेत अनेक कामे करत असताना ते सर्व झोकून काम करतात अत्यंत बारकाईने कामावर लक्ष देत असतात अनेकदा आम्ही त्यांचं संसदेत कौतुक केलं लाडकी लेक योजनेवरून सत्तेतील पक्षात श्रेयवाद सुरू आहे दोन महिन्यानंतर सगळ्याना निवडणुकीला समोर जायचं आहे ----------- नेतृत्व कुणी करायचं यावर चर्चा झाली नाही जागा निवडणूक आल्यानंतर यावर निर्णय होईल सत्ता येईल असं चित्र महाराष्ट्रात आहे आताच नेतृत्वाचं नाव जाहीर करण्याचं कारण नाही आम्ही राज्याला स्थिर सरकार देणार -------- शिवाजी महाराज यांचा पुतळा बांधताना यात भ्रष्टाचार झाला याची पक्की खात्री लोकांना आहे निवडणुकीत लोकांच्या समोर हे सगळे मुद्दे मांडले जातील जातीय आधारावर जनगणना व्हावी अशी आमची मागणी होती लहान लहान समाज आहेत त्यांची संख्या समोर येईल त्यांच्या लोकसंख्येनुसार त्यांना लाभ देता येईल ज्या भागात ज्यांचं काम आहे त्यांचं मत जाणून घेणार नागरिकांमध्ये ज्यांच्याबद्दल सकारात्मक भावना आहे त्यांचं स्वागत आहे ((घरवापसी या प्रश्नवर उत्तर)) आता कागलमध्ये समरजित घाटगे यांची गरज विधानसभा मतदार संघात गरज आहे त्यांनुसार विविध ठिकाणी निर्णय घेतला जाणार आहे महाराष्ट्रात लोकांना बदल हवा आहे त्यात आता आमची जबाबदारी वाढली आहे मागच्या वेळी देखील उमेदवारांची चणचण नव्हती आता देखील आमच्याकडे उमेदवारांची चणचण नाही लोकसभेला भाजपला बहुमत मिळेल असं दाखवलं जात होतं पण ते खरं नव्हतं आता देखील तसंच चित्र पाहायला मिळेल एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न तातडीने सोडवावा कारण सण तोंडावर आहे सरकार वेगळं सांगते आणि त्यांचे सहकारी वेगळं सांगते महाराष्ट्रात शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला तो तयार करण्यासाठी कुणाला काम दिलं, त्यात भ्रष्टाचार झाला ही महाराष्ट्राची संस्कृती आहे का? छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत असे वागले जाते सरकारची ही भूमिका राज्यातील लोक सहन करणार नाहीत लोकशाहीत सगळयांना निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे त्यामुळे कोणत्याही संघटनेबद्दल आपण बोलणं योग्य नाही जागा वाटपाचा निर्णय झाला नाही, पहिली बैठक देखील झाली नाही 7, 8, 9 या तारखेला महाविकास आघाडीचे नेते बसतील आणि चर्चेला सुरुवात होईल यामध्ये आम्हाला साथ दिलेल्या लहान पक्षांना देखील सोबत घेण्याबाबत मी भूमिका घेतली आहे ती मी सुचवली आहे लवकरच याबाबत प्रक्रियेला सुरुवात होईल पण मी या प्रक्रियेत मी नाही, आमचे इतर सहकारी यात चर्चा करतील ममता बॅनर्जी यांनी आपल्या राज्यात महिला सुरक्षेबाबत धोरण घेतलं आहे तसंच धोरण आपण घ्यायला पाहिजे, आमच्या जाहीरनाम्यात त्याचा समावेश करण्याची सूचना मी महाविकास आघाडीला करणार आहे या सरकारने घोषित केलेल्या योजनांमुळे हे सरकार अडचणीत आलं आहे या सरकारने जुन्या योजना बंद करून नवीन योजना घोषित केल्या आहेत नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया संपेल असा माझा अंदाज आहे इतकी वर्षे मी राजकारणात आहे लोकांच्या मनात मला त्यांची भावना कळते काल कागलच्या जनतेच्या डोळ्यात मला समरजित यांच्याबाबत भावना समजत होती ((आणखी किती लाचार टार्गेटवर आहेत असं विचारल्यावर हसून वेळ मारून नेली)) गुन्हेगारांचा शोध घेणे आणि लोकांचा विश्वास देणं हे काम सरकारचे आहे पण या दोन्ही मुद्दयावर सरकार काम करत नसल्याचं दिसतं मालवण येथील पुतळा कोसळल्यानंतर जनभावना समोर आली मी त्याबद्दल केवळ भावना व्यक्त केल्या, मी तिकडे गेलो देखील नाही पण माझ्या मित्रांना ((राणे यांना)) झिणझिण्या आल्या म्हणजे किती अस्वस्थता आहे हे लक्षात येईल महायुतीतील नेते एकमेकांबद्दल टीका करत आहेत त्याच्यात आम्हाला काही पडायचं नाही त्यांचं त्यांना लखलाभ लाभो महाराष्ट्रातील काही गाव अशी आहेत की मला त्याठिकाणी जायला आवडत त्यात कोल्हापूरचा देखील समावेश आहे कोल्हापूरचा पांढरा रस्सा तांबडा रस्सा मस्त आहे कोल्हापूरची हवा चांगली आहे काल मी एका ठिकाणी जात होतो तिन्ही बाजूचे रस्ते अडवले होते मी सहकाऱ्याला म्हटलं की हे योग्य नाही वाहन जाऊ दिली पाहिजेत मला सांगितलं की वाहतूक सुरळीत राहण्यासाठी हे करतात इतर शहरात याबाबत लोकांना कौतुक वाटतं पण.. कोल्हापुरात लोकं म्हणत असतील की कोण ह्यो सुक्काळीचा चाललाय* ऑन आर एस एस भाजप मुख्यमंत्री त्या त्या पक्षाला विचारधारेला भूमिका मांडण्याचा अधिकार आहे आमची आघाडी आहे त्यामध्ये कोणाचाही मुख्यमंत्री व्हावा असे आम्ही म्हणतो तसे ते भाजपचा व्हावा म्हणत असतील हा त्यांचा निर्णय आहे मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यासंदर्भात कोणत्या पक्षाचे किती उमेदवार निवडून येतील हे आधी पाहावं लागेल आणि त्यानंतर संख्याबळानुसार निर्णय होईल