TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :10 नोव्हेंबर 2024 : ABP Majha
TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :10 नोव्हेंबर 2024 : ABP Majha
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची आज मुंबईत पत्रकार परिषद, यावेळी भाजपचा विधानसभेचा जाहीरनामा अमित शाहांच्या हस्ते प्रकाशित होण्याची शक्यता.
भाजपच्या जाहीरनाम्यात अल्प मुदत, मध्य मुदत आणि दीर्घ मुदतीच्या कर्जाबाबत मोठ्या निर्णयांची शक्यता.
शेती, सेवा, विक्री क्षेत्राबाबत विशेष घोषणांची शक्यता, तसंच शेतक-यांना संपूर्ण कर्ज माफीची घोषणाही असू शकते.
सत्तेत आल्यास शेतकऱ्यांना १०० टक्के कर्जमाफी दिली जाईल, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा. वाशीम जिल्ह्यातील कारंजा येथील जाहीर सभेत फडणवीसांची घोषणा.
सत्ताधाऱ्यांना निवडणुकांच्या तोंडावर शेतकरी आठवतात, मविआचं सरकार पाडलं नसतं, तर दुसऱ्यांदा कर्जमाफी केली असती, माजी मुुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं वक्तव्य.
आज महाविकास आघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध होणार, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंच्या उपस्थितीत जाहीरनामा प्रसिद्ध होणार.
देशाला एकत्र करण्यासाठी इंदिरा गांधी यांनी जीव दिला, राजीव गांधी यांना मारलं गेलं, काँग्रेस पार्टी लढणारी आहे, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगेंची 'बटेंगे तो कटेंगें'वर प्रतिक्रिया.